Members of Parliament Local Area Development Scheme 2024 In Marathi : मतदारसंघाच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी

Members of Parliament Local Area Development Scheme 2024 Information In Marathi : संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना 2024 मराठी माहिती

Members of Parliament Local Area Development Scheme : देशातील लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून खासदारांच्या मतदारसंघांचा विकास करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. MPLADS या योजनेच्या माध्यमातून खासदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी वर्षाला पाच कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. या माध्यमातून खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करत असतात यातून देशातील प्रत्येक मतदारसंघाचा विकास होऊन देशाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल हा उद्देश असतो.

Members of Parliament Local Area Development Scheme

Members of Parliament Local Area Development Scheme महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून देशभरातील नागरिकांसाठी विविध जनकल्याण योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीसह आर्थिक वर्ष 2021- 22 च्या उर्वरित काळात आणि आर्थिक वर्ष 2025 -26 पर्यंत संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) पुन्हा सुरू करण्यासाठी आणि ही योजना सुरू राहण्यासाठी मान्यता दिली आहे. चला तर आपण या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ही योजना म्हणजे काय? या योजनेचे उद्देश काय आहेत, पार्श्वभूमी काय आहे संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहू…

Members of Parliament Local Area Development Scheme देशातील प्रत्येक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून खासदाराच्या मतदारसंघांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि टिकाऊ सामुदायिक मालमत्तेच्या निर्मितीवर भर देऊन विकास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना मराठी माहिती

Members of Parliament Local Area Development Scheme 2024 Information In Marathi

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजे काय?

What Is Members of Parliament Local Area Development Scheme

वर्ष निहाय खर्च

khasdar nidhi yojana

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचे लक्ष्ये

Members of Parliament Local Area Development Scheme

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा परिणाम

Members of Parliament Local Area Development Scheme

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजे काय?

What Is Members of Parliament Local Area Development Scheme

केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे खासदाराच्या मतदार संघात विविध विकास कामे करणे हा आहे. MPLADS या योजनेच्या माध्यमातून खासदाराच्या मतदार संघामध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाणी, प्राथमिक शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा, स्वच्छता, रस्ते विकास आदी कामे करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Members of Parliament Local Area Development Scheme या योजनेच्या माध्यमातून संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खासदाराला त्याच्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपये मिळू शकतात. हा निधी दोन टप्प्यात अडीच – अडीच कोटी रुपये दिला जातो. यासाठी खासदारांना पुढाकार घेऊन आपल्या मतदारसंघांमध्ये विविध विकास कामे करावी लागतात, जेणे करून मतदार संघाचा विकास होण्यास मदत होईल. दरम्यान covid-19 चा आरोग्य आणि समाजावरील प्रतिकूल परिणामाचे व्यवस्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने 6 एप्रिल 2020 रोजी झालेल्या बैठकीत 2020 -21 आणि 2021 -22 या आर्थिक वर्षात ही योजना न चालवण्याचा आणि हा निधी कोविड 19 साथीच्या व्यवस्थापन करण्यासाठी वित्त मंत्रालय देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र देशाच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कौशल्य विकास आणि देशभरात रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि लोकांना आत्मनिर्भरण बनवण्याच्या उद्देशाने साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2021 22 च्या उर्वरित काळात संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीसह 2025 -26 पर्यंत ही योजना चालू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

khasdar nidhi yojana आर्थिक वर्ष 2021 -22 च्या उर्वरित काळासाठी मंत्रालयाने प्रत्येक खासदाराला दोन कोटी रुपयांचा निधी एका हप्त्यात दिला होता. तसेच आर्थिक वर्ष 2022- 23 ते आर्थिक वर्ष 2025- 26 या कालावधीतील दोन हप्त्यांमध्ये प्रत्येकी अडीच कोटी रुपये याप्रमाणे वर्षाला पाच कोटी रुपये प्रत्येक खासदाराला विकास कामासाठी देण्यात येतात. योजना सुरू झाल्यापासून ५४१७१.०९ कोटी वित्तीय भारासह एकूण 19 लाख 86 हजार 206 देशात कामे प्रकल्प पूर्ण करण्यात आली आहेत.

MPLADS  संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना द्वारे एकूण 17,417 00 कोटी रुपये खर्च 2025- 26 पर्यंत येणार आहे.

वर्ष निहाय खर्च

khasdar nidhi yojana

आर्थिक वर्ष 2021-22 खर्च (कोटीमध्ये) 1583.5

आर्थिक वर्ष 2022 23 खर्च 39 65.00

आर्थिक वर्ष 2023 24 खर्च 3958.50

आर्थिक वर्ष 2024 25 खर्च 3955.00

आर्थिक वर्ष 2025 26 खर्च 39 55.0

एकूण खर्च 17417.00

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचे लक्ष्ये

Members of Parliament Local Area Development Scheme

khasdar nidhi yojana या योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नियंत्रित केले जाते. या योजनेच्या माध्यमातून प्रक्रिया संसद सदस्यांनी नोडल जिल्हा प्राधिकरणाकडे कामाची शिफारस करण्यापासून सुरू होते. संबंधित नोडल जिल्हा प्राधिकरण संसद सदस्यांनी शिफारस केलेल्या पात्र कामाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि योजनेच्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या वैयक्तिक कामाचा आणि खर्च केलेला रकमेचा तपशील राखण्यासाठी जबाबदार आहेत.

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा परिणाम

Members of Parliament Local Area Development Scheme

khasdar nidhi yojana ही योजना केंद्र सरकारने पुन्हा सुरू केल्यामुळे रखडलेली विकास कामे पुन्हा सुरू होऊन लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खासदारांना निधी मिळेल.

त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या आकांक्षा विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

khasdar nidhi yojana या योजनेच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही मदत होईल.

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना 2024 ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून खासदारांना त्यांच्या मतदारसंघांचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपयांची आर्थिक निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे खासदाराना त्यांच्या मतदारसंघात पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छता, रस्ते इत्यादी क्षेत्रात टिकाऊ सामुदायिक मालमत्त्यांच्या निर्मितीवर भर देऊन विकासात्मक कामांची शिफारस करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

MPLADS केंद्र सरकारने या योजनेसाठी ठरवून दिलेल्या अटीचे पालन करून खासदार या योजनेच्या माध्यमातून मतदार संघाचा विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मिळू शकतो. हा निधी त्यांना दोन टप्प्यात अडीच- अडीच कोटी रुपये अशा पद्धतीने दिला जातो. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच मतदार संघातील विकास करणे हा मुख्य उद्देश आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

कृषी उन्नती योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजना 

विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

राष्ट्रीय आयुष मिशन

मुख्यमंत्री योजना दूत 

वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

अटल भूजल योजना