MHADA Lottery 2025 Apply Online In Marathi : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
MHADA Lottery 2025 प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं की आपलं हक्काचं एक घर असावं. हे आपल्या हक्काचं घर मिळवण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे. कारण छत्रपती संभाजीनगर, नाशिक कोकण विभागासाठी म्हाडाने लॉटरी प्रक्रिया सुरू केलेली आहे. याची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे.
MHADA Lottery 2025 त्यामुळे तुम्हाला हे म्हाडाचे घर हवे असेल तर तुम्ही तात्काळ म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत..
MHADA Lottery 2025 Apply Online सध्या सर्वत्र म्हाडाच्या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अनेक जण अर्ज करत आहेत. त्याचबरोबर कोणती आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत याचीही माहिती आपण आज पाहणार आहोत.
MHADA Lottery Applivation Process And Required Documents सध्या महागाईत प्रचंड वाढ झाली आहे अनेक जण म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करतात. म्हाडाची घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतात. नुकतीच म्हाडाने कोकण विभागात 5 हजार घरांसाठी सोडत जाहीर केली आहे.
आवश्यक कागदपत्रे
MHADA Application Required Documents
आधार कार्ड
अर्जदाराचे विवाहित असल्यास पती किंवा पत्नीचे पॅन कार्ड
विवाहित असल्यास पती किंवा पत्नीचे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)
कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्जदार व पती-पत्नी दोघांपैकी कोणीही आयकर भरत असेल तर त्याचे आयकर रिफंड सर्टिफिकेट आवश्यक आहे.
सामाजिक आरक्षित प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र
विशेष आरक्षित प्रवर्ग कलाकार, पत्रकार, राज्य शासन कर्मचारी केंद्रीय कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माझी सैनिक, आमदार, खासदार यांच्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्राचे नमुने वेबसाईटवरून घ्यावे लागतील. त्यानंतर संबंधित प्राधिकरणकडून सही करून अपलोड करावे.
अर्ज प्रक्रिया
Application Process For MHADA Houses
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
या म्हाडाच्या घरांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येत नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर https://housing.mhada.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर रजिस्ट्रेशन करा.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागेल. तुम्हाला कोणत्या भागातील घरांसाठी अर्ज करायचा याबाबतची संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.
अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.