ekyc-update-2026 : e-KYC संदर्भात मोठे अपडेट
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जुलैचा हप्ता अजून पर्यंत आलेले नाही. मात्र राज्य महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. याबरोबरच त्यांनी ई- केवायसी संदर्भातही अपडेट माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. महिला गेल्या अनेक दिवसापासून जुलै महिन्यात प्रतीक्षा करत आहेत. आज 31 जुलै 2026 तारीख झाली मात्र आतापर्यंत जुलै महिन्यांचा हप्ता खात्यात जमा झालेला नाही. आता राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की 15 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. याबरोबरच ज्या महिलांनी ई- केवायसी केली नाही त्यांच्याकडे अजून वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पात्र महिलांचा लाभ थांबणार नाही
महिला व बाल विकास मंत्री यांनी मागील काही काळापासून योजनांमध्ये पात्र संदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की कोणत्याही पात्र महिला या योजनेतून अपात्र होणार नाही मात्र ई-केवायसी करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ज्या महिलांनी e-kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा त्यांच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहिली आहे त्यामध्ये सुधारणा करण्याच वेळ त्यांच्याकडे आहे.
ई- केवायसी बंधनकारक करण्याचा उद्देश म्हणजे योग्य लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि अपात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू नये. जर पात्र महिलांनी वेळेवरही केवायसी, आधार व्हेरिफिकेशन यासारख्या प्रक्रिया पूर्ण केल्या तर अपात्र लाभार्थ्यांची ओळख करण्यास सरकारला मदत होणार आहे आणि गरजवंत महिलापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणेही शक्य होणार आहे.
जुलैचा हप्ता कधी येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जुलै 2026 चा हप्ता कधी जमा होणार आहे. यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-kyc प्रक्रिया
लाभार्थी महिला आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून ई- केवायसी पूर्ण करू शकतात.
यासाठी त्यांना खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर द्वारे लॉगिन करून होम पेजवर जा, तिथे गेल्यानंतर ई-केवायसी हा पर्याय निवडा.
ई- केवायसी पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाका. मात्र लक्षात ठेवा की तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे.
त्यानंतर स्क्रीनवर असलेल्या कॅपच्या कोड भरा. गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, आलेला ओटीपी भरताच ई- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचा थांबलेला लाभ पुन्हा सुरू होईल.