PAN Card Security Information In Marathi : वाचा सविस्तर बातमी
PAN Card Security : जशा मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. त्याचप्रमाणे आता पॅन कार्ड हे देखील आपल्या महत्त्वाचे साधन झाले आहे. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड लाही महत्त्व दिले जाते.
Loan Fraud Prevention आपली ओळख निर्माण करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरले जाते. मात्र ओळख चोरी आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बनावट कर्ज घेण्यासाठी पॅन कार्डचा गैरवापर करण्याबाबत चिंता वाढत चाललेली दिसून येत आहे.
Loan Fraud Prevention पॅन कार्ड हे एक केवळ ओळखपत्र नसून थेट आपल्या बँकांशी जोडलेला महत्त्वाचा पुरावा असतो. याचा गैरवापर आणि गंभीर आर्थिक परिणाम घडवून शकतात. पॅन कार्डचा वापर करून घेतलेले फसवे कर्ज केवळ तुमच्या क्रेडिट स्कोर वर नकारात्मक परिणाम करत नाही, तर भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्याच्या संधीचेही नुकसान करतात.
pan card simple ways to avoid financial fraud latest marathi news तज्ञांचे म्हणणे आहे की, पॅन कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि वेळेत पॅनकार्डचा गैरवापर ओळखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे आपल्या क्रेडिट चा रिपोर्ट तपासायला हवा. CIBIL, Experian, Equifax, CRIF High Mark यासारख्या आघडीच्या क्रेडिट ब्युरोमार्फत आपण आपल्या पॅनल आणि मोबाईल नंबर च्या आधारे दरवर्षी एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकतो.
यामध्ये आपल्या नावावर घेतलेल्या कर्जाची क्रेडिट कार्डची त्याचबरोबर कर्ज चौकशीची संपूर्ण माहिती मिळते. जर एखादे अनोळखी कर्ज, अपरिचित व्यक्तीय वित्तीय संस्था किंवा चुकीचे खाते तपशील दिसून आले तर ते ओळख चोरीचे स्पष्ट लक्षण दिसून येते.
pan card simple ways to avoid financial fraud latest marathi news या अशा वेळी त्वरित कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित कर्ज देणाऱ्याशी संपर्क साधून फसवणुकीची माहिती द्यावी क्रेडिट ब्युरो कडे वाद नोंदवावा आणि ओळखीचा पुरावा तसेच लेखी तक्रार सादर करावी. यामुळे तुमचा पॅन कार्डचा धोका गैरवापर कळेल.
PAN Card Security याशिवाय स्थानिक पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे औपचारिक तक्रार देखील दाखल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील संदर्भासाठी सर्व कागदपत्रे आणि ईमेल संवाद सेव करून जतन करणे आवश्यक आहे.
पॅन कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी विश्वसनीय वेबसाईट ॲप्स किंवा सोशल मीडियावर पॅन कार्ड ची माहिती शेअर करणे टाळावे. PAN चा फोटो फक्त आवश्यक ठिकाणीच द्यावा.
मूळ पॅन कार्ड हरवल्यास डुप्लिकेट पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करावा आणि ऑनलाइन बँकिंग साठी मजबूत पासवर्ड वापरावा. त्याचबरोबर कोणतेही कर्ज किंवा क्रेडिट अर्जासाठी एसएमएस आणि ईमेल अलर्ट सक्रिय ठेवणे सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
फसवणुकीच्या घटना वाढत असताना आर्थिक जागृती आणि दक्षता राखणे आवश्यक आहे. तुमच्या PAN सुरक्षित ठेवणे हे एटीएम पिन किंवा आधार क्रमांक सुरक्षित ठेवण्यात केस महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही अत्यंत सावधगिरीने तुमचा पॅन कार्ड जपून ठेवायला हवे.