What If You Lost Your Aadhaar Card In Marathi : आधार हरपले चिंता करू नका, असे मिळवा परत

What If You Lost Your Aadhaar Card And Your Mobile Number Is Not Linked Know Step by step Process : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

What If You Lost Your Aadhaar Card : जर तुमच्या आधार कार्डला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक केला नाही. आणि तुमच्या आधार कार्ड हरपले तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जा. तिथे तुम्ही बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केल्यानंतर नवीन आधार कार्ड दिले जाईल.

भारतीय व्यक्तीसाठी आधार कार्ड एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते. या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करणे ही बंधनकारक करण्यात आलेले आहे.

What If You Lost Your Aadhaar Card मात्र आजही अनेक असे लोक आहेत की ज्यांनी आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा आधार कार्ड हरपते किंवा चोरीला जाते तेव्हा नवीन आधार कार्ड कसे बनवावे हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहतो.

तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर अनेक कामे तुमची अडकली जातात. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल आणि तुमचा मोबाईल नंबर बंद झाला किंवा तुम्ही पुन्हा आधार कार्डशी लिंक केला नाही तर अशा स्थितीमध्ये तुमची परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. अशा स्थितीमध्ये तुम्ही नवीन कार्ड बनवू शकता. मात्र अनेक अडचण येतात.

मोबाइल नंबरला लिंक नसलेले आधार कार्ड हरपल्यास परत मिळेल का?

What If You Lost Your Aadhaar Card And Your Mobile Number Is Not Linked Know Step by step Process

हो.. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आणि जर आधार कार्ड हरपले तर तुम्हाला दुसरे आधार कार्ड मिळू शकते.

मात्र अडचणी अधिक वाढतात. कारण तुमच्याकडे लिंक केलेला मोबाईल नंबरच नसतो आणि तुमच्याकडे आधार नंबरही नसतो. तुमच्याकडे आधार कार्डची कुठल्याही प्रकारची झेरॉक्स कॉपी ही नसते अशा स्थितीमध्ये परिस्थिती कठीण होते. जर तुमचा आधार नंबर तुम्हाला लक्षात असेल आणि आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्या पाशी असेल तर तुम्ही ऑनलाईन दुसरे आधार कार्ड काढू शकता. त्यात काही अडचणी नाहीत.

असे बनवा नवीन आधार कार्ड

What If You Lost Your Aadhaar Card And Your Mobile Number Is Not Linked Know Step by step Process

  • जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक केला नसेल आणि तुमच्या आधार कार्ड हरपले तर तुम्ही ते कसे परत मिळवावे चला जाणून घेऊ..
  • सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा.
  • तिथे गेल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम 28 नंबर असलेला नावनोंदणी क्रमांक द्यावा लागेल. जो आधार कार्ड तयार करताना तुम्हाला पावती दिली गेली होती त्यावर असतो.
  • त्यानंतर तुमची माहिती, नाव, पत्ता, फिंगरप्रिंट आणि डोळ्याचे स्कॅन करण्याची वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
  • तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती योग्य असल्यास केवळ 30 रुपये फीस भरून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या घरी नवीन आधार कार्ड पोस्टद्वारे पाठवले जाईल.

28 अंकी नाव नोंदणी क्रमांक नसेल तर काय करावे?

अनेकांनी आधार बनवताना मिळालेले नाव नोंदणी क्रमांक जपून ठेवलेला नसतो. पण अशा स्थितीमध्ये जेव्हा एक व्यक्तीकडे नाव नोंदणी क्रमांक नसतो तेव्हा तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसतानाही तुम्हाला आधार काढता येते. तुमचा आधार नंबर लक्षात असेल तर तुम्ही दुसरे आधार कार्ड बनवू शकता.

यासाठी तुम्हाला त्याच आधार केंद्रावर जावे लागेल तिथं वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. जसे की डोळ्याचे स्कॅनिंग, फिंगरप्रिंट आधीची माहिती योग्य दिसून आल्यास तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्ड दिले जाईल. त्यामुळे बायोमेट्रिक केलेल्या पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड परत मिळवता येते.