हे ॲप वापरण्यासाठी हे काम करणे आवश्यक, सरकारने आणले आहेत नवीन नियम
भारताच्या दूरसंचार विभागाने ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. सरकारीच्या या नवीन नियमांतर्गत आता मेसेजिंगचा वापर करण्यासाठी प्रत्येक युजरला आपल्या अकाउंट फोन मध्ये ऍक्टिव्ह असलेल्या सिम कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती..
व्हाट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारखे चॅट ॲपचा वापर आजकाल प्रत्येक व्यक्ती करत आहे. असे खूप थोडे लोक असतील की जे मेसेजिंग ॲपचा वापर करत नाहीत. विशेष करून व्हाट्सअप ॲप लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आजकाल व्हाट्सअपचा वापर करत आहे. आता सरकार म्हणजेच भारताचे दूरसंचार निगमने ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे.
मेसेजिंग ॲपसाठी फोनमध्ये सिम ऍक्टिव्ह आवश्यक?
सरकारच्या नवीन नियमांतर्गत आता मेसेजिंग ॲपचा वापर करण्यासाठी प्रत्येक युजरला आपले अकाउंट फोनमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची लिंक करणे म्हणजेच युजर आता मेसेजिंग ॲप वापर तेव्हाच करू शकतील जेव्हा ते त्यांच्या फोनमधील ऍक्टिव्ह सिम आणि ते सिम जे अकाउंटला लिंक केलेले असेल. दूरसंचार विभागाने हा नवीन Telecommunication Cybersecurity Amendment Rules , 2025 अंतर्गत लागू केला आहे.
हा नवीन नियम अशा लोकांसाठी मोठा बदल असेल जे लोक अनेक काळापासून वेब किंवा डेक्सटॉप वर्जनचा मेसेजिंगसाठी वापर करत आहेत. नवीन नियम प्रत्येक ॲपला 90 दिवसानंतर लागू करावा लागेल. यामध्ये व्हाट्सअप, टेलिग्राम, स्नॅपचॅट, शेअर चॅट, जिओ चॅट सारख्या सर्व मेसेजिंग ॲप्सचा यामध्ये समावेश आहे.
काय आहे नवीन नियमाचा उद्देश
दूरसंचार विभागाच्या या नवीन नियमाचा उद्देश म्हणजे ऑनलाइन फसवणूक आणि स्कॅम सारखे प्रकरणे थांबवणे आहे. अशा मध्ये आता स्कॅमर्स विना सिम लोकांची फसवणूक करू शकणार नाहीत. जर कंपन्यांनी या नियमाचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात सायबर सुरक्षा नियमांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
वेब- डेस्कटॉप वर्जनसाठी नवीन नियम
जे लोक वेब किंवा डेस्कटॉप वर्जनवर ॲप्स वापर करतात त्यांच्यासाठी वेगळे नियम बनवण्यात आले आहेत. अशा लोकांना आता सहा घंट्यानंतर पुन्हा लॉगिन करावे लागेल. त्यांच्यासाठी प्रत्येक सहा तासानंतर त्यांचे अकाउंट ऑटो लॉगआऊट होईल. आणि त्यांना क्यूआर कोड द्वारे फोन सोबत पुन्हा कनेक्ट व्हावे लागेल) रीपेअर करावे लागेल.