Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution In Marathi : लाडक्या बहिणींनो…या वेळेत करा ई केवायसी
Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution In Marathi : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि चुकीची माहिती दिल्यास लाभही बंद होणार आहे.
Solution For e-KYC Ladki Bahin Yojana मात्र ही ई केवायसी करताना अनेक महिलांना ओटीपी एरर येत असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
सर्व लाभार्थी महिला एकाच वेळी ई केवायसी करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे राज्य सरकारची लाडकी बहीण इ केवायसी साठी असलेले अधिकृत वेबसाईटवर काही एरर येत आहेत. जसे की ओटीपी न येणे, साईट स्लो चालणे यावर सरकारने उपाय सांगितला आहे. चला काय आहे उपाय ते जाणून घेऊ.
Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
मात्र या योजनेचा अनेक जण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
Solution For e-KYC Ladki Bahin Yojana मात्र ही ई केवायसी करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही ई केवायसी करण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी न येणे, साईड वर लोड येणे अशा समस्यांचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत आहे.
पण यावर आता उपाय समोर आला आहे. ज्यामुळे इ केवायसी तुम्ही सोप्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला कुठल्याही तांत्रिक एरर येणार नाही.
चुकीची माहिती दिल्यास कारवाईची शक्यता
Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution In Marathi
Ladki Bahin Yojana e-KYC Error Solution लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांनी त्यांची चुकीची माहिती ई केवायसी करताना जर दिली तर त्यांचे 1500 रुपये बंद होऊ शकतात.
तसेच खोटी माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेणाऱ्या वर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता ही आहे. असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे तुम्ही e-KYC करत असाल तर त्यावरील माहिती अचूक पद्धतीने वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या. जेणेकरून चुकीची माहिती जाणार नाही आणि तुमचा लाभ सुरू राहील.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
अशी करा e-KYC
Ladki Bahin Yojana e-KYC Process
- राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तिथे e-KYC फॉर्म उघडा.
- पहिल्या पानावर e-KYC बॅनर वर क्लिक करा.
- त्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाका आणि captcha कोड टाका.
- नंतर submit बटनावर क्लिक करा.
- आधार लिंक मोबाइल वर ओटीपी येईल तो टाकून सबमिट करा.
- त्यानंतर वेबसाईट वर असेल की केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही जर केवायसी पूर्ण झाली असेल तर “केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश येईल.
- तुमचा आधार क्रमांक लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी होईल.
- त्यानंतर तुम्हाला पती किंवा वडीलाचा आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून कॅप्चा भरून सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रवर्गात आहात कुठली जात आहे ते निवडावे लागेल.
- तुमच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारक नाही ते निवडा.
- कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
- त्यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- जर तुमची e-KYC यशस्वी झाली असेल तर “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज तुम्हाला दिसेल.
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी करू शकता.
घाई करू नका
Solution For e-KYC Ladki Bahin Yojana In Marathi
लाडक्या बहिणीची e-KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींनी घाई करू नका कारण चुकीच्या माहितीमुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे घाई करू नका असे आवाहनच प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबरोबरच माहिती देत असताना अचूक माहिती द्या नियमाचे पालन करा. चुकीची माहिती देऊ नका अन्यथा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
उपाय काय?
Solution For e-KYC Ladki Bahin Yojana In Marathi
सध्या राज्य सरकारने लाडक्या बहिणीचा लाभ घेण्यासाठी e-KYC बंधनकारक केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महिला एकाच वेळी लाडकी बहीण च्या वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वेबसाईटवर लोड येत आहे. त्यामुळे ओटीपी येण्यास विलंब होतो आणि साईड क्रॅश होताना दिसत आहे.
यावर उपाय म्हणून सरकारकडून लाभार्थी महिलांना रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 ते 5 दरम्यान ई-केवायसी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण या वेळेला साईड वरील लोड कमी असेल आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल.
त्यामुळे सरकारने ई-केवायसी साठी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. गरज पडल्यास या कालावधीमध्ये वाढही होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणीने गडबड न करता, घाई न करता लाडक्या बहिण योजनेसाठीची e-KYC पूर्ण करावी अशी आवाहनच सरकारकडून करण्यात आले आहे.