WhatsApp New Scheduled Message Feature In Marathi : काय आहे whatsapp चे हे नवीन फीचर
WhatsApp New Scheduled Message Feature : जगातील प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सॲप ॲप असतेच. व्हाट्सॲप चा कोट्यावधी लोक वापर करतात. व्हाट्सॲप मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका क्लिकवर तुम्ही मेसेज पाठवू शकता, संभाषण करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता.
WhatsApp New Scheduled Message Feature व्हाट्सॲप मुळे अनेक कामे झटपट होतात. व्हाट्सॲप नेहमीच त्यांच्या युजरसाठी वेगवेगळे फीचर लॉन्च करत असतात. व्हाट्सअप लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
WhatsApp New Scheduled Message Feature या नवीन फिचर मध्ये तुम्हाला आता मेसेज शेड्युल करता येणार आहेत. त्यामुळे आता अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. तुम्हाला आता रात्रीचे 12 वाजेपर्यंतचे जागरण न करता तुम्ही मेसेज शेड्युल करून मेसेज सेंड करू शकता.
अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करावे लागते किंवा बारा वाजण्याची वाट बघावी लागते. अनेकदा आपण खूप गोष्टी विसरतो त्यामुळे आता तुम्हाला रिमाइंडर मिळणार आहे. तुमचे मेसेज तुम्ही शेड्युल करू शकतात. ज्यावेळी तुम्हाला तो मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा आहे तो त्या व्यक्तीपर्यंत त्या वेळेत पोहोचेल. त्यामुळे युजर्स ला खूप फायदा होणार आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे फीचर सध्या या फीचर वर काम सुरू आहे सर्वात आधी आयफोन युजर साठी ही फीचर सुरू होईल त्यानंतर हळूहळू सर्व मोबाईलसाठी हे विचार हळूहळू सुरू होणार आहे आता शेड्युल नक्की करायचं कसं आणि हे शेड्युल मेसेज फिचर कसं काम करेल याची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहू
शेड्युल मेसेज फीचर कसं काम करणार
WhatsApp New Feature
WhatsApp New Feature व्हाट्सअप वर तुम्ही एका वेळी मेसेज शेड्युल केला तर तो त्याचवेळी समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीचे चॅट ओपन कराल तिथे तुम्हाला हा मेसेज दिसेल. त्यासाठी एक वेगळे सेक्शन असेल. त्यामुळे तुम्हाला किती मेसेज शेड्युल आहे हे समजेल. तुम्ही या मेसेजला मॅनेज करू शकतात.
WhatsApp New Feature जर तुम्ही मेसेज शेड्युल केला तर तो डिलिव्हरी होईपर्यंत त्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकतात. त्यासोबतच तुम्हाला डिलीट देखील करता येईल. याबाबत समोरच्या व्यक्तीला कोणतेही नोटिफिकेशन पडणार नाही.
आता युजर्स पर्यंत हे फीचर कधी पोहोचणार याची व्हाट्सअप युजर्सना प्रतीक्षा लागली आहे.