The Names Of These 4 Heirs Came Next ही चार नावे आली समोर
Who Is The Successor Of Ratan Tata : अलीकडेच टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईत 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारी कोण असणार? यावर चर्चा सुरू आहे. आता या संदर्भात एक माहिती पुढे आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झालेल्या हुरून इंडिया रिच लिस्ट नुसार रतन टाटा यांच्या कडे टाटा सन्स मध्ये 0.82 हिस्सेदारी होती. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 7900 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उरलेल्या संपत्तीला मिळून पाहिले तर त्यांची एकूण संपत्ती दहा हजार कोटीपेक्षा अधिक आहे.
Ratan Tata रतन टाटा यांनी इच्छापत्रात वारसदारांची नावे निश्चित केली. त्यानुसार जबाबदारीचे वाटप त्यांचे नजीकचे लोक करणार आहेत. या इच्छापत्रात त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जिजीभॉय, वकील दारायस खंबाटा आणि कनिष्ठ मित्र मेहली मिस्त्री यांच्या नावांचा समावेश आहे. हे इच्छापत्र सार्वजनिक केलेले नाही. परंतु हे स्पष्ट आहे की टाटांच्या संपत्तीचा मोठा वाटा चॅरिटीसाठी समर्पित केला आहे.
मेहली मिस्त्री हे त्यांचे जवळचे मित्र. त्यांनी Tata Trust टाटा ट्रस्ट सोबत अनेक वर्ष काम केले. टाटा ट्रस्ट Tata Trust मध्ये टाटा संस्था 52% हिस्सा असून कंपनीच्या संचालनात महत्त्वाची भूमिका टाटा ट्रस्ट ची आहे. टाटा ट्रस्ट चे काम सामाजिक आणि परोपकारी कामात गुंतवणूक करणे आहे.
वकील दारायस खंबाटा यांनी स्पष्ट केले की त्यांनी इच्छापत्राचा ड्राफ्ट तयार केला नव्हता किंवा याविषयी कोणताही सल्ला दिला नव्हता. वकील दारास खंबाटा यांच्या मते त्यांनी टाटांच्या इच्छा पत्राला त्यांच्या निधनानंतरच पाहिले आहे. अखेर इच्छापत्राच्या एक्झिक्युटरची ही जबाबदार आहे. Ratan Tata टाटांच्या अंतिम इच्छेचे पालन व्हावे टाटा यांचे इच्छापत्र स्पष्ट करते की, ते संपत्तीपेक्षा परोपराला अधिक महत्त्व देत होते.