PMFME Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना
PMFME Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत चार वर्षे देशात अव्वल असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हाची सलग दुसऱ्या वर्षीही घसरण झाली असून जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.
PMFME Scheme केंद्र आणि राज्य सरकार मिळून विविध योजना चालू असते त्यापैकीच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना आहे. या योजनेत सलग दुसऱ्या वर्षीही छत्रपती संभाजी नगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
बिहारमधील मखाना उद्योगाला मिळालेल्या प्रोत्साराचा फायदा पाटणा जिल्ह्या ला झाला आहे. यंदा 293 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळवत त्याने छत्रपती संभाजीनगरला मागे टाकले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील 6 महिन्यात 214 उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.
PM Sukshm annaprakriya udyog yojana : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना त्यांचा स्वतःचा सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर सरकारकडून 35% पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला वन डिस्ट्रिक्ट व वन प्रॉडक्ट नुसार जिल्ह्यातील प्रमुख पिकावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते.
PM Sukshm annaprakriya udyog yojana प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत 2026 27 साठी छत्रपती संभाजी नगरला 303 उद्योगाचे उद्दिष्ट देण्यात आले होते मात्र मागील सहा महिन्यात 214 नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मंजुरी देण्यात आली तर दुसरीकडे बिहारच्या पाटणा जिल्ह्यात याच कालावधीत 293 उद्योगांना मंजुरी दिली आहे त्यामुळे बिहार यावर्षी आघाडीवर आहे
छत्रपती संभाजीनगरचे दिल्लीत होणार कौतुक
केंद्र सरकारचा प्रधानमंत्री प्रधान्य कृषी योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्या ने देशात टॉप 10 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच राज्यात प्रथम क्रमांक पटवला पटकावला आहे. या यशाचे राजधानी दिल्लीमध्ये कौतुक होणार आहे. हा कौतुक सोहळा 12 ऑक्टोंबर रोजी दिल्लीत होणार आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांचाही गौरव होणार आहे.
10 लाखासाठी मिळते अनुदान
प्रधानमंत्री सूक्ष्म अथवा लघु अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला 35 टक्के अनुदान देण्यात येते. मात्र 10 लाख रुपयांच्या मर्यादित अनुदान देण्यात येते. या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी तीन वर्ष उद्योग चांगल्या पद्धतीने चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही उद्योग सुरू करताय तर तो उद्योग चांगल्या पद्धतीने तीन वर्षे चालवला तरच तुम्हाला 35% पर्यंत अनुदान सरकारकडून देण्यात येते.