PM Viksit Bharat Rozgar Yojana in marathi : 1 ऑगस्ट पासून केंद्र सरकारची नवी योजना

PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025 information in marathi : 3.5 कोटी रोजगारांना मिळणार नोकऱ्या

PM Viksit Bharat Rozgar Yojana आपण पाहतो की, सरकार जनतेच्या हितासाठी, तरुणांसाठी सतत नवनवीन योजनांच्या अंमलबजावणी करत असते. केंद्र सरकारने आता एक नवीन योजना सुरू केली आहे.

PM Viksit Bharat Rozgar Yojana ही योजना लाखो नागरिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक खास महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना. ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे.

PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025 कामगार मंत्रालयाने ही बातमी दिली असून पुढील 2 वर्षात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे सरकारचे मोठे उद्दिष्ट आहे. या योजनेत विशेष लक्ष नवीन लोकांना नोकऱ्या देणे आणि नियुक्तांना प्रोत्साहन देणे यावर सरकारचा भर असणार आहे. याचा अर्थ जे पहिल्यांदाच नोकरी सुरू करत आहेत त्यांना आणि त्यांच्या नियुक्तांना आर्थिक मदत मिळणार आहे.

PM Viksit Bharat Rozgar Yojana in marathi आज आपण या लेखाच्या माध्यमातून PMVRBY प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना नक्की काय आहे? ही योजना कधीपासून ते कधी पर्यंत लागू राहणार आहे? या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना घेता येणार आहे? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

31 जुलै 2027 पर्यंत योजना लागू

PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025

PM Viksit Bharat Rozgar Yojana प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे बजेट 99,446 कोटी एवढे आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2017 पर्यंत ही योजना लागू असेल. याचे 2 मुख्य भाग आहेत पहिला भाग म्हणजे लोकांसाठी आहे आणि जे पहिल्यांदाच नोकरी सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी जर तुमचा पगार दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जर तुम्ही EPFO मध्ये नोंदणीकृत असाल तर तुम्हाला 15000 रुपयांची मदत मिळेल. जी तुमच्या एका महिन्याच्या पगाराच्या समतुल्य असेल. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिली जाईल.

प्रोत्साहन रकमेचा देखील मिळणार लाभ

latest pm vikas bharat rozgar yojana पहिला हप्ता 6 महिन्याच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या नोकरीनंतर आणि आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दिला जाईल. या रकमेचा काही भाग तुमच्या बचत खात्यामध्ये जमा केला जाईल.

जेणेकरून भविष्यात तुमची आर्थिक सुरक्षा राखली जाईल. या भागाचा सुमारे 1.92 कोटी नवीन कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तर दुसरा भाग त्यासाठी आहे जर एखादी कंपनी नवीन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवत असेल तर तिला प्रोत्साहन मिळणार आहे.

प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यांसाठी कंपनीला दरमहा 3000 रुपयांपर्यंतची मदत मिळेल जी 2 वर्षासाठी असेल.

सर्व क्षेत्रांमध्ये योजनेचा लाभ

latest pm vikas bharat rozgar yojana

जर कंपनी उत्पन्न क्षेत्रात असेल तर ही मदत 4 वर्षांसाठी मिळू शकते यासाठी कंपनीकडे किमान 2 म्हणजेच 50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या किंवा 5 (50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्या) कर्मचारी असणे आवश्यक आहे. नवीन कर्मचारी त्यांना कमीत कमी 6 महिने काम करावे लागेल.

ही योजना सर्व क्षेत्रांमध्ये लागू असेल. परंतु उत्पादनावर विशेष लक्ष या PMVRBY योजनेअंतर्गत केंद्रित केले जाणार आहे. हे पैसे DBT च्या माध्यमातून दिले जातील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे मिळतील आणि नियुक्तांना त्यांच्या PAN लिंक असलेल्या खात्यात पैसे मिळतील.

सरकारने या योजनेचा गैरवापर होणार नाही याची संपूर्ण खात्री केली आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मजबूत प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या योजनेमुळे नोकऱ्यांमध्ये वाढ होणार असून लोक औपचारिक रोजगाराकडे वळतील.