PM Kisan Yojana 22nd Installment Date Announced : शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार 2000 रुपये
PM Kisan Yojana 22nd Installment Date Announced : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी या आनंदाचा भाग बनणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची अधिकृत घोषणा केली आहे.
PM Kisan Yojana 22nd Installment शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 22 वा हप्ता कधी जमा होणार याची प्रत्येक शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे. 9 कोटींपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
PM Kisan Yojana 22nd Installment Date केंद्र सरकारने एक्स प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा करण्यात येईल असं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शेतकरी 22 व्या हप्त्याची फेब्रुवारी महिन्यापासून वाट बघत होते आता त्यांची प्रतीक्षा फळाला लागली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 13 मार्च रोजी PM Kisan Yojana पैसे जमा केले जाणार आहेत. 13 आणि 14 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आसाम मध्ये असतील. 13 मार्च रोजी ते कोकराझार दौऱ्यावर असतील त्यानंतर गुवाहाटी येथे कार्यक्रम होईल. त्यामुळे या कार्यक्रमात पैसे ट्रान्सफर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
असे करा स्टेटस चेक
PM Kisan Yojana Status Check
- पीएम किसान योजनेच स्टेटस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला HTTPS://pakistan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर नो युवर स्टेटस यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- त्यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला तुमचे स्टेटस दिसणार आहे.
- त्यावरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे कळणार आहे.