Parinati Marathi Movie 2025 : परिणती चित्रपटात झळकणार
Parinati Marathi Movie 2025 : मराठी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एक आगामी चित्रपट या दोन अभिनेत्री प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.
1 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरुला यांनी केली आहे.
Parinati Marathi Movie या चित्रपटात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये दोन स्त्रिया दिसून येतात. या स्त्रिया एक रंगीबेरंगी पारंपारिक पोशाखात चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षण बाणेदारपणा तर दुसरी स्त्री साधेपणात दिसत आहे.
त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर आणि भाव विश्वाचा संगम चित्रपटाच्या आशियाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची कहाणी आपण “परिणती” या चित्रपटाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Parinati Movie या चित्रपटाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे हा आहे. या चित्रपटाविषयी लेखक दिग्दर्शक अक्षय बाळसराफ यांनी असे म्हणाले की, परिमिती या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणला आहे ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते.
सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव आपला जीव ओतला आहे. परिणती ही त्यांच्या वाटचालीची आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे.
Parinati Movie परिणती चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजन तर देणार आहेच, त्याचबरोबर विचारही करण्यास भाग पाडणार आहे. हा चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे