PM Vishwakarma Yojana 2025 In Marathi : पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय मिळतात लाभ

Pm Vishwakarma Yojana 2025 In Marathi : पीएम विश्वकर्मा योजनेचे काय आहेत लाभ

Pm Vishwakarma Yojana 2025 In Marathi : आज देशातील पारंपारिक कारागीर आर्थिक दृष्ट्या मागास झाले आहेत. अशा लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना होय.

PM Vishwakarma Yojana भारतीय संस्कृतीमध्ये शिल्पकला कारागीर यांचे खूप महत्त्वाचे योगदान आपण पाहिले आहे. मात्र आजच्या डिजिटल युगामध्ये देशातील अनेक पारंपारिक कारागीर आर्थिक दृष्ट्या मागास झाले आहेत. अशा नागरिकांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.

PM Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 ला विश्वकर्मा जयंती च्या निमित्ताने सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार लोहार, सुतार, कुंभार, शिंपी, मूर्तिकार, कलाकार आदि नागरिकांना आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देत आहे.

PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून सरकार कारागीर आणि कौशल्य विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवत आहे. याव्यतिरिक्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अल्प व्याजदर असलेल्या कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आपली कला पुढे चालवू शकतील.

PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून केवळ पारंपारिक कारागिरांना आर्थिक सक्षम करणे एवढेच उद्देश नसून त्यांची उत्पादन क्षमता वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा मुख्य उद्देश या योजनेचा ठेवण्यात आलेला आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. हे कोणते फायदे आहेत ते आपण पाहू.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे लाभ

PM Vishwakarma Yojana Benefits

PM Vishwakarma Yojana Benefits प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एकूण 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये अशा नागरिकांना कर्ज दिले जाते पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये व्यवसायाच्या विस्तारासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. हे कर्ज खूपच स्वस्त म्हणजे 5 टक्के व्याजदराव दिले जाते. केंद्र सरकार अशा लाभार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. जेणेकरून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यात मदत होऊ शकेल आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यासही मदत होईल.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना 500 रुपये प्रति दिन स्टाईपेंट दिला जातो.

लाभार्थ्याला विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि आयडी म्हणजेच ओळखपत्र दिले जाते. याबरोबरच लाभार्थ्याला 15 हजार रुपये टूल किट प्रोत्साहन म्हणून दिले जाते.

डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी सरकार लाभार्थ्यांना इन्सेटिव्ह पण दिले देते.