NEEEV Scheme 2025 in marathi : काय आहे सरकारची NEEEV योजना
NEEEV Scheme 2025 in marathi : सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. यासाठी दिल्ली सरकारने NEEEV योजना आणली आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती..
केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकार ही आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते.
NEEEV Scheme For Student या योजनेचा भाग म्हणूनच दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांसाठी विशेष नीव योजना लॉन्च केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये देणार आहे.
NEEEV Yojana In Marathi 2025 सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रोजेक्टवर काम करण्यासाठी 20 हजार रुपयाची मदत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
दिल्ली सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे नाव म्हणजे न्यू ऑफ इंटरप्रिन्यूरियल इकोसिस्टीम अँज व्हिजन (NEEEV) आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन विचार, समस्या सोडविण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ही मदत मिळणार आहे. ही योजना फक्त शिक्षणासाठी नाही तर व्यवसाय कसा करावा हे शिकवले जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
NEEEV Scheme of delhi government
NEEEV Yojana नीव या योजनेअंतर्गत सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी ट्रेनिंग दिले जाणार आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने सर्व सरकारी शाळेमध्ये जाऊन या योजनेची माहिती दिली आहे.
NEEEV Yojana या योजनेसाठी प्रत्येक शाळेत एक निव स्कूल प्रोग्राम कॉर्डिनेटर निवडणार आहेत. निवड झालेली ही व्यक्ती शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहेत.
NEEEV योजनेमध्ये असणार चार टप्पे
NEEEV Scheme of delhi government
नीव डायलॉग – या अंतर्गत उद्योग विश्वातील विविध लोक आणि व्यावसायिक, बिझनेसमॅन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळण्यास मदत होईल.
स्टार्टअप स्टॉमर्स- याद्वारे विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी नवनवीन व्यवसाय आयडिया एकमेकांना सांगतील आणि त्यावर कामही करणार आहेत.
फंड- शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या गटाची यामध्ये निवड होईल त्या गटाला त्यांच्या आयडीयानुसार प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी 20000 रुपये दिले जातील. त्यामुळे त्यांची आयडिया प्रत्यक्ष व्यवसायात उतरेल.
उपकरणांची मदत- ज्या सरकारी शाळेमध्ये अटल टिकरीन लॅब आहेत तेथील विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटर, इंटरनेट ऑफ थिंग्स किट, एआय रोबोटिक्स संबंधित सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनिअरिंग, गणित या विषयातील उपकरणे मिळणार आहेत.