Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024 In Marathi : आम आदमी विमा योजनेतून मिळवा विमा संरक्षण

Table of Contents

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : आम आदमी विमा योजना 2024 मराठी माहिती

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra आपल्या देशात असंख्य नागरीक गरीब व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतःचा विमा उतरवणे शक्य नसते.

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे विम्याच्या हप्त्याची रक्कम असे नागरिक भरू शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा अपघात झाला असेल किंवा अपंगत्व आले असेल तर त्या कुटुंबातील एकच व्यक्ती कमावता असल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचण येते.

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने 2 ऑक्टोबर 2007 रोजी आम आदमी विमा योजनेची सुरुवात केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक नागरिकांना मिळाला आहे व अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

Aam Aadmi Bima Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील जनतेचा नागरिकांचा विमा उतरवला जातो. त्यामुळे लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक कारणांनी मृत्यू किंवा त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व किंवा आवश्यक अपंगत्व आलेले असल्यास या विमा योजनेअंतर्गत अशा नागरिकांना आर्थिक मदत 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबासाठी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.

Aam Aadmi Bima Yojana आदमी विमा योजना ही ग्रामीण तसेच शहरी भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा नैसर्गिक कृती किंवा कायमचे अपंगत्व किंवा अंशिक अपंगत्व आल्यास आर्थिक मदत केली जाते.

Aam Aadmi Bima Yojana आम आदमी विमा योजनेसाठी 200 रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो. त्यापैकी 10 रुपये सरकारमार्फत त्यामध्ये 50% केंद्र सरकार तर 50 टक्के राज्य सरकारचे आणि उर्वरित 100 रुपये लाभार्थ्यास स्वतःला भरावे लागतात.

Aam Aadmi Bima Yojana राज्य सरकार मार्फत जनतेच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत केली जाते. राज्यातील नागरिकांचे आरोग्य जोपासण्याच्या उद्देशाने राज्य सरकार व केंद्र सरकार योजना राबवत असतात.

Aam Aadmi Bima Yojana आपल्या देशात आर्थिक दृष्ट्या मागास समाज तसेच अनुसूचित जाती, जमाती, प्रवर्गातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये सुशिक्षित पणाचा अभाव आहे. त्यामुळे असे नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना कोणता ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो.

Aam Aadmi Bima Yojana या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकार मार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांसाठी आम आदमी विमा योजनेची सुरुवात करण्यात आली.

Aam Aadmi Bima Yojana 2024 गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आल्यास सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाते.

Aam Aadmi Bima Yojana 2024 ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागात दोन्ही ठिकाणी राबवली जाते. त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देखील दिली जाते. महाराष्ट्र सरकारमार्फत आम आदमी विमा योजना राबवली जाते. ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत महत्त्वपूर्ण योजना आहे.

Aam Aadmi Bima Yojana 2024 आम आदमी विमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC द्वारे राबवली जाणारी सामाजिक सुरक्षा योजना आहे. सामान्य लोकांसाठी विमा काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु विमा काढणे इतके त्यांची आर्थिक परिस्थिती नसते.

Aam Aadmi Bima Yojana 2024 विमा काढण्याची रक्कम त्यांच्याकडे नसते अशा लोकांकडे आर्थिक उत्पन्न नसल्याने ते विमा काढू शकत नाहीत. अशा कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकार मार्फत आम आदमी विमा योजना राबवली जाते.

ठळक मुद्दे

आम आदमी विमा योजना 2024 मराठी माहिती

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024 Information In Marathi

आम आदमी विमा योजनेची थोडक्यात माहिती

Aam Aadmi Bima Yojana 2024 In Short

आम आदमी विमा योजनेची उद्दिष्टे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Purpose

आम आदमी विमा योजनेची वैशिष्ट्ये

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Features

आम आदमी विमा योजने अंतर्गत कधी मिळते विमा संरक्षण

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024 In Marathi

आम आदमी विमा योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024

आम आदमी विमा योजना अंतर्गत लाभार्थ्याच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

आम आदमी विमा योजनेचे फायदे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Benefits

आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Benefisiors

आम आदमी विमा योजनेअंतर्गत व्यापलेले व्यवसाय

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

आम आदमी विमा योजनेची पात्रता

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Eligibility

आम आदमी विमा योजनेचे नियम

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Conditions

आम आदमी विमा योजनेचे आवश्यक कागदपत्रे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Documents

आम आदमी योजने विमा योजनेअंतर्गत खालील गोष्टींसाठी लाभ घेता येणार नाही

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

मृत्यू झाल्यास आम आदमी विमा योजना अंतर्गत दावा करण्याची प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana 2024

अपंगत्व आल्यास आम आदमी विमा योजना अंतर्गत दावा अर्ज करण्याची पद्धत

Aam Aadmi Bima Yojana 2024

आम आदमी विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Online Apply

आदमी आम आदमी विमा योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम आदमी विमा योजनेची थोडक्यात माहिती

Aam Aadmi Bima Yojana 2024 In Short

योजनेचे नावआम आदमी विमा योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
कधी सुरू केली2 ऑक्टोंबर 2007
लाभार्थीराज्यातील नागरिक
लाभवीस हजार रुपये विमा
उद्दिष्टनागरिकांना विमा संरक्षण
अर्ज प्रक्रियाऑनलाईन, ऑफलाइन
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

आम आदमी विमा योजनेची उद्दिष्टे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Purpose

  • महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना विमा सुरक्षा प्रदान करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोठ्या उपचारासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • गरीब मागासवर्गीय कुटुंबांना विमा सुरक्षा प्रधान करणे जेणेकरून त्यांना कोणाकडूनही जास्त व्याजदराने कर्ज काढण्याची आवश्यकता नाही.
  • महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंब यांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील गरीब व मागास नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.

आम आदमी विमा योजनेची वैशिष्ट्ये

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Features

  • आम आदमी विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
  • आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते.
  • या योजनेचा प्रीमियम हा अत्यंत कमी आहे तसेच प्रीमियमची रक्कम ही 50 टक्के सरकार मार्फत करण्यात येते त्यामुळे लाभार्थी नागरिकांना फक्त 50 टक्के रक्कम भरावी लागते.
  • या योजने ची कार्यप्रणाली डिजिटल स्वरूपात केली जाते त्यामुळे लाभार्थ्याला त्वरित आर्थिक मदत मिळते.

आम आदमी विमा योजने अंतर्गत कधी मिळते विमा संरक्षण

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024 In Marathi

  • नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळते.
  • अपघातात मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळते.
  • अपंगत्व किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळते.
  • लाभार्थ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

आम आदमी विमा योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra 2024

नैसर्गिक मृत्यू झाल्यास :- विम्याच्या अंतिम तारखेपूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या नॉमिनी वारसदार व्यक्तीला 30 हजार रुपये देण्यात येतात.

अपघात मृत्यू झाल्यास:- विम्याच्या अंतिम तारखेपूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास विमा अंतर्गत खालील प्रमाणे आर्थिक मदत केली जाते

नैसर्गिक मृत्यू30,000 रुपये
अपघातामुळे मृत्यू75,000 रुपये
अपघातामुळे 80 कायमस्वरूपी अपंगत्व (एक डोळा आणि एक अवयव निकामी होणे)37,500 रुपये
अपघातामुळे एकूण कायमचे अपंगत्व (दोन डोळे किंवा दोन हात पाय निकामी होणे)75,000 रुपये  

आम आदमी विमा योजना अंतर्गत लाभार्थ्याच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

इयत्ता 9वी ते 12वी या वर्गामध्ये शिकत असलेले लाभार्थ्यांच्या जास्तीत जास्त दोन पाल्यांना 100 रुपये प्रति महा शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षातून दोन वेळा म्हणजेच 1 जुलै व 1 जानेवारीला जमा केली जाते.

