ladki bahin yojana august installment : लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट
ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. मात्र आता ऑगस्ट संपून गेला आहे मात्र ऑगस्टचा हप्ता अजून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र मिळून 3000 रुपये मिळणार का? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हप्ता कधी वितरित होणार? ही चर्चा होत आहे मात्र सध्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सर्वांना आहे.
ladki bahin yojana august installment : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता गणेश उत्सव सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला एकत्र मिळणार का? असा प्रश्न अनेक लाभार्थी महिलांना पडला आहे. कारण सणासुदीच्या दिवसात जर हप्ता मिळाला तर सण आनंदाचा होण्यास त्यांना मदत होणार आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात. काही दिवसांपूर्वी जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला मात्र जून महिन्याचा हप्ता ज्यांना मिळाला होता अशा काही महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.
ladki bahin yojana august September installment date आतापर्यंत एक कोटी 64 लाख 82 हजार महिलांच्या बँक खात्यामध्ये 2427 कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आलेले आहेत. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? हा हप्ता एकत्र मिळणार का? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित झाले आहेत.
आता राज्यात गणेश उत्सव आणि गौरीपूजन जवळ आले आहे. त्यामुळे महिला वर्गांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळावा अशी अपेक्षा महिला व्यक्त करत आहेत.
यामुळे सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र सरकारकडून अजून कुठल्याही प्रकारचे अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा करणार? या संदर्भात माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता केवळ चर्चा असून अधिकृत निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.
16 सप्टेंबरला ऑगस्टचा हप्ता मिळणार?
ladki bahin yojana august installment : 16 सप्टेंबर किंवा त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही तारीख अधिकृत नसून संभाव्य तारीख म्हणून पाहिली जात आहे. 14 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांना हप्त्याचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील याकडे प्रशासन लक्ष देत आहे. त्यामुळे लवकरच महिलांना गुड न्यूज मिळू शकते आणि त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो.
92 लाख महिला अपात्र
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आणि पडताळणी मोहिमेनंतर 92 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्याकडून रक्कम वसुली बाबत माहिती अधिकारातून मोठी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा तोंडावर सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारने राबवलेल्या ई-केवायसी आणि पडताळणी मोहिमेत या योजनेच्या लाभार्थ्याची संख्या तब्बल 92 लाखाने घटली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला तब्बल 2.48 कोटी लाभार्थी महिलांची संख्या होती. मात्र ती आता केवळ 1.65 कोटी वर आली आहे. आता या योजनेसाठी 2484.92 कोटी रुपये इतका खर्च येत आहे तर वार्षिक खर्च 29, 819.10 कोटी रुपयांवर गेला आहे.
लाडकी बहीण योजनेची e-kyc प्रक्रिया
लाभार्थी महिला आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून ई- केवायसी पूर्ण करू शकतात.
यासाठी त्यांना खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर द्वारे लॉगिन करून होम पेजवर जा, तिथे गेल्यानंतर ई-केवायसी हा पर्याय निवडा.
ई- केवायसी पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाका. मात्र लक्षात ठेवा की तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे.
त्यानंतर स्क्रीनवर असलेल्या कॅपच्या कोड भरा. गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, आलेला ओटीपी भरताच ई- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचा थांबलेला लाभ पुन्हा सुरू होईल.