Why do you clap thrice only in Mahadev temple : जाणून घेऊ थोडी माहिती
Why do you clap thrice only in Mahadev temple : आपण अनेकदा आपल्या जवळच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो. मात्र अनेक जण दर्शन घेतल्यानंतर तीनदा टाळी वाजवतात.
Why do you clap thrice only in Mahadev temple मात्र नेमके मंदिरामध्ये तीनदाच टाळी का वाजवली जाते हे तुम्हाला माहितीये का? नाही ना, चला तर मग आपण महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी का वाजवतात हे जाणून घेऊ.
Why do you clap thrice only in Mahadev temple महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याची शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते.
श्रावण महिना महादेवाचा महिना म्हणून ओळखला जातो. धर्मशास्त्रानुसार या महिन्यांमध्ये महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. असे केल्यामुळे महादेवाचा आशीर्वाद आपल्या भक्तावर सदैव राहतो.
त्यामुळे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव ही असतात. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यात अनेक भक्त महादेवाची पूजा करतात. उपवास करतात.
पौराणिक मान्यतेनुसार महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा संदर्भ हा ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा आवाहन करण्यासोबत जोडल्या गेला आहे.
जेव्हा भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवतो याचा अर्थ असा होतो की, महादेवाच्या मंदिरात जाऊन तीन प्रमुख देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच स्मरण करतो. त्यांना नमस्कार करतो.
सोप्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाल्यास महादेवाच्या मंदिरा तीनदा टाळी वाजवण्याचा अर्थ भूमाता, पाताळा आणि स्वर्ग तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमन केलं जातं. जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवता त्याचा अर्थ तुमची ही महादेवा प्रति श्रद्धा असते.
तीन टाळी वाजवण्यात प्रत्येक टाळीचा वेगळा अर्थ असतो. यामुळे भक्त आणि देव यांच्यामधील संवाद वाढण्यास मदत होते.
पहिल्या टाळीचा अर्थ :– म्हणजे भक्त देवाच्या चरणा जवळ आला आहे.
दुसऱ्या टाळी चा अर्थ :- मी देवाला प्रार्थना करतो त्याने मला आशीर्वाद देऊन माझं सर्व दुःख दूर नाहीस करावं.
तिसऱ्या टाळी चा अर्थ :- म्हणजे मी महादेवांना शरण आलो आहे. असा होतो. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवतात.
वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली असून याचा तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाहीत.