PM Mudra loan Yojana

Table of Contents

PM Mudra loan Yojana 2024 in marathi मुद्रा लोन योजना 2024

PM Mudra loan Yojana 2024 :

PM Mudra loan Yojana सरकारने देशातील सर्व नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव आहे मुद्रा लोन योजना Mudra loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपये पर्यंत लोन मिळू शकते जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे आर्थिक मदत नाहीये तर त्यासाठी तुम्ही या मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकता.

pm mudra loan yojana

हे पहा: https://www.mudra.org.in/

मुद्रा लोन योजना म्हणजे काय?

What is Mudra Loan Yojana

PM Mudra loan Yojana देशातील छोट्या व्यवसायांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी 20 कोटी रुपये भांडवल असलेली मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफाईन्स एजन्सी अर्थात याचाच अर्थ मुद्रा बँकेचे उद्घाटन केले आहे. या बँकेतून छोटा व्यवसाय करणाऱ्यांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. यासाठी सरकारने एकूण वीस हजार (20,000) कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायिकांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेलच परंतु ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही कर्ज मिळत त्यामध्ये भाजीवाली, सलून, चहाचे दुकानदार, इत्यादि छोटी छोटी दुकाने यांनाही कर्ज दिले जाते, ही बँक आरबीआय (RBI) बँकेच्या नियंत्रणाखाली काम करते याचा व्याजदर कमी आहे. या योजनेत कर्ज घेण्यासाठी तुम्ही पात्र झाला असाल तर कर्जदाराला कर्ज मिळाल्यानंतर एक “मुद्रा कार्ड” (Mudra Card) दिले जाते जे की आपल्या क्रेडिट कार्ड सारखेच असते आणि त्यातून जेवढे तुम्हाला कर्ज मंजूर झालेले आहे त्याप्रमाणे व्यवसायासाठी खर्च करता येतो.

जर तुमचा स्वतःचा काही व्यवसाय असेल आणि तो तुम्हाला अजून वाढवायचा असेल, (Expand) करायचा असेल किंवा त्या सोबतच अजून तुम्हाला एक नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता या योजनेमध्ये तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते.

ठळक मुद्दे :-

  • मुद्रा लोन योजना म्हणजे काय?
  • मुद्रा लोन योजनेसाठी काय आहेत आवश्यक बाबी
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची थोडक्यात माहिती
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्देश
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा काय आहे लाभ ?
  • कोणाला मिळतो मुद्रा लोन योजनेचा लाभ ?
  • प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते ?
  • पीएम मुद्रा लोन योजनेचे फायदे
  • मुद्रा लोनसाठीची आवश्यक कागदपत्रे
  • मुद्रा लोन योजनेसाठीची पात्रता 
  • या बँकमध्ये मिळते कर्ज 
  • कसा करावा ऑनलाईन अर्ज
  • कसा करावा ऑफलाइन अर्ज
  • मुद्रा कर्ज योजनेचा व्याजदर
  • FAQ’s 
PM mudra loan yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना : https://yojanamazi.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024/

मुद्रा लोन योजनेसाठी काय आहेत आवश्यक बाबी PM Mudra Loan

या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचा जामीन लागत नाही म्हणजेच हमीदार लागत नाही.  

कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज करावे लागत नाही.

तुमच्या स्वतःचे भाग भांडवल ठेवण्याची गरज नाही.

अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत.

या योजनेचा लाभ सरकारीबँकेतून घेता येईल.

PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा लोन
कधी सुरू झाली8 एप्रिल 2015
कर्ज रक्कम50 हजार ते 10 लाखापर्यंत
उद्देशव्यवसायासाठी प्रेरित करणे
प्रकार3 प्रकार शिशु, किशोर, तरुण
कर्ज कुठे मिळतेसरकारी बँक
लाभार्थीलहान व मध्यम व्यावसायिक
कसा करावा अर्जऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://www.mudra.org.in/

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्देश Mudra Loan

PM Mudra loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे – स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज उपलब्ध करून देणे आणि दुसरा उद्देश छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवलाची समस्या येते  म्हणून आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मागे पडतो. परंतु सरकारने आता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना PM Mudra loan Yojana सुरू होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला बँकेतून लोन घेण्याचे असल्यास त्याला अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या. कर्जासाठी गॅरंटी द्यावी लागत होती. या कारणामुळे लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. मात्र बँकेतील एवढ्या अडचणींमुळे ते कर्ज घेण्यासाठी थोडेसे अडखळत होते. परंतु आता या योजनेमुळे त्यांना हे सहज शक्य होत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील अधिक नागरिकांना व्यवसायासाठी प्रेरित करणे हा आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारी कमी होईल त्याचबरोबर देशाची प्रगती करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

pm mudra loan yojana

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : https://yojanamazi.com/pradhanmantri-jeevan-jyoti-bima-yojana-2024-in-marathi/

PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा काय आहे लाभ ?

