WhatsApp Subscription Plan News In Marathi : आता व्हाट्सअप चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार?

WhatsApp Subscription Plan News In Marathi : सबस्क्रीप्शन प्लॅन ची तयारी

WhatsApp Subscription Plan News In Marathi : संपूर्ण जगभरात व्हाट्सअपचे कोट्यावधी युजर्स आहेत. प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप हे ॲप्लिकेशन आहे. आता व्हाट्सअप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे संकेत मिळत आहेत.

WhatsApp Subscription Plan News In Marathi : मेटा कंपनीकडून व्हाट्सअप साठी सबस्क्रिप्शन आणण्याची तयारी केली जात आहे. हा सबस्क्रिप्शन प्लॅन कोणासाठी असेल हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

तर हा प्लान सगळ्यांसाठी नाहीये. प्रामुख्याने व्हाट्सअप बिजनेस युजरसाठी फक्त शुल्क मोजावे लागू शकतात पण भविष्यात प्रत्येक whatsapp च्या युजरसाठी पैसे मोजावे लागू शकतात. सोशल मीडियावर मेटा कंपनीच्या व्हाट्सअप सबस्क्रीप्शन मॉडेलची चर्चा सुरू आहे.

WhatsApp Subscription Plan News संपूर्ण युजर्स मोफत मेसेजिंग सेवेचा लाभ घेतात. पण आता यासाठीच पैसे मोजावे लागणार आहेत. मेटा ‘पेड’ मॉडेलवर काम करण्याची तयारीत असल्याचे सांगितले जात आहेत. मेटा कंपनी whatsapp च्या अपडेट फीचर्स साठी लवकरच सबस्क्रिप्शन लॉन्च करू शकते.

प्रामुख्याने व्हाट्सअप बिजनेस युजर्सला डोळ्यासमोर ठेऊन हे बदल करण्यात येणार आहे. यामध्ये व्यवसायांना अधिक उपकरणे जोडणे आणि प्रगत मॅनेजमेंट टूल्स वापरण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

WhatsApp Subscription Plan News आत्ता सध्या तरी सामान्य युजरसाठी मूलभूत सेवा मोफत राहण्याची शक्यता असली तरी जाहिराती मुक्त अनुभवासाठी भविष्यात प्रत्येकालाच पैसे मोजावे लागणार आहेत.

का येते पेड व्हाट्सअप

WhatsApp Paid Version Update

गेल्या वर्षी मेटाने व्हाट्सअप स्टेटस आणि चैनल मध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली? कंपनीच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आधी जाहिरातीमुक्त अनुभव घेणाऱ्या व्हाट्सअप वापर कर्त्यांना हा बदल रुचला नाही.

युजर्स कडून विरोध असतानाही मेटाने आपला निर्णय कायम ठेवला. आता मेटा कंपनी पेड व्हाट्सअप चा विचार करत आहे. त्यामुळे भविष्यात वापर करताना जाहिरात मुक्त व्हाट्सअप वापर करायचे असेल तर पैसे मोजावे लागणार आहेत.

किती पैसे मोजावे लागणार

WhatsApp Paid Version Update

व्हाट्सअप च्या पेड सबस्क्रीप्शन प्लॅनची सध्याची किंमत किती असेल याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती सध्या तरी मिळालेली नाही. त्याचबरोबर मेटाकडून पेड सर्विस कधी सुरू केली जाणार हेही सध्या समोर आलेले नाही.

रिपोर्टच्या माहितीनुसार फक्त जाहिरात नको असेल तर भविष्यात युजरला पैसे मोजावे लागतील त्यासाठी खास प्रीमियम असतील आधी बिझनेस व्हाट्सअप चा युजरसाठी पेडची सेवा सुरू करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक युजरसाठी हळूहळू प्रीमियम प्लॅन तयार केले जाऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे.