Wedding Card Viral 2024 : निमंत्रण पत्रिकेवर वराने पाहुण्यांसाठी लिहिला हा संदेश
Wedding Card Viral एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील गोहद भागातील ही लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. ही पत्रिका म्हणजे फक्त लग्नपत्रिकाच नव्हे तर, त्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. चंबळ प्रदेशात सुरू असलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध एक पुढाकार म्हणून हा संदेश आहे. या लग्नपत्रिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या संदेशाद्वारे समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. Wedding Card Viral Message
Wedding Card Viralविशेषतः लग्न समारंभात शस्त्र घेऊन येण्याच्या सवयीशी संबंधित दुष्कृत्यांबद्दल यातून संदेश देण्यात आला आहे. चंबळ प्रदेशात विशेषतः करून भिंड आणि मुरैना जिल्ह्यामध्ये एक वाईट रीत आहे. तिथे लोक शुभप्रसंगी शस्त्रे घेऊन लग्नासारख्या समारंभात सहभागी होतात. तिथे आत्तापर्यंत गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक जीव घेणे हल्ले झाले आहेत. या प्रदेशात 56 हजार होऊन अधिक परवानाकृत तसेच बेकायदेशीर शस्त्रे आहेत आणि अनेक लोक अभिमानाची बाब म्हणून सार्वजनिकपणे ती शस्त्रे बाळगत असतात.
Wedding Card ViralMessageलग्न किंवा इतर कोणत्याही आनंदच्या प्रसंगी ही शस्त्रे सार्वजनिक प्रदर्शनाचा भाग बनतात. गेल्या काही वर्षात गोळीबारामुळे अनेक मृत्यू झाले असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. यासाठी प्रशासनाकडून कडक देखरेख असूनही या वाईट रितीचा नायनाट होत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर या पत्रिकेतून देण्यात आलेला संदेश आहे. याची आतापर्यंत सर्वत्र चर्चा झाली आहे.
काय आहे मेसेज
Wedding Card ViralMessageभिंड जिल्ह्यातील गोहड भागात असलेल्या खनेटा धाम मंदिराच्या महंताच्या भावाचा मुलगा सत्यदीप यांनी या विषयावर पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतून एक संदेश जनतेला दिला आहे. समाजातील शस्त्रांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पत्रिकेत लिहिलेला संदेश असा आहे, “हात जोडून विनंती – आमच्याकडे दोन कुटुंबांमध्ये प्रेमाचा नातं जोडलं जात आहे. लढाई नव्हे, कृपया लग्नाला येथे शस्त्रास्त्र घेऊन येऊ नये.”
सत्यजित यांच्या या उपक्रमानंतर ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली असून या मेसेजने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक लोक त्याचे कौतुकही करत आहेत.