PM Kisan latest update : महत्वाची माहिती समोर
PM Kisan Yojana in marathi : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना 10 हजार रुपये वर्षाला मिळू शकतात. यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात अजून सरकार कडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. जाणून घ्या संपूर्ण माहिती…
PM Kisan Samman Nidhi देशभरातील मोठ्या प्रमाणात लोक शेती- शेतीसंबंधित व्यवसायावर अवलंबून आहेत आणि शेतीशी निगडित आहेत. यातील अनेक शेतकरी छोट्या स्तरावर शेती करतात. त्यांना अधिक उत्पन्न मिळत नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे. या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अनेक योजना चालवत आहे. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना प्रत्येक वेळी मोठी मदत म्हणून सिद्ध होत आहे.
केंद्र सरकारची ही योजना छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यामुळे पेरणी आणि बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येते. ही मदत चार महिन्याच्या टप्प्याने दोन – दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.
त्यामुळे या योजनेत पारदर्शकता राहते. मात्र आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून सतत मागणी होत आहे की महागाई आणि शेती खर्च पाहता सन्मान निधी वाढविण्यात यावा. आता केंद्र सरकारची महत्त्वाची समितीतील एका सदस्याने संकेत दिले आहेत की पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 10 हजार रुपये वर्षाला होऊ शकते. जाणून घ्या काय आहे बातमी..
10 हजार पर्यंत मिळू शकते मदत?
PM Kisan 10000 per year गेल्या काही वर्षापासून पीएम किसान योजने मधून मिळणारी रक्कम वाढविण्यात यावी यासंदर्भात मागणी होत आहे आणि त्यावर चर्चाही होत आहेत. मात्र अधिकृत यावर कुठलेही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र नुकतेच भारतीय कृषी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारच्या हाय पावर परचेस कमिटीचे सदस्य डॉ. कृष्णवीर चौधरी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे संकेत दिले आहेत.
त्यांनी स्पष्ट सांगितले की, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आम्ही पूर्णपणे विचार करत आहोत. त्यामुळे हा विचार चालू आहे की पुढील वर्षापासून किसान सन्मान निधीतील मिळणारी रक्कम वाढवून थेट 10 हजार रुपये वर्षाला करावी.
जर असे झाले तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना चार महिन्यांमध्ये मिळणारे हप्त्याची रक्कम वाढू शकते. याद्वारे शेती आणि शेतकरी यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक मदत होईल.
पीएम किसान योजनेमध्ये पैसे वाढणार!
पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये रक्कम वर्षाला वाढू शकते. पुढील वर्षापासून 10 हजार रुपयापर्यंत वाढण्याची चर्चा आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यावर फोकस करत आहे. रक्कम वाढल्यास हप्त्याची संख्याही वाढू शकते. मात्र अजून 10 हजार रुपये देणार या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
आतापर्यंत मिळाले एवढे हप्ते
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 2019 मध्ये केली. तेव्हापासून आतापर्यंत या योजनेमध्ये करोडो शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयेची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसा जमा करण्यात आला. केंद्र सरकार वर्षाला 2 हजार रुपयेचे तीन टप्प्यांमध्ये वितरण करते. ही रक्कम शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याच्या कालावधीनंतर मिळत राहते. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत एकूण 23 हप्ते जमा केले आहेत. आकडे पाहता सरकारने आतापर्यंत जवळपास 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. नुकतेच सरकारने या योजनेला 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
आतापर्यंत पाठवलेली रक्कम थोडक्यात
पीएम किसान योजनेमध्ये आतापर्यंत 23 हप्ते जमा करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4.47 लाख कोटी रुपये.
प्रत्येक चार महिन्याला जमा होतात 2 हजार रुपयाचा हप्ता.
डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा.
सरकारने ही योजना 2030 31 पर्यंत सुरू ठेवण्याची केली घोषणा.
कधी मिळणार पुढील हप्ता
PM Kisan 24th installment date देशातील पात्र शेतकऱ्यांचे लक्ष आता 24 वा हप्ता कधी जमा होणार याकडे लागले आहे. केंद्र सरकारने 20 जूनला 23 वा हप्त्या अंतर्गत 9.44 कोटी रुपये पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 18880 करोड रुपये जमा केले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे प्रत्येक चार महिन्याच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्यामुळे पुढील हप्ता 24 वा हप्ता ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र या संदर्भात कुठली तारीख अजून पर्यंत अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही. कृषी तज्ञांच्या नुसार सण- उत्सवाच्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा करू शकते. सर्व शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले स्टेटस चेक करावे.