ATMA Scheme for Farmers in marathi : शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षणासह मिळतात ‘हे’ 6 लाभ

ATMA Yojana : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ATMA Scheme for Farmers in marathi : ATMA योजनेतून देशभरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती यासाठी कृषी शाळा, मेळावे घेतले जात आहेत. जेणेकरून अल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकेल.

ATMA योजना शेतकऱ्यांसाठी चालवली जात असणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासह शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आधुनिक शेती ते नवीन तंत्रज्ञानाचेही मोफत प्रशिक्षण या योजनेअंतर्गत देण्यात येते. चला जाणून घेऊया या योजनेची पात्रता काय आहे आणि याचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी म्हणजेच आत्मा योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पारंपरिक शेती करत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी या योजने मध्ये त्यांना प्रशिक्षण दिले जाते. सरकारकडून अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना चालली जात आहे.

आत्मा योजना म्हणजे काय?

आत्मा म्हणजे Agricultural Technology Management Agency (ATMA). या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, वैज्ञानिक पद्धती, नवीन कृषी तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढवण्याच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेती शाळा, शेतकरी मेळावे आणि अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळते. विशेषतः अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.

प्रशिक्षणाचा सर्व खर्च सरकार करते

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही तर प्रशिक्षणा दरम्यान जेवढा ही खर्च होतो तेवढा संपूर्ण खर्च केंद्र सरकार द्वारे उचलला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना ये- जा करण्यासाठीचा परिवहन खर्च पासून ते खाण्यापिण्याचा खर्चही  यामध्ये समावेश आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकरी आपल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये अन्य लोकांना आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याची पद्धतीबद्दल माहिती देऊ शकतो. जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. प्रशिक्षण कृषी विभागाअंतर्गत या योजनेमध्ये विविध कृषी संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

ATMA आत्मा योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे

ज्ञान ते कौशल्य म्हणजे प्रशिक्षण देण्यात येते.
ज्ञान दिल्यानंतर प्रदर्शन म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज देण्यात येते. 
उत्पादन कसे वाढवावे हे शिकवले जाते. शेतकऱ्यांना नवीन अनुभव देण्यासाठी नवीन संस्था आणि विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
शेती शाळामध्ये आधुनिक आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती कशी करतात याचे प्रशिक्षण दिले जाते.

ATMA योजनेची अर्ज प्रक्रिया

केंद्र सरकारची आत्मा ही योजना सर्व राज्यांमध्ये चालवली जात आहे आणि प्रत्येक राज्याच्या कृषी विभागानुसार अर्ज प्रक्रिया करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज केला जाऊ शकतो. अनेक राज्यांमध्ये शेतकरी कल्याण आणि कृषी योजना पोर्टलवरच या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी विभागामध्ये संपर्क करावा लागतो.

आत्मा योजना – कृषी विस्तार व्यवस्थेला नवीन ताकद

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कृषी विस्तार व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आत्मा योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.तंत्रज्ञान प्रसारातून कृषी समृद्धीकडे शेतकऱ्यांची वाटचाल करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 60 टक्के आणि राज्य सरकार 40% निधी देते.
योजनेचा मुख्य उद्देश
राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे.
राज्यातील शेती संशोधन व विस्तार योजनेद्वारे सक्षम करणे.
राज्यातील शेतकऱ्यांना वैज्ञानिक व नियोजनबद्ध शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करणे.

आत्मा योजनेअंतर्गत अनुदान व आर्थिक बाबी

आंतरराज्य प्रशिक्षण-1500 रुपये / प्रति दिवस/ शेतकरी
राज्यांतर्गत प्रशिक्षण-1250 रुपये / प्रति दिन/ प्रति शेतकरी
जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण- 500 रुपये / प्रतिदिन/ प्रति शेतकरी
कृषी प्रात्यक्षिके- 6000 रुपये प्रत्येक लाभार्थी
शेती शाळा- 20200 ते 32 हजार 400 आणि 29 हजार 880 रुपये. 
नाविन्यपूर्ण उपक्रम- 50 हजार रुपये तालुका/वर्ष

योजनेचे प्रमुख उपक्रम

शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व अभ्यास दौरे.
प्रात्यक्षिके व शेती शाळा.
किसान मेळावे व प्रदर्शन. 
महिला व युवांसाठी कौशल्य विकास.
शेतकरी शास्त्रज्ञ संवाद घडवून आणणे. 
शेती गट एफपीओ स्थापना.

महाराष्ट्र राज्य कृषी विभागात द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत लाभ घ्यावा आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी यासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही राज्य सरकारच्या या क्यू आर कोड वर स्कॅन करूनही माहिती मिळू शकता.