यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहर्त काय व व्रताचे महत्व काय? जाणून घेऊ..
Image - Instagram
महिला दरवर्षी पतीच्या दीर्घयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यसाठी वट सावित्रीचे व्रत करतात. वट सावित्री व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे.
Image - Instagram
यावर्षी २१ जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा असून या दिवशी महिला उपवास करतात.
Image - Instagram
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत पाळले जाते. तर काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट पौर्णिमेचे व्रत केले जाते
Image - Instagram
सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करत प्रार्थना करतात.
Image - Instagram
ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य भरपूर असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही भरपूर असावे, अशी धारणा वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची आहे
Image - X
यंदा वटपौर्णिमा पूजेचा शुभ काळ हा २१ जून रोजी सकाळी ०५.२४ ते १०.३० वाजेपर्यंत असेल
Image - X
हिंदू पौराणिक कथेनुसार, या व्रतामुळे सावित्रीने यमराजांकडून सत्यवानचे प्राण परत आणले होते त्यामुळे स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
Image - X
वट सावित्री व्रत का केले जाते?
वट सावित्री व्रताच्या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात
Image - X
धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच परंब्यात सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते