झी मराठीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
शिवा मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक आणि आशु म्हणजेच शाल्व कींजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
शिवा मालिकेने दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
शिवा मालिकेचा शेवटचा भाग 8 ऑगस्ट रोजी प्रसारित होईल.
शिवा मालिकेचे आतापर्यंत 491 भाग पूर्ण झाले आहेत.
झी मराठीवर शिवा मालिका निरोप घेऊन 11 ऑगस्ट पासून शिवानी सोनार ची तारिणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.