RBI New Rules For zero Balance Account In Marathi : या 4 नियमात होणार बदल
RBI New Rules For zero Balance Account : रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने बँक खातेदारांना दिलासा दिला आहे. देशातील कोट्यावधी लोकांचे अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट आहे. या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही. परंतु या अकाउंटवर अनेक चार्जेस लावले जातात. आता या अकाउंट धारकांसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो कोणता हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहू.
RBI Rules For zero Balance Account बँक झिरो बॅलन्स अकाउंट वर अनेक चार्जेस लावून ग्राहकांच्या अडचणीत वाढ करत होते. मात्र आता हे नियम खूप सोपे करण्यात आले आहेत. आता या नवीन नियमामुळे गावातील, लहान शहरातील ग्राहकांना डिजिटल पद्धतीने बँकिंग सेवा वापरता येणार आहे. डिजिटल पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
कोणत्याही चार्ज शिवाय वापरा डिजिटल सेवा
RBI Rules For zero Balance Account
RBI Rule यापूर्वी बँका UPI IMPS किंवा NEFT ला पैसे काढण्यासाठी वापरले जात असल्याचे म्हणत होत्या चार्ज लावत होते. त्यामुळे ग्राहकांना आणि अडचणी सामना करावा लागत होता. आता यानंतर कोणतेही डिजिटल ट्रांजेक्शन हे पैसे काढणारे मानले जात जाणार नाही. त्यामुळे झिरो बॅलन्स खात्यांमधील डिजिटल पेमेंट हे मोफत आणि अमर्यादित असणार आहे.
पैसे काढण्यासाठी शुल्क नाही
Zero Balance Account Rule
ग्राहकांना आता कोणत्याही चार्जेस शिवाय पैसे काढता येणार आहे. यापूर्वी पैसे काढण्यासाठी चार्ज लागत होते. नवीन नियमानुसार बँकांना दर महिन्याला किमान 4 वेळा मोफत रक्कम काढण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. त्यामुळे ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही. यामुळे जे ग्राहक रोख रक्कम वापरतात त्यांना याचा फायदा होणार आहे.
डेबिट कार्ड वापरल्यामुळे सूट मिळणार आहे. यापूर्वी बँका वार्षिक शुल्क किंवा रिन्यूअल फी आकारत होते मात्र आता ही सुविधा देखील मोफत असणार आहे. आता झिरो बॅलन्स अकाउंट साठी कोणतेही वार्षिक शुल्क शिवाय पैसे काढतात येणार आहेत.
चेकबुक आणि पासबुक चे नवीन नियम
Zero Balance Account Rule
पासबुक आणि चेकबुक च्या नियमात देखील बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना दरवर्षी 25 पानांचे चेक बुक मोफत मिळणार आहेत. त्याच बरोबर बँकांना पासबुक देखील मोफत द्यावे लागणार आहे. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. आता झीरो बॅलन्स खात्यांमध्ये ठेवीवर कोणतेही मर्यादा राहणार नाही. यापूर्वी याबाबत निर्णय होते. आता ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पैसे ठेवू शकतात. हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत.