Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • अध्यात्म
  • Webstories
  • मनोरंजन
  • उखाणे
  • बातम्या
Kisan Vikas Patra Yojana

Kisan Vikas Patra Yojana 2024 In Marathi : 5 वर्षात दाम दुप्पट योजना, तुम्ही केलाय का अर्ज

19 June 2024 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi : किसान विकास पत्र योजना 2024 मराठी माहिती
  • किसान विकास पत्र योजना 2024
  • ठळक मुद्दे
  • किसान विकास पत्र योजनेतून व्याजदर किती मिळतो?
  • 5 लाखाची गुंतवणूक 10 लाखाचा परतावा
  • सुरक्षित गुंतवणूक, अधिक परतावा
  • 1000 रुपये पासून करू शकता गुंतवणूक
  • 115 महिन्यात पैसे होतात दुप्पट
  • केव्हीपी खाते उघडण्याची प्रक्रिया
  • किसान विकास प्रमाणपत्र योजनेसाठीची कागदपत्रे
  • किसान विकास पत्र योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
  • किसान विकास पत्र योजनेतून कर लाभ मिळेल की नाही?

Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi : किसान विकास पत्र योजना 2024 मराठी माहिती

Kisan Vikas Patra Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध बचत योजना देशभरात चालल्या जातात. त्याच अनुषंगाने एक गुंतवणुकीची योजना पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला जातो. या योजनेला किसान विकास पत्र योजना 2024 असे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी ही योजना देते. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी किसान विकास पत्र योजना हा चांगला पर्याय आहे.

Kisan Vikas Patra Yojana 2024 KVP या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.5 टक्क्याहून अधिक व्याजदर तुमच्या गुंतवणुकीवर देत आहे. चला तर मग किसान विकास पत्र योजना म्हणजे काय? या योजनेत कोण गुंतवणूक करू शकते याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Kisan Vikas Patra Yojana

Kisan Vikas Patra Yojana 2024 कोरोना काळानंतर देशात गुंतवणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण भविष्यात येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण वेळप्रसंगी अशी गुंतवणूक फायद्याची ठरते. पोस्ट ऑफिसकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला चांगला नफाही दिला जातो. तसेच पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खात्रीची आणि जोखीम न घेता गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट परतावा दिला जातो.

किसान विकास पत्र योजना 2024

Kisan Vikas Patra Yojana 2024

Kisan Vikas Patra Yojana KVP पोस्ट ऑफिसने सुरु केलेली किसान विकास पत्र ही एक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मोठा नफा गुंतवणूकदारांना दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यात दुप्पट होतात. या योजनेतून तुम्ही शंभरच्या पटीत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागते. विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये कमाल मर्यादा नाही. त्यामुळे तुम्हाला हवी असेल तेवढे पैसे तुम्ही या योजनेत गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता.

Kisan Vikas Patra Yojana KVP या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा अधिक खाते उघडून गुंतवणूक करता येते. दहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने ही खाते उघडून गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून व्यक्ती कितीही खाते उघडू शकत असल्यामुळे गुंतवणूक करण्यास मोठा वाव आहे.

ठळक मुद्दे

किसान विकास पत्र योजना 2024 मराठी

Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi

किसान विकास पत्र योजना 2024

Kisan Vikas Patra Yojana 2024

किसान विकास पत्र योजनेतून व्याजदर किती मिळतो?

Kisan Vikas Patra Yojana Interest Rate

5 लाखाची गुंतवणूक 10 लाखाचा परतावा

Kisan Vikas Patra Scheme

सुरक्षित गुंतवणूक, अधिक परतावा

Kisan Vikas Patra Scheme

1000 रुपये पासून करू शकता गुंतवणूक

Kisan Vikas Patra Scheme

115 महिन्यात पैसे होतात दुप्पट

Kisan Vikas Patra Scheme

केव्हीपी खाते उघडण्याची प्रक्रिया

Kisan Vikas Patra Yojana KVP Account Opening Process

किसान विकास प्रमाणपत्र योजनेसाठीची कागदपत्रे

Kisan Vikas Patra Yojana Documents

किसान विकास पत्र योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Kisan Vikas Patra Yojana Apply

किसान विकास पत्र योजनेतून कर लाभ मिळेल की नाही?

Kisan Vikas Patra Yojana

किसान विकास पत्र योजनेतून व्याजदर किती मिळतो?

Kisan Vikas Patra Yojana Interest Rate

Kisan Vikas Patra Yojana पोस्ट ऑफिसने सुरु केलेल्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून व्याजदर तिमाही आधारावर पोस्ट ऑफिस ठरवते. पोस्ट ऑफिसच्या सध्याच्या योजनेत 7.5% व्याज दिले जाते हे व्याजदर वार्षिक दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत पैसे दुप्पट होतात. त्यासाठी गुंतवणूक कालावधी पूर्ण  होणे आवश्यक आहे.

5 लाखाची गुंतवणूक 10 लाखाचा परतावा

Kisan Vikas Patra Scheme

Kisan Vikas Patra Yojana जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटी पर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत पैसे जर ठेवले तर तुम्हाला 7.5 टक्के व्याजाने 5 लाख रुपये मिळतील म्हणजेच गुंतवणूकदारांना मुदतपूर्ती नंतर 10 लाख रुपये एकूण रक्कम परतावा म्हणून मिळेल. त्यामुळे या योजनेतून केलेली गुंतवणूक दाम दुप्पट असेल आणि गुंतवणूकदाराला फायद्याचे ठरेल. ज्या नागरिकांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी किसान विकास पत्र योजना खूप फायद्याची योजना आहे आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. KVP या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि कमी वेळामध्ये अधिक फायदा या योजनेतून मिळतो.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

सुरक्षित गुंतवणूक, अधिक परतावा

Kisan Vikas Patra Scheme

Kisan Vikas Patra Scheme प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक आणि सुरक्षित गुंतवणूक करावी असे वाटते, त्या योजनेतून परतावा चांगला मिळावा हाही त्यांचा उद्देश असतो तर तुमच्या अशा गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी योजना म्हणजेच किसान विकास पत्र योजना होय. ही योजना पोस्ट ऑफिस कार्यालयाने छोट्या बचत योजना म्हणून गुंतवणुकीचा चांगला पर्याय नागरिकांना दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेच्या KVP माध्यमातून गुंतवणूकदारास 7.5 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत तुम्ही एक हजारापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

1000 रुपये पासून करू शकता गुंतवणूक

Kisan Vikas Patra Scheme

Kisan Vikas Patra Scheme पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केलेल्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता तसेच या योजनेत अधिकाधिक गुंतवणुकीचा पर्याय दिला आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. मात्र तुम्हालाही रक्कम गुंतवताना 100 च्या पटीत गुंतवावी लागेल. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकता तसेच किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून नॉमिनीची सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत 10 वर्षापेक्षा अधिक वयाची मुले देखील स्वतःच्या नावाने केव्हीपी खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

115 महिन्यात पैसे होतात दुप्पट

Kisan Vikas Patra Scheme

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुमचे पैसे 115 महिन्यात दुप्पट होतात. समजा तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यासाठी 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम 2 लाख रुपये होईल आणि जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये परतावा मिळेल म्हणजे तुमची रक्कम दुप्पट होईल. सध्याच्या पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर दिले जाते. त्यामुळे तुम्हाला व्याजावरही व्याज पोस्ट ऑफिस देते आणि तुमची रक्कम दुप्पट होते.

Kisan Vikas Patra Yojana पोस्ट ऑफिसच्या या योजनेत यापूर्वी पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागायचे मात्र आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये याचा कालावधी कमी करून 120 महिने केला होता आणि काही महिन्यानंतर अधिक लाभ घेण्यासाठी सरकारने पुन्हा कालावधी कमी करून 115 महिने ठेवला आहे. त्यामुळे 115 महिन्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा दिला जातो.