PM Mudra Loan मुद्रा लोन योजनेत हमीदराची आवश्यकता नाही तसेच कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या मुद्रा लोन योजनेच्या कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे. ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज घेतलेले आहे. त्यांना एक मुद्रा कार्ड मिळते त्या मुद्रा कार्डच्या सहाय्याने उद्योगासाठी आवश्यक तेवढा खर्च केला जाऊ शकतो.

कोणाला मिळतो मुद्रा लोन योजनेचा लाभ ?

PM Mudra loan Yojana देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांना PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेत येते.  

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध केलेले आहेत.
  • शिशु मुद्रा लोन :- या शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.  
  • किशोर मुद्रा लोन :- किशोर मुद्रा लोन या कर्ज प्रकारात 50000 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
  • तरुण मुद्रा लोन :- तरुण मुद्रा लोन या प्रकारात पाच लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
pm mudra loan yojana

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कोणाला कर्ज मिळू शकते ?

एकमेव मालक, पार्टनरशिप, सेवा क्षेत्रातील कंपन्या, छोटे उद्योग, दुरुस्ती दुकाने, ट्रक मालक, अन्न संबंधित व्यवसाय, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म, आदि  

पीएम मुद्रा लोन योजनेचे फायदे

Benefits of PM Mudra Loan Yojana

PM Mudra loan Yojana ज्या व्यक्तीला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हमीदराशिवाय या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते आणि त्यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेड कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. या योजनेत कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला एक मुद्रा कार्ड mudra card मिळते व्यवसायासंबंधीत गरजांवर या कार्डच्या मदतीने खर्च करता येईल.

lek ladki yojana : https://yojanamazi.com/lek-ladki-yojna-2024-in-marathi/

मुद्रा लोनसाठीची आवश्यक कागदपत्रे

Documents of PM Mudra Loan

  • कर्जदाराचे आधार कार्ड
  • कर्जदाराचे पॅन कार्ड
  • कर्जदाराचा पत्ता
  • व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शॉप अॅक्ट लायसन
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल

मुद्रा लोन योजनेसाठीची पात्रता

Eligibility of PM Mudra Loan Yojana

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.  
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.  
  • तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.  
  • ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.  

या बँकमध्ये मिळते कर्ज

  1. बँक ऑफ इंडिया
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. कॉर्पोरेशन बँक
  4. आयसीआयसीआय बँक
  5. अलाहाबाद बँक
  6. पंजाब बँक सिंध बँक
  7. सिंडिकेट बँक
  8. युनियन बँक ऑफ इंडिया
  9. बँक ऑफ महाराष्ट्र
  10. आंध्रा बँक
  11. कोटक महिंद्रा बँक
  12. आयडीबीआय बँक
  13. कर्नाटक बँक
  14. पंजाब नॅशनल बँक
  15. तमिळनाडू मार्क कंटाइल बँक
  16. ॲक्सिस बँक
  17. कॅनरा बँक फेडरल बँक
  18. इंडियन बँक
  19. सारस्वत बँक
  20. युको बँक
  21. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  22. एचडीएफसी बँक
  23. इंडियन वर्सेस बँक
  24. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  25. युनियन बँक ऑफ इंडिया

PM Mudra Loan Yojana या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (offline)  दोन्ही पद्धती आहेत चला तर मग ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बघू.

PM mudra loan yojana

कसा करावा ऑनलाईन अर्ज

Mudra Loan Online Application 

सर्वप्रथम वरती दिलेल्या सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.mudra.org.in/  जाऊन मुद्रा लोन PM Mudra Loan Yojana अर्ज डाऊनलोड करा. हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या. सोबत त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा. रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा. संदर्भ आयडी म्हणजेच रेफरन्स आयडी हा तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण कर्जाची पुढची  प्रोसेस करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल कर्जाचा अर्ज आणि तुम्ही जोडलेली आवश्यक कागदपत्रे हे तपासून झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली जाईल.

कसा करावा