Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 Information In Marathi : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 मराठी माहिती
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 आज आपण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. देशभरातील एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातीलक मुलींना उच्च प्राथमिक शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून या वर्गातील सर्व मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. जेणेकरून मागासवर्गीय भागातील मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये हा सरकारचा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 देशभरात केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान ना प्रोत्साहन देण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना च्या माध्यमातून देशभरात 750 निवासी शाळा सुरू करण्याचे निश्चित केले होते. या योजनेची सुरुवात 2006-07 मध्ये करण्यात आली होती. या शाळेमध्ये कमीत कमी 75 जागा अनुसूचित जाती व जमाती, मागासवर्गीय वर्ग आणि अल्पसंख्यांक वर्गातील मुलींसाठी आरक्षित ठेवल्या जातात व उर्वरित 25 टक्के मध्ये दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबातील मुलींना प्रवेश दिला जातो. बेटी बचाव बेटी पढाव योजनेला सार्थक बनवण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका निवासी शाळा मध्ये आता बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. ही योजना देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आलेली आहे.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana देशातील मुलींना साक्षर बनवण्यासाठी आणि मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींसाठी निवासी शाळेची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे मुलींचे ज्ञान आणि साक्षरता दर वाढण्यास मदत होईल.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ऑगस्ट 2004 मध्ये केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून निवासी शाळा स्थापन केली आहे. यामध्ये ओबीसी, एसटी, एससी जसे की गरीब क्षेत्रातील अल्पसंख्यांक मुलींना प्रवेश दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मागास वर्गातील विशेषतः अनुसूचित जाती जमातीतील आणि अन्य मागासवर्गीय वर्गातील मुलींना उच्च प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय KGBV योजना देशात शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या वर्गीतील मुलींना साक्षर केले जाते. महिला ग्रामीण साक्षरता राष्ट्रीय दर ज्या ठिकाणी कमी आहे. त्या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून एसटीएससी ओबीसी आणि अल्पसंख्यांक मुलींना कमीत कमी 75 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात आणि 25% शिल्लक जागा गरीब कुटुंबातील आणि दारिद्र्यरेषेखालील मुलींना या योजनेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो.
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana देशातील 14 ते 18 वयोगटातील मुलींना अल्पसंख्याक समुदाय आणि गरीब कुटुंबातील मुलींना वंचित समूहामध्ये प्रवेश दिला जातो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते जेणेकरून मुलींना प्राथमिक आणि माध्यमिक मध्ये चांगली शिक्षण मिळू शकेल कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शैक्षणिक संस्था मागासवर्गीय भागात मुलींसाठी कमीत कमी एक निवासी शाळा सुरू करत असते.
ठळक मुद्दे
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2024 मराठी माहिती
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 Information In Marathi
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची थोडक्यात माहिती
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 In Short
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची आवश्यक कागदपत्रे
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Documents
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची पात्रता
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Eligibility
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची अर्ज प्रक्रिया
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Apply
योजनेच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या सुविधा
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 In Marathi
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची थोडक्यात माहिती
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
उद्देश | देशातील मुलींना साक्षर करणे |
विभाग | शिक्षण मंत्रालय भारत सरकार |
लाभार्थी | देशातील 14 ते 18 वयातील मुली |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://samagra.education.gov.in/kgbv.html |
आज देशातील अनेक गरीब कुटुंब कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेचा लाभ घेत आहेत ते या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या मुलींना शिक्षण देत आहेत. त्यांच्यासाठी ही योजना एक वरदान ठरत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळत आहे. त्या शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. देशातील एससी, ओबीसी, एसटी तसेच मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळत आहे. अशा परिसरामध्ये निवासी शाळा आवश्यकता आहे तेथे या शाळा सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून ज्या भागात कमी शिकलेल्या मुली आहेत तेथे या शाळा सुरू करण्यात येतात. जेणेकरून मुलींना शाळेत प्रवेश मिळवून देऊन त्यांना चांगले शिक्षण दिले जाऊ शकेल.
ग्रामीण भागात अजूनही मागासवर्गीय वर्गात लिंगभेद पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील शाळेमध्ये ही मुलींपेक्षा मुलांचेच प्रवेश अधिक दिसत होते. त्यामुळे कस्तुरबा गांधी योजनेच्या माध्यमातून पुढाकार घेत वाडी वस्ती गावातील मागासवर्गातील मुलींना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची आवश्यक कागदपत्रे
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Documents
जातीचे प्रमाणपत्र
बीपीएल प्रमाणपत्र
प्राथमिक शाळेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची पात्रता
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Eligibility
ओबीसी, अनुसूचित जाती, मागासवर्गीय कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.
14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनाच या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो.
कमी महिला साक्षरता प्रमाण असलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या मुली ज्यांना प्राथमिक शाळा पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत त्यांना या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेची अर्ज प्रक्रिया
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana Apply
या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही मे महिन्याच्या जवळपास सुरू होते त्यानंतर तुम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मध्ये नोंदणी करू शकता. तुमच्या परिसरातील शाळा सोडण्यासाठी या लिंकवर तुम्ही क्लिक करून माहिती मिळू शकतात.
योजनेच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या सुविधा
Kasturba Gandhi Balika Vidyalaya Yojana 2024 In Marathi
- शैक्षणिक सुविधा
एका शाळेमध्ये 350 मुलींना प्रवेश दिला जातो, मोफत गणवेश आणि पुस्तकाचे वाटप केले जाते, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते, सतत मूल्यमापन करण्यात येते.
- पायाभूत सुविधा
मजबूत शाळेची इमारत बांधली जाते, दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात.
- शाळा व्यवस्थापन
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा खरेदी समिती, शिक्षण पर्यावरण, शाळेचे वातावरण, शिक्षण संवर्धन प्रणाली समुदाय आणि नागरी समाजाकडून पाठिंबा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली.
- सह अभ्यासक्रम
अभ्यासक्रम खेळ आणि खेळणे आरोग्य तपासणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार केल्यास गुन्हे दाखल करा
मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
प्रधानमंत्री किसान संपदा योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना