Aadhar Address Update In Marathi : आता घरबसल्या असा बदला आधार कार्डचा पत्ता

Aadhar Address Update In Marathi : इतके शुल्क लागणार, वाचा सविस्तर

Aadhar Address Update : नमस्कार वाचकहो, आधार कार्ड हा आपला एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखला जातो. आधार कार्ड वरील संपूर्ण माहिती ही बरोबर आहे असे ग्राह्य धरले जाते. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड घेऊन जातो. त्याचबरोबर कुठेही आवश्यक कागदपत्र म्हणून द्यायचं असेल तर आधार कार्ड हे प्रथम कायदेशीर पुरावा मानला जातो.

Aadhar Address Update आपण पाहतो की, आधार कार्डवर आपल्या घराचा पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, आपले पूर्ण नाव अशी महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे त्याचा वापर केला जातो. सिम कार्ड घेण्यापासून ते विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत तुम्ही आधार कार्डचा सतत वापर करत असाल.

Aadhar Update बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल की, आधार कार्डवर चुकीचा पत्ता येतो. कधी कधी तुम्ही एका ठिकाणाहून शहरात दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड वरचा पत्ता बदलावा लागतो.

त्यासाठी तुम्हाला कार्यालयात जाऊन रांगेत उभा राहावे लागते आणि तो आधार कार्डचा पत्ता बदलावा लागतो. त्यामुळे तुमचं भरपूर वेळ वाया जातो. आता तुम्ही हे घरबसल्या करता येणार आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त एखादा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

How To Update Aadhar Address At Home : UIDAI नी नवीन एक आधार ॲप सादर केले आहे. हे ॲप अँड्रॉइड मोबाईल आणि IOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप प्ले स्टोअर वरून सहजरीत्या डाउनलोड करू शकता आणि घरबसल्या आधार कार्ड वरचा पत्ता बदलू शकता.

Aadhar Update तुम्ही तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करा. त्यामध्ये डिजिटल आधार आणि QR कोडची सुविधा थेट मोबाईल मध्ये उपलब्ध होईल. तसेच पत्ता बदलण्यासाठी आधार केंद्रात सारख्या चक्रा मारण्याची गरज नाही. घरबसल्या सहजरीत्या तुम्ही अपडेट करू शकता.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आधार क्रमांक आणि OTP च्या मदतीने तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर सर्विस या पर्यायावर पत्ता बदलण्याचा पर्याय दिलेला आहे.

नागरिकांना पत्ता अपडेट करताना दोन पर्याय उपलब्ध आहेत.

पहिल्या पर्यायात आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पत्ता बदलता येईल.

तर दुसऱ्या पर्यायात कुटुंबातील सदस्याच्या आधाराच्या मदतीने पत्ता अपडेट करता येईल.

पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला 75 रुपये शुल्क आकारले जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे नागरिकांनी आधार वरील माहिती वेळोवेळी अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

जेणेकरून सरकारी सेवा, बँकिंग प्रक्रिया किंवा केवायसी संबंधित कामांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड वरचा पत्ता बदलू शकता.