Mahila Samman Savings Certificate Union Budget 2025 In Marathi : महिला सन्मान बचत योजना
Mahila Samman Savings Certificate अर्थसंकल्पापूर्वी असे अंदाज बांधले जात होते की, सरकार महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत योजना ची शेवटची तारीख अजून वाढू शकते, चला तर मग आज जाणून घेऊया यावर या Budget 2025 अर्थसंकल्पात काय निर्णय झाला आहे तर…
Union Budget 2025 चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. केंद्रीय बजेट त्यांनी आठव्या वेळी सादर केले आहे. या दरम्यान त्यांनी नवीन करव्यवस्था अंतर्गत इन्कम टॅक्स मध्ये 12 लाख रुपयापर्यंत वर्षाची उत्पन्न असणाऱ्यांना झिरो टॅक्स सह अनेक महत्त्वाचे घोषणा केल्या आहेत. त्यामुळे मध्यम आणि निम्न स्तरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mahila Samman Savings Certificate अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अंदाज लावले जात होते की, सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत योजना ची शेवटची तारीख वाढवू शकते किंवा यासारखीच एखादी नवीन योजना ची घोषणा करू शकते. ज्यामुळे त्या योजनेचा लाभ अशाच प्रकारे पुढे मिळत राहील. चला तर मग जाणून घेऊ सरकारने अर्थसंकल्पामध्ये Budget 2025 महिला सन्मान बचत योजना चे अंतिम तारीख पुढे वाढवली आहे की नाही?
काय आहे शेवटची तारीख?
Mahila Samman Savings Certificate केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 साठी चे बजेट सादर केले. या Union Budget 2025 बजेटमध्ये महिला सन्मान बचत योजनेसाठी ची शेवटची तारीख वाढवण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव ठेवला नाही. या योजनेची शेवटची तारीख 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महिला गुंतवणूक दाराकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 2 महिने शिल्लक राहिले आहेत. केंद्र सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान बचत योजना ची घोषणा केली होती. ती योजना 31 मार्च 2023 ला सुरू करण्यात आली.
Union Budget 2025 महिला आणि मुलींसाठी एक लघु बचत योजना आहे. ही योजना आजादी का अमृत स्मरणोत्सव साठी सुरू करण्यात आली होती आणि ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील महिला आणि मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 2 महिने शिल्लक राहिले आहेत. तर तत्काळ देशातील महिला आणि मुलींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ अर्ज करावेत नाहीतर 31 मार्च नंतर ही योजनेची व्हॅलिडीटी संपून जाईल.