Marathi Bodhkatha : Eka Paishachi Chuk एका पैशाची चूक

Marathi Bodhkatha : मराठी बोधकथा

Marathi Bodhkatha आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते कोणतीही गोष्ट असो चूक होऊ द्यायची नाही आणि जरी ती चूक झाली तरी ती शोधून काढायची. तिच्या खोलापर्यंत जायचं पण ती चूक शोधून काढायची.

Marathi Goshti आज आपण अशाच एका संतांची गोष्ट पाहणार आहोत. या गोष्टींमध्ये अवघ्या एका पैशाची चूक असते. परंतु त्याच्यासाठी संत किती धडपड करतात हे आपण पाहणार आहोत. Marathi Katha चला तर मग सुरुवात करूया आपल्या या कथेला…

एका पैशाची चूक

Eka Paishachi Chuk

Marathi Goshti : महाराष्ट्रातल्या पवित्र गोदावरी तीरावर वसलेल्या पैठण या गावात एक थोर संत होऊन गेले. त्यांचे नाव संत एकनाथ यांच्या बालपणाची ही गोष्ट आहे.

देवगिरी किल्ल्यावरील श्री जनार्दन स्वामी यांच्याकडे राहून छोटा एकनाथ शिक्षण घेत होता. त्याची बुद्धी कुशाग्र होती. त्याला आपल्या जबाबदारीची पूर्ण झाली होती. त्याची गुणवत्ता पाहून जनार्दन पंतांनी त्याच्यावर फार महत्त्वाचं काम सोपवलं होतं. देणे-घेणे खरेदी यांचा व्यवस्थित हिशोब ठेवायचे हे काम त्यांनी एकनाथांवर सोपवले होते.

जनार्दन पंतांच्या अपेक्षेप्रमाणे एकनाथ काम अगदी चोखपणे करत होता. एकदा मात्र काय झालं कुणास ठाऊक पण कधी नव्हे ते त्याच्या हातून एक चूक झाली. बर चूक तरी किती तर अगदी एका पैशाची. पण सच्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या एकनाथांना एवढीशी चूक सुद्धा अस्वस्थ करत होती.

त्याने अनेक प्रकाराने गणिते मांडली, ताळे केली, हिशेबाचे कागद परत परत पाहिले पण चूक काही सापडेना. मध्यरात्र झाली तरी एकनाथाचे चूक शोधण्याचे काम चालू होते. तो चूक शोधण्यात इतका गर्क झाला होता की त्याला तहान, भूक, झोप, विश्रांती या कशाचंच भान राहिलं नव्हतं.

शेजारच्या खोलीत झोपलेल्या पंतांना अचानक जाग आली त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांना एकनाथाच्या खोलीतून प्रकाश दिसला. एकनाथ अजून जागा का हे पाहायला पंत त्याच्या खोलीत जातात तर काय तो कागदपत्रात काहीतरी शोधत होता आणि अचानक पणे कसल्याशा आनंदाने एकनाथाने टाळी वाजवली पुढे होऊन पंतांनी विचारलं एकनाथा काय झाले? कसला एवढा आनंद झालाय तुला?

मध्यरात्री आधी पंतांची क्षमा मागत एकनाथ म्हणाला हिशेबात माझ्या हातून एक पैशाची चूक झाली होती. अनेक वेळा उलटेसुलटे पडताळणी करून ते कागद चार-चार वेळा तपासून सुद्धा चूक सापडत नव्हती ती आता सापडली.

केवळ एक पैशाची चूक पण त्यासाठी एकनाथाने रात्रीचा दिवस केला ती चूक शोधून काढली याचे पण त्यांना मोठे कौतुक वाटले. ते म्हणाले धन्य आहे तुझी एकोबा आपल्यावरील जबाबदारीची तुला कल्पना आहे. तुझी कर्तव्यनिष्ठा खरच वाखाणण्यासारखी आहे.

स्वतःच्या हातून झालेली चूक स्वतःला शोधायची ही तुझी जिद्द त्यासाठी तुझे चाललेले प्रयत्न खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. असे म्हणत त्यांनी एकनाथाची पाठ थोपटली. मुलांनो या कथेतून तुम्ही काय शिकलात तर चिकाटी सोडू नये.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA