jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : भ्याड हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना माफ केले जाणार नाही

Pahalgam Terrorist Attack : कठोर कारवाई करणार- अमित शाह

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासन कडून 16 मृत्यू झालेल्या आणि दहा जखमी झालेल्यांची यादी जारी करण्यात आली आहे.

Pahalgam Terrorist Attack : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगर येथे पोहोचले आहेत, तिथे त्यांनी मुख्यमंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली आहे.

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Pahalgam Terrorist Attack : इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बैसरण येथे पर्यटकावर बेचूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा आकडा वाढण्याची भीती निर्माण केली जात आहे.

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध देशातील सर्वच राजकीय नेत्याकडून करण्यात येत आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यासाठी जबाबदार असणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.

Pahalgam Terrorist Attack : या घटनेमुळे मी व्यतीत झालो आहे मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. जम्मू आणि कश्मीर मधील पहलगाम येथे झालेले दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

Pahalgam Terrorist Attack : या दहशतवादी कृत्या मागे सहभागी असणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांचा दृष्ट अजेंडा आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. दहशतवादी विरोधात लढण्याचा आमचा निर्धार आढळ आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की कश्मीर मधून खूपच दुःखद बातमी समोर आली आहे. दहशतवादी विरोधात भारतासोबत अमेरिका मजबूत उभी आहे.

Pahalgam Terrorist Attack : आम्ही मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्याला शांती आणि जखमींना ठीक होण्याचे प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारताला आमचे पूर्ण समर्थन आहे. आणि सहानुभूती व्यक्त करतो, आमच्या संवेदना तुमच्या सर्वांसोबत आहेत.

jammu Kashmir pahalgam terror attack latest update tourists killed injured amit shah marathi news : भारतीय नौसेनेचे एक अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल ज्यांचे वय 26 वर्षे आहे.

Pahalgam Terrorist Attack :पहलगाम हल्ल्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे ते हरियाणाचे मूळ रहिवासी आहेत आणि 16 एप्रिलला त्यांचे लग्न झाले आहे. नरवाल कोच्ची मध्ये नियुक्त होते सध्या ते सुट्टीवर होते.