Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2025 in Marathi : अन्नसुरक्षा योजना
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Marathi : आपल्या सरकारने अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता या योजनेमध्ये ज्यांच्या नावाची नोंदणी होईल त्यांना मोफत रेशन मिळणार आहे.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana महत्त्वाच्या योजनेअंतर्गत जवळपास 2 वर्षानंतर नवीन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान 26 जानेवारी पासून या योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
तर आता ज्या लोकांनी अजून पर्यंत अन्नसुरक्षा योजनेसाठी अर्ज केलेले नाही ते तत्काळ अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana आज आपण या लेखाच्या माध्यमातून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धतीने अर्ज भरू शकता. याबरोबरच आम्ही हे पण सांगू की अर्ज करण्यासाठी कुठली कागदपत्रे, पात्रता आवश्यक आहे.
PMGKAY केंद्र सरकारकडून चालवण्यात येणारी अन्नसुरक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे लोक मध्यमवर्ग आणि गरीब कुटुंबातील आहेत त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. योजनेतील लाभार्थी व्यक्तींना या योजनेअंतर्गत मोफत राशन देण्यात येणार आहे.
मागील 2 वर्षापासून या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक लोकांना आपल्या अर्जची नोंदणी करता आली नाही. मात्र आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र व्यक्ती आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अन्नसुरक्षा योजनेची पात्रता
PMGKAY Eligibility
या योजनेसाठी केवळ असेच अर्ज करू शकता ज्यांनी पात्रता पूर्ण केलेली आहे.
अर्जदार हा गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
ज्यांच्याकडे अंतोदय किंवा बीपीएल रेशन कार्ड आहे असेच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अल्पभूधारक शेतकरी ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
स्वच्छता कर्मचारी ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
अन्नसुरक्षा योजनेसाठीची कागदपत्रे
Antyodaya Anna Yojana Documents
बीपीएल रेशन कार्ड
अंतोदय रेशन कार्ड
शपथपत्र
मोबाईल नंबर
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
अन्नसुरक्षा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
Khadya Suraksha Yojana Apply
Khadya Suraksha Yojana देशातील जे पात्र नागरिक आहेत त्यांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. त्यांनी जवळच्या CSC केंद्राच्या माध्यमातून हा अर्ज करावा. तुम्ही अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचतील. त्यानंतर त्याच्याकडून तुमच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. जर तुम्ही पात्र ठरले तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. त्यानंतर तुमचा अर्ज पुढे पाठवला जाईल. ग्रामीण विकास अधिकारी जवळ अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हा अर्ज पाठवला जाईल. पुन्हा एकदा त्याची तपासणी होईल. तो एका अर्ज प्रक्रिया कमिटी द्वारे चेक करण्यात येईल. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, तलाठी, बुथ लेवलचे अधिकारी यांचा समावेश आहे.