आम आदमी विमा योजनेचे फायदे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Benefits

  • या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • या योजनेमुळे राज्यातील नागरिक स्वतःचा विमा काढू शकतील त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत हप्त्याची रक्कम ही कमी असल्यामुळे सहजरित्या सामान्य नागरिक हा विमा भरू शकतील.
  • लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना मिळणाऱ्या विमारकमेच्या मदतीने दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
  • या योजनेत लाभार्थ्याला अपंगत्व आल्यास मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे असे नागरिक स्वतःचा उपचार सहजरित्या करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या पाल्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळतो जेणेकरून विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेमुळे राज्यातील नागरिकांचे भविष्य उज्वल होईल व नागरिकांना भविष्यासाठी बचत गुंतवणूक करण्याची सवय लागेल.

आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Benefisiors

  • आम आदमी विमा योजना ही ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • या योजना अंतर्गत 18 ते 59 वयोगटातील भूमीहीन, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक मजूर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

आम आदमी विमा योजनेअंतर्गत व्यापलेले व्यवसाय

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

  1. हस्तकला कारागीर
  2. मच्छिमार
  3. बिडी कामगार
  4. हमाल
  5. वीट भट्टी कामगार
  6. कापड
  7. सुतार
  8. रबर आणि कोळसा उत्पादने
  9. कोतवाल
  10. फटक्यांचे कामगार
  11. मोची
  12. कागदी उत्पादनांची निर्मिती
  13. साखर / खांडसरी यासारखे खाद्यपदार्थ
  14. लाकूड उत्पादनांची निर्मिती
  15. लेदर उत्पादनांचे उत्पादन
  16. शहरी गरिबांसाठी योजना
  17. वृक्षारोपण कामगार
  18. छपाई
  19. परदेसी भारतीय कामगार
  20. हातमाग विणकर
  21. मेणबत्ती निर्मिती सारखी रासायनिक उत्पादने
  22. हातमाग आणि खादी विणकर
  23. मातीची खेळणी सारखी खनिज उत्पादने तयार करतात
  24. लेडी टेलर्स
  25. ग्रामीण भूमिहीन कुटुंबे
  26. डोंगराळ भागातील महिला
  27. लेदर आणि टयानरी कामगार
  28. शेतकरी
  29. वाहतूक चालक संघटना
  30. पापड कामगार सेवाशी संलग्न
  31. वाहतूक कर्मचारी
  32. शारीरिक दृष्ट्या अपंग स्वयंरोजगार व्यक्ती
  33. ग्रामीण गरीब
  34. प्राथमिक दूध उत्पादक
  35. बांधकाम मजूर
  36. रिक्षा चालक
  37. मेंढी पाळणारे
  38. ताडी ट्यापर्स
  39. सफाई कर्मचारी
  40. नारळ प्रोसेसर
  41. मीठ उत्पादक
  42. अंगणवाडी शिक्षिका
  43. तेंदुपत्ता संग्राहक
  44. वन कर्मचारी
  45. स्वयंसहाय्यता गटांशी संबंधित महिला
  46. यंत्रमाग कामगार
  47. रेशीम
  48. असंघटित कामगार RSBY अंतर्गत समाविष्ट आहेत

आम आदमी विमा योजनेची पात्रता

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Eligibility

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 15 ते 59 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

आम आदमी विमा योजनेचे नियम

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Conditions

  • अर्जदार राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 15 ते 59 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावा.
  • या योजनेचा लाभ भूमिहीन, अल्पभूधारक व अत्यल्पभूधारकांना घेता येईल.
  • अर्ज करताना वारसदाराचे नाव आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांच्या मृत्यूच्या वेळी किंवा अपघाताच्या वेळी लाभार्थ्यांची पॉलिसी सक्रिय असावी.
  • या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ हा एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना घेता येईल.
  • शिष्यवृत्तीचा लाभ हा फक्त इयत्ता 9वी ते 12वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना घेता येईल.
  • लाभार्थी व्यक्ती कुटुंब प्रमुख असावा.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबात एकच कमवता व्यक्ती असावा.