केव्हीपी खाते उघडण्याची प्रक्रिया

Kisan Vikas Patra Yojana KVP Account Opening Process

  • पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी सोपी पद्धत ठेवली आहे.
  • पोस्ट ऑफिस मध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल.
  • त्यानंतर गुंतवणुकीचे रक्कम चेक, रोख किंवा डिमांड ड्रॉप मध्ये जमा करावे लागते.
  • अर्जदाराला अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागते.
  • पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना आहे.
  • प्रत्येक तीन महिन्यांनी सरकार व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार बदल करत असते.
  • किसान विकास पत्र योजनेत कोण गुंतवणूक करण्यास पात्र आहे
  • पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • या योजनेत सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉईंट अकाउंटची सुविधा देण्यात आली आहे.
  • ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • पालक त्यांच्या नावाने ही खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • किसान विकास पत्र योजनेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक
  • पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून 1000 रुपये, 5000 रुपये 10000 रुपये आणि 50 हजार रुपयाची प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत, जी तुम्ही खरेदी करू शकता.

किसान विकास प्रमाणपत्र योजनेसाठीची कागदपत्रे

Kisan Vikas Patra Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

मतदान ओळखपत्र

लायसन

पासपोर्ट आकाराचा फोटो

केव्हीपी अर्ज फॉर्म

रहिवासी प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

Kisan Vikas Patra Yojana

किसान विकास पत्र योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Kisan Vikas Patra Yojana Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म घेऊन खाते उघडू शकता.

तुम्ही या योजनेचा अर्ज ऑनलाईन डाऊनलोड करून संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येतो.

हा अर्ज भरताना तुम्ही नॉमिनीचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे.

अर्जावर खरेदीची रक्कम स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

तुम्ही जर चेक द्वारे पैसे भरत असल्यास तुम्हाला अर्जावर चेक नंबर लिहावा लागेल.

या योजनेच्या माध्यमातून एकल खाते किंवा संयुक्त खाते ही उघडून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

लाभार्थी अर्जदार अल्पवयीन असल्यास त्याची तिची जन्मतारीख, पालकाचे नाव, पालकाचा पत्ता आणि मुलाशी असलेले नाते लिहिणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुम्ही अर्ज जमा करू शकता.

किसान विकास पत्र योजनेतून कर लाभ मिळेल की नाही?

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफ्याच्या रकमेवर कर भरावा लागेल.

इतर योजना जसे की राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याजदर मुक्त असते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दिलेली सुट या योजनेला लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही केलेली गुंतवणूक आयकाराच्या कक्षेत असेल. मात्र पीपीएफ खाते व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक कलम 80 सी अंतर्गत प्रमुख आहे तसेच बँकेमध्ये 5 वर्षासाठी मुदत ठेवी मध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80 सी माध्यमातून कर सुट दिली जाते.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

Post Views: 682
Categories Daily Updates, केंद्र सरकार योजना Tags Kisan Vikas Patra Scheme, Kisan Vikas Patra Yojana, Kisan Vikas Patra Yojana 2024, Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi, Kisan Vikas Patra Yojana Apply, Kisan Vikas Patra Yojana Documents, Kisan Vikas Patra Yojana Interest Rate, Kisan Vikas Patra Yojana KVP Account Opening Process, KVP
Free Scooty Yojana 2024 In Marathi :विद्यार्थीनिंना मिळणार मोफत स्कूटी
Bij Bhandval Yojana 2024 In Marathi : तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाखाचे कर्ज

Recent Post

  • What is an e PAN Card
    What is an e PAN Card 2025 in marathi : ई-पॅन कार्ड म्हणजे काय कसे कराल डाउनलोड9 May 2025
  • road accident victims to get cashless treatment of up to rs 1.5 lakh
    road accident victims to get cashless treatment of up to rs 1.5 lakh : अपघातग्रस्तांना दीड लाख रुपयांचे कॅशलेस उपचार8 May 2025
  • Mukhyamantri sahayata nidhi
    Mukhyamantri sahayata nidhi Yojana apply 2025 in marathi : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी असा करा अर्ज7 May 2025
  • Mock Drill in India
    Mock Drill in India 2025 in marathi : 54 वर्षानंतर देशात मॉक ड्रिल6 May 2025
  • pm e-drive scheme
    pm e-drive scheme electric two wheeler subsidy now in 5 days : आता इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मिळणार फक्त 5 दिवसात अनुदान6 May 2025

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2025 yojanamazi.com