Sanjeevani Yojana 2024 In Marathi : वृद्धांना मिळणार मोफत उपचार

Sanjeevani Yojana 2024 Information In Marathi : संजीवनी योजना 2024 मराठी महिती

Sanjeevani Yojana 2024 : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांना मोफत उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी 23 डिसेंबर पासून नोंदणी प्रक्रियाही सुरू होणार आहे.

Sanjeevani Yojana 2024 दिल्लीमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांसाठी अनेक योजना सुरू केले आहेत. नुकत्याच अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मधील महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरुवात केली आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व वृद्ध नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या हेतूने संजीवनी योजना Sanjeevani Yojana सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि खाजगी अशा सर्व रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील.

वृद्ध नागरिकांना दिल्ली सरकारचे गिफ्ट

Delhi Sanjeevani Yojana 2024 दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांसाठी संजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान अरविंद केजरीवाल म्हणाले की दिल्लीतील आमच्या सर्व वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीमध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही केजरीवाल गॅरंटी आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरी जाऊन या योजनेसाठी नोंदणी करणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकावर करण्यात येणाऱ्या संपूर्ण उपचाराचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे अशी माहिती केजरीवाल यांनी यावेळी बोलताना दिली.

Sanjeevani Yojana

काय आहे संजीवनी योजना

Delhi Sanjeevani Yojana संजीवनी योजना सुरू करण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी 18 डिसेंबर रोजी केली. या योजनेअंतर्गत 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. याचा लाभ सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयात उपलब्ध असेल. या योजनेत उपचाराची रक्कमेची कुठलीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आपले वार्षिक उत्पन्न किती आहे हे सांगण्याची ही आवश्यकता नाही.

या योजनेचा कोणाला मिळेल लाभ

Sanjeevani Yojana दिल्ली सरकारने सुरू केलेल्या संजीवनी योजनेचा लाभ दिल्लीत राहणाऱ्या 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी वयाचे प्रमाणपत्र आवश्यक नसेल. तसेच व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब दोघांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. मात्र या योजनेचा लाभ केवळ दिल्लीतील रहिवासी असलेल्या जेष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे. अन्य राज्यातून येऊन दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांकडे दिल्लीतील कायमचा पत्ता नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, पण जर कोणाकडे दिल्लीतील मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड सारखे कागदपत्र असतील तर या योजनेचा लाभ त्यांनाही घेता येणार आहे.

दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

संजीवनी योजनेचे अर्ज प्रक्रिया

Sanjeevani Yojana Apply

संजीवनी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 23 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. यासाठी नागरिकांना कुठेही जाऊन रांगा लावण्याची आवश्यकता नाही. कारण आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पात्र वृद्ध नागरिकांचे नोंदणी करून त्यांना विशेष कार्ड देणार आहेत. हे कार्ड सांभाळून ठेवणे आवश्यक असेल.

60 वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार

Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांनी 18 डिसेंबर रोजी घोषणा केली होती की, दिल्ली विधानसभा निवडणुका नंतर आमचे आपकी सरकार स्थापन झाल्यानंतर संजीवनी योजना लागू करून दिल्लीतील 60 वर्षापेक्षा अधिक वृद्ध वय असणाऱ्यांना मोफत उपचार दिले जातील. मात्र त्यांनी निवडणुकीपूर्वीच ही योजना सुरू केली आहे. वृद्धांसमोर एक मोठा प्रश्न असतो आपल्या वैद्यकीय खर्चाचा. जसे वय वाढत जाते तसेच असे शंभर हजार व्यक्तीला घेरतात. व्यक्तीची सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे यावर उपचार कसे करावे? त्यामुळे मी दिल्लीतील वृद्धांसाठी संजीवनी योजना सुरू करण्याची घोषणा करत आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व वृद्ध त्यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. यासाठी दिल्ली सरकारने ही योजना सुरू केली आहे. जेणेकरून वृद्धांना योग्य वेळी आणि मोफत देखील उपचार मिळू शकतील अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

तसेच आपचे संयोजक केजरीवाल म्हणाले की, वृद्धाला वाटले की सरकारी रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत तर ते घेऊ शकतात. तिथेही त्यांना मोफत उपचार पुरवणे ही दिल्ली सरकारची जबाबदारी आहे. वृद्ध हा गरीब असो की श्रीमंत संजीवनी योजनेअंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. तसेच रुग्णावर उपचार करताना खर्च रकमेची कुठलीही लिमिट असणार नाही. वृद्धावर जेवढ्याही हजारावर खर्च होईल तेवढा खर्च दिल्ली सरकार करणार आहे अशी ग्वाही Arvind Kejriwal केजरीवाल यांनी दिली आहे.