आम आदमी विमा योजनेचे आवश्यक कागदपत्रे

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळेचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड

वारसदाराचे कागदपत्रे यामध्ये

  • वारसाचे ओळखपत्र
  • वारसाचा पत्ता
  • वारसाचे बँक खाते पासबुक

आम आदमी योजने विमा योजनेअंतर्गत खालील गोष्टींसाठी लाभ घेता येणार नाही

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

  • लाभार्थी रुग्णालयात भरती असल्यास रुग्णालयाचा खर्च.
  • लाभार्थ्यांना मानसिक विकारामुळे अपंगत्व आल्यास.
  • लाभार्थ्यांनी आत्महत्या केल्यास.
  • देशात युद्धसदृश्य परिस्थितीमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास.
  • धोकादायक खेळामध्ये मृत्यू आल्यास.
  • बेकायदेशीर कामात मृत्यू झाल्यास.
  • मादक पदार्थाचे सेवनामुळे मृत्यू झाल्यास.
  • लाभार्थ्यांनी स्वतःला काही इजा करून घेतल्यास.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra

मृत्यू झाल्यास आम आदमी विमा योजना अंतर्गत दावा करण्याची प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana 2024

एखाद्या लाभार्थ्यांचा कालावधीत किंवा विमा योजना लागू असताना मृत्यू झाला असेल त्यावेळी त्याच्या किंवा तिच्या वारसदाराला एजन्सी नियुक्त अधिकाऱ्याकडे हक्काचे रक्कम भरण्यास मृत्यू प्रमाणपत्र सह अर्ज करावा लागेल. विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून अर्ज सोबत पोलीस FIR ची प्रत, पोलीस निष्कर्ष, पोलिसांचा अहवाल इत्यादी कागदपत्रे जोडावे लागतील.

अपंगत्व आल्यास आम आदमी विमा योजना अंतर्गत दावा अर्ज करण्याची पद्धत

Aam Aadmi Bima Yojana 2024

  • लाभार्थ्याला कालावधीत किंवा विमा पॉलिसी लागू अपघातात पूर्ण किंवा थोडेफार अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत दावा करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून त्यासोबत पोलीस FIR, अपघाताची व्हिडिओ रेकॉर्डिंग, अपघाताची छायाचित्रे सोबत जोडावे लागतील.
  • अपघाताचा कागदपत्रे पुरावा तसेच सरकारी सिविल सर्जन यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र नमूद करणे आवश्यक आहे.

आम आदमी विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Online Apply

  • आम आदमी विमा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आयुर्विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये आम आदमी विमा योजनेच्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • त्यानंतर संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही आम आदमी विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आदमी आम आदमी विमा योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Aam Aadmi Bima Yojana Maharashtra Apply

  • आम आदमी विमा योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम महामंडळाच्या जवळच्या शाखेत जावे लागेल.
  • तेथील कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला आम आदमी विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • सदर अर्ज हा आयुर्वेद महामंडळाच्या LIC शाखेत जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही आम आदमी विमा योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- आम आदमी विमा योजनेअंतर्गत किती मिळेते विमा संरक्षण?

उत्तर:- आम आदमी विमा योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

प्रश्न :-आम आदमी विमा योजना कधी सुरू झाली?

उत्तर:- आम आदमी विमा योजना 2 ऑक्टोबर 2007 रोजी सुरू करण्यात आली.

प्रश्न:- आम आदमी योजनेअंतर्गत किती रुपये प्रीमियम आकारला जातो?

उत्तर:- आम आदमी विमा योजनेसाठी 200 रुपये वार्षिक प्रीमियम आकारला जातो. त्यापैकी 100 रुपये सरकारमार्फत (50% केंद्र सरकार आणि 50 टक्के राज्य सरकार) आणि उर्वरित 100 रुपये लाभार्थ्यास भरावे लागतात.

प्रश्न:- आम आदमी विमा योजनेचा कसा करावा अर्ज?

उत्तर:- आम आदमी विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना