Ayushman Yojana अंतर्गत कोणाला मिळते गोल्डन कार्ड?

काय आहे याचा फायदा; कसा करावा अर्ज?

Ayushman Yojana आयुष्मान योजनेच्या संदर्भात आज प्रत्येकाला माहिती आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सर्व नागरिकांना दिला जातो. ज्यांच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड आहे अशा सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. याद्वारे मोफत उपचार घेता येतात.

आयुष्मान योजनेअंतर्गत गरजू लोकांना पाच लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत कुटुंबातील एक सदस्य किंवा सर्व कुटुंबातील सदस्य मिळून पाच लाख रुपयांचे मोफत उपचार घेऊ शकतात. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने एक अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत गरजवंत लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात येणार आहे.

हे अभियान 25 डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे. या योजनेअंतर्गत आशा कार्यकर्ता, शाळेतील शिक्षक इत्यादी कार्ड बनवण्यासाठी मदत करणार आहेत. चला जाणून घेऊया तुम्ही आयुष्यमान कार्डसाठी कसा अर्ज करू शकता.

कसा करावा अर्ज?

सर्वात प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत बेनिफिशरी पोर्टलवर जावे लागेल, तिथे बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करा. आता आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. तिथे असलेला कॅपच्या भरा. त्यानंतर एक ओटीपी जनरेट होईल तो तिथे भरा.

त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, गाव निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आपला आधार नंबर द्वारे कार्डसाठीची पात्रता चेक करायची आहे. येथे तुम्हाला कुटुंब आणि कार्डचे टेटस पाहायला मिळेल. जर कार्डचे टेटस नॉट जनरेटर असे असेल तर तुम्ही आपल्या नावा वर क्लिक करा आणि कार्डसाठी अर्ज करा.

आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, डेट ऑफ बर्थ, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तिथे नोंद करायचे आहे. यासोबतच तुम्हाला आधार, रेशन कार्ड किंवा दुसरे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. शेवटी तुम्हाला वेरिफिकेशन करावे लागेल.

यासाठी आधार लिंक मोबाइल नंबर वर आधार ओटीपी जनरेट करा. हा ओटीपी समिट केल्यानंतर तुमची डिटेल्स पाहून घ्या आणि आयुष्मान कार्ड एप्लीकेशन प्रोसेस या पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

कोण बनू शकत नाही आयुष्मान कार्ड

आयुष्मान कार्ड विशेष करून गरीब लोकांसाठी देण्यात येते. यामध्ये विशेष करून संघटित क्षेत्रात काम करणारे लोक जे लोक वेळेवर आपला टॅक्स भरतात ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
याबरोबरच ESIC चा लाभ घेणारे आणि pf ज्यांची सॅलरीमधून कटतो असे लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. याबरोबरच सरकारी नोकरी करणारे आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.