Ladki Sunbai Yojana 2025 In Marathi : काय आहे लाडकी सुनबाई योजना

Ladki Sunbai Yojana Information In Marathi : लाडक्या बहिणी नंतर लाडकी सुनबाई योजनेची चर्चा

Ladki Sunbai Yojana In Marathi : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी सुरू केली आणि तिला अतिउत्तम प्रतिसाद मिळाला आणि ती यशस्वी ठरली आहे.

Ladki Sunbai Yojana या योजनेचा राज्यातील 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. अतिशय उत्तम प्रकारे महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई ही योजना सुरू केली आहे.

Ladki Sunbai Yojana News शिंदे गटाने ही योजना सुरू केली आहे. ही योजना नक्की काय आहे? लाडकी सुनबाई या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे? लाडकी सुनबाई योजनेचा लाभ कसा घ्यायचा? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

काय आहे लाडकी सुनबाई योजना

What Is Ladki Sunbai Yojana

Ladki Sunbai Yojana लाडकी सुनबाई योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना जर कोणती मदत हवी असेल तर ती मदत मिळणार आहे.

महिलांना जर कोणता त्रास होत असेल तर त्यांना एक हेल्पलाइन नंबर मिळणार आहे. ते हेल्पलाइन नंबर वरून त्या फोन करून त्यांच्या समस्येचे निवारण करू शकतील.

Ladki Sunbai Yojana लाडकी सुनबाई योजनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक शाखेमधून आणि विभागीय कार्यालयातून मदत केली जाणार आहे. तसेच त्या विभागासाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे.

जर घरातील कोणत्याही स्त्रीवर अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर त्यांना लाडकी सुनबाई योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. महिलांनी हेल्पलाइन नंबर वर फोन करून तुमच्यावर झालेला अन्याय किंवा अत्याचार सांगायचा आहे, त्यानंतर तुम्हाला मदत केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना भविष्यात या योजनेचा अत्यंत फायदा होणार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना मदत केली जाईल.

या आधी राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना यशस्वीरित्या पार पडत आहे. या योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. दर महिन्याला 1500 रुपये या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

त्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन एक अभियान सुरू केले आहे. त्याचे नाव आहे लाडकी सुनबाई अभियान. या अभियानाअंतर्गत महिलांना कोणताही त्रास होत असेल तर त्या हेल्पलाइन नंबर वरून फोन करून त्यांच्या समस्येचा निवारण करू शकतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात या मुख्यमंत्री लाडकी सून अभियानाची सुरुवात केली. ‘आजपासून आपण नवीन अभियान सुरू करत आहोत. ते लाडक्या सुनेसाठी महत्त्वाचे आहे. सासर काही वाईट नसते पण काही मोजक्या ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते त्याचप्रमाणे सून देखील आपली लाडकी व्हावी यासाठी शिवसेनेने हेल्पलाइन सुरू केली आहे’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी यावेळी हेल्पलाइनचे क्रमांकही जाहीर कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले ज्या सुनांना कोणताही त्रास होईल त्यांनी न घाबरता या क्रमांकावर फोन करावा त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल.

लाडकी सून अभियानामार्फत पीडित सुनेला सुरक्षा दिली जाईल. ज्या सुना आहेत त्याही माझ्या लाडक्या बहिणीच आहेत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.