भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकून संपूर्ण भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
Image- X
गेल्या 11 वर्षापासून भारतीय वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहत होते ते आज पूर्ण झाले आहे.
Image- X
रोहित शर्माच्या कप्तानी मध्ये भारतीय संघाने फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली.
Image- X
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.
Image- X
बीसीसीआयने खेळाडूंच्या झोळीमध्ये बक्षिसांचा वर्षाव केला आहे.
Image- X
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या वतीने ट्रॉफी, मेडल आणि जवळपास 22.76 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.
Image- X
सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयने भारतीय संघाला या विजयानंतर आपली तिजोरी पूर्ण खोलून दिली आहे.
Image- X
विजयाच्या एक दिवसानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी घोषणा केली की भारतीय संघ आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांना 125 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
Image- X
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही बोर्डाने वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या संघाला एवढे मोठे बक्षीस दिले नव्हते.