Lado Protsahan Yojana 2025 In Marathi : मुलगी जन्मताच होणार लखपती

Lado Protsahan Yojana 2025 Information In Marathi : लाडो प्रोत्साहन योजना 2025 मराठी माहिती

Lado Protsahan Yojana 2025 : आता मुलीचा जन्म होताच ती लखपती बनणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यातील मुलींना मोठे गिफ्ट दिले आहे. लाडो प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री भजनलाल यांनी मुलीला देण्यात येणारी रक्कम दुप्पट केली आहे.

Lado Protsahan Yojana यापूर्वी मुख्यमंत्री राजश्री योजना अंतर्गत मुलींना 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येत होती. मात्र आता ही रक्कम वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. योजनेचे नाव राजश्री बदलून लाडो प्रोत्साहन योजना असे करण्यात आले आहे.

Lado Protsahan Yojana नाव बदलताच मुख्यमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. आरटीसी पूर्तता करणाऱ्या मुलींना सात हप्त्यामध्ये संपूर्ण 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

सर्व मुलींना मिळणार लाडो प्रोत्साहन योजनेचा लाभ

Rajasthan Government Lado Protsahan Yojana

Rajasthan Government Lado Protsahan Yojana राजस्थान सरकारने सुरू केलेल्या लाडो प्रोत्साहन योजनेचा लाभ केवळ सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलीला नाही तर मान्यताप्राप्त खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या बहिणींनाही देण्यात येणार आहे.

Rajasthan Government Lado Protsahan Yojana राजस्थानमधील प्रत्येक मुलगी आता या योजनेसाठी लाभार्थी आहे. ही योजना कुठल्याही विशेष वर्गासाठी नाही, कुठल्याही विशेष जातीधर्म, वय, उत्पन्न चार्ट असं काहीही नाही. सर्व प्रवर्गातील मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Lado Protsahan Yojana विशेष बाब म्हणजे या योजने अंतर्गत 7 हप्त्यामध्ये तब्बल 1 लाख रुपये रक्कम देण्यात येणार आहे. ज्या मुलीने पहिला आणि दुसरा हप्ता चा लाभ घेतला आहे अशाच मुलींना इतर सर्व हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या मुलीने पहिला आणि दुसरा हप्ता चा लाभ घेतला नाही त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजनेचा उद्देश

Lado Protsahan Yojana Purpose

लाडो प्रोत्साहन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे याबरोबरच त्याची शिक्षण आणि आरोग्य लक्षात घेत प्रौढ होईपर्यंत खर्च सरकार करणार आहे.

ज्या लोकांनी आतापर्यंत मुलीच्या जन्माला ओझे समजले त्या लोकांची विचार बदलण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

मुलीच्या जन्म, शिक्षण, कॉलेजचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत सरकार मुलीला आर्थिक मदत देणार आहे.

पचेरेकरू गरीब, वंचित वर्गातील कुटुंबीयांना मुलीचे ओझे वाटू नये.

Lado Protsahan Yojana

7 हप्त्यात मिळणार रक्कम

पहिला हप्ता :- मुलीचा जन्म झाल्यानंतर 2500 रुपये देण्यात येईल (सरकारी किंवा मान्यता प्राप्त सरकारी रुग्णालयात)

दुसरा हप्ता :- 2500 रुपये लसीकरणादरम्यान (जन्माच्या एक वर्षापर्यंत)

तिसरा हप्ता :- 4000 रुपये शाळेमध्ये पहिली मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर

चौथा हप्ता :- 5000  रुपये पाचवी मध्ये प्रवेश केल्यानंतर

पाचवा हप्ता :- 11000 रुपये दहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर देण्यात येईल

सहावा हप्ता :- 25 हजार रुपये बारावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर देण्यात येणार आहे.

सातवा हप्ता :- 50 हजार रुपये पदवी ला प्रवेश घेतल्यानंतर आणि 21 वर्षे पूर्ण केल्यानंतर देण्यात येईल

काय आहे पात्रता

Lado Protsahan Yojana Eligibility

केवळ राजस्थानतील मुलींनाच मिळणारा लाभ.

ज्या मुलीचा जन्म राजस्थान राज्यात झाला आहे अशाच मुलींना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

गर्भवती महिलेने तपासणी करतेवेळी राजस्थानची मूळ रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन अर्ज करण्याची गरज नाही.

गर्भवती महिला नोंदीच्या वेळी कागदपत्र बद्दल रुग्णालयात मुलीचा जन्म होईल त्यावेळी कागदपत्रे पीसीटीएस पोर्टलवर अपलोड करावे लागतील.

मुलीचा जन्म झाल्याची खात्री झाल्याबद्दल आई-वडीलांच्या बँक खात्यामध्ये पहिली हप्ता जमा करण्यात येईल.

त्यानंतर मुलीच्या ट्रॅकिंग साठी एक युनिट आयडी देण्यात येईल या आयडीच्या आधारावर पुढील हप्त्याची रक्कम त्या कुटुंबाला मिळत राहील.