50+ makar sankranti ukhane marathi : 50+ मकर संक्रांती उखाणे

50+ makar sankranti ukhane marathi : 50+ मकर संक्रांती उखाणे

makar sankranti ukhane marathi : मकर संक्रांत जवळ आली आहे. पौष महिन्यात येणारा हा मकर संक्रांतीचा सण महिला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला खूप महत्त्व आहे.

makar sankranti ukhane marathi “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असं म्हणून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. ज्या मुलीचे लग्नानंतरचे पहिले वर्ष आहे त्या महिलांना तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करून त्यावर हलव्याचे दागिने घालतात आणि तिचा मकर संक्रांतीचा हा सण थाटामाटाने साजरा करतात.

Makar Sankranti 2025 आपल्याला माहीतच आहे की, कोणताही सण जवळ आला की महिलांसाठी सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे उखाणा. त्यातली त्यात नवीन लग्न झालेल्या मुलींना तर हमखास उखाणा घ्यायलाच लावतात. आणि मुलींसमोर प्रश्न येतो की आता काय आणि कसा उखाणा घ्यायचा?

Makar Sankranti 2025 तर या लेखाच्या माध्यमातून आपण 50 पेक्षा अधिक उखाणे मकर संक्रांतीसाठी तयार केले आहेत. अगदी सोपे उखाणे आहेत. अगदी सहजपणे पाठ होतील आणि लक्षात राहतील असे उखाणे Ukhane आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया स्पेशल मकर संक्रांतीसाठीचे 50 पेक्षा अधिक Ukhane उखाणे.

50+ मकर संक्रांती उखाणे

Ukhane for Female

मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,
__ राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

लग्नानंतर मकर संक्रातचा पहिला सण करते साजरा,
_____ रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.

गुळाने येते, तिळाला गोडी,
__ रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.

गोड गुळात, मिसळले तीळ,
_ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.

तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा
_ रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
_ रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…
_ चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.

दुसऱ्याची पतंग कापायला, पाहिजे धारधार मांजा,
_ रावांचे नाव घेते, गाव माझे लांजा.

आकाशात दिसतोय, पंतंगाचा वेगवेगळा रंग,
_ राव हवेत मला, ७ जन्मासाठी संग.

तिळगुळाचा स्वाद, आणि आनंदाची लहर,
__ रावांमुळे आली आयुष्यात, सुखाची बहर.

नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या, पूर्ण होवोत ईच्छा,
__ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मकर संक्रांतीचा आज आहे, शुभ पर्व,
__ रावांचे नाव घेताना, मला वाटतो गर्व.

तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी,
_ रावांचे नाव घेते, सुखी असावी आमची जोडी.

सूर्याची राशी बदलेल, तुमचे भविष्य,
__ रावांमुळे, बदलेल माझे आयुष्य.

हलव्याचे दागिने, त्यावर काळी साडी,
नेहमी खुश राहो _ आणि __ ची जोडी.

नाही मोठे पणाची अपेक्षा, नाही दौलताची इच्छा,
__ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,
__ रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.

आई वडिलांसारखी माया, नसते कोणाला,
_ रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला.

तिळगुळ आणि लाडूने करूया, तोंड गोड,
__ रावांना अशीच असुदे, दोन्ही परिवाराची ओढ.

रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण,
_ रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.

हलव्याच्या दागिन्यांची माळ, आणि सोन्याचा साज,
_ रावांचे नाव घेते, मकरसंक्रात आहे आज.

मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास,
_ रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.

भावनात जन्मली कल्पना, फुल गुंफिले शब्दांचे,
_ रावांच नाव घेते, मन राखून सर्वांचे.

नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून,
_ रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून.

आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,
__ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

आज मकर संक्रांत म्ह्णून, मी आले नटून,
आणि ची जोडी दिसते, सर्वात उठून.

संक्रांतीच्या सणाला आहे, सुगड्यांचा मान,
__ रावांच्या नावावर देते, हळदी कुंकूच वाण.

आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण,
_ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.

तिळगुळ दिल्या घेल्याने जातो, नात्यातला कडूपणा,
__ रावांची सौभाग्यवती म्हणून, मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा.

माहेरच्या मायेला, नाही कशाची सर,
_ रावांच्या सहवासात, न वाटे कसली कसर.

आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,
__ रावांची आहे, मला फार ओढ.

देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी,
__रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
__ रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला.

हळद लावते कुंकू लावते, वाण घेते घोळात,
__ रावांचे नाव घेते, सवासनीच्या मेळ्यात.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
_ राव बोलतात कमी, तोंड खोला.

संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व,
__ रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.

लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत,
__ रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात.

मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,
__ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.

संक्रातीच्या दिवशी, पतंग उडवतात आकाशात,
__ रावांच्या सहवासाने, सुख आले जीवनात.

पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,
_ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
__ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला.

तिळाची माया, गुळाची जोडी,
परमेश्वर सुखी ठेवो, _ आणि__ ची जोडी.

मराठ मोळे सण, आहेत किती छान,
_ रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान.

गुळाने येतो, लाडूला गोडवा,
__ रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा.

मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग,
_ रावांची आवड आहे, सत्संग.

संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून,
_ माझी दिसते, सर्वात उठून.

मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा,
__ रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.

तिळाचा लाडू, खायला येते मज्जा,
_ रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा.

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु,
पुढच्या वर्षी, __च्या पदरात बाळ पाडू.

संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,
__ रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.

मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,
__ रावांना नेमही सुचतात, कुठेपण चाळे.

मोठ्यांचा करावा आदर, मान सन्मान,
_ रावांच्या नावाने घेते, सौभाग्याचे वाण.

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा,
_ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

एका आठवड्यात, दिवस असतात सात,
__ रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.

आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी,
_ रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी.

काकवी पासून, बनवतात गुळ,
__ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने, आली संक्रांतीला गोडी,
तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे, आणि ची जोडी.

मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत,
_ रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.

मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा,
_ रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.

मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख,
__ रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.

ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
_ रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.

तिळाचे लाडू खाऊन, नवीन वर्षाची सुरवात करू गोड,
__ रावांना अशीच असुदे, लहान आणि थोर माणसांची ओढ.

मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड,
__ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड.

हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,
सर्वजण विचारतात __ हॅंडसम, भेटले कुठून.

पतंग उडवण्याची प्रथा सुरु केली, भगवान राम आणि हनुमानाने,
__ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहाप्रमाणे.

मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी,
मी घेतली _ रावांसोबत, आयुष्यभराची सवारी.

नवीन वर्ष आणि, आमचा पहिला सण संक्रातीचा
आणि _ चा जोड़ा राहो, सात जन्माचा.

लाडू बनवण्यासाठी, गुळात मिसळले तिळ,
_ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.

आली आली संक्रांत, घ्या सौभाग्याच वाण,
_ राव आहेत प्रेमळ, जशी आनंदाची खाण.

लज्जेचे बंधन असले तरी, नाव आहे ओठी,
_ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहापोटी.