Makar Sankranti 2025 In Marathi : यंदाची मकर संक्रांत कोणत्या रंगावर

Makar Sankranti 2025 Information In Marathi : जाणून घेऊया मकर संक्रांत 2025 ची सविस्तर माहिती

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत आहे. दरवर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येते.

Makar Sankranti 2025 In Marathi : मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो. 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला कींक्रांत असे म्हणतात.

संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ होतो. मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? ते आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ.

Makar Sankranti 2025 In Marathi मकर संक्रांति हा दरवर्षी 14 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला येणाऱ्या सण आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती हा कापणीचा सण म्हणून देखील ओळखला जातो.

Makar Sankranti 2025 वैदिक पंचांगानुसार मकर संक्रांत 2025 ही यावर्षी 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव सकाळी 9 वाजून 03 मिनिटांनी मकर राशित प्रवेश करणार आहेत. दैनिक पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल.

Makar Sankranti 2025 या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9 वाजून 03 मिनिटांपासून ते सायंकाळी 5 वाजून 46 मिनिटापर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर गंगास्नान करून दानधर्म करावा. त्याचे चांगले फळ मिळते.

यावर्षीचा मकर संक्रांतीच्या शुभ कालावधी हा 8 तास 42 मिनिटे आहे. तर पवित्र कालावधी 1 तास 45 मिनिटांचा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगास्नान आणि दान करावे. या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते.

Makar Sankranti 2025 सूर्य मकर राशित प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होतात. हा सण नवीन पिकाच्या आगमनाची प्रतीक आहे. मकर संक्रांतीच्या या सणापासून सूर्य उत्तरायण होतो. म्हणजेच सूर्य दक्षिणायातून उत्तरायानाकडे जातो.

काळ्या रंगाच्या पोशाखाचे महत्त्व

Makar Sankranti मकर संक्रांति पासून दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात.

Makar Sankranti 2025 जानेवारी महिना म्हणजेच थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे.

अनेक जण म्हणतात की शुभकार्यात काळा रंग वापरत नाहीत पण संक्रांति मध्ये आवर्जून काळा रंगाचा पोशाख घातला जातो. ज्या महिलाची पहिली मकर संक्रांत आहे त्यांना तर काळा रंगाची साडी घालून त्यावर हलव्याचे दागिने घालतात.

यंदाची संक्रांत कोणत्या रंगावर

Makar Sankranti 2025 यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंगाचा पोशाख परिधान करणे टाळावे. संक्रांति देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात.

Makar Sankranti थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात, शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात. संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्त्व आहे.

Makar Sankranti 2025 संक्रांति देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो. यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे टाळावा.

यावर्षी पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये

यावर्षीची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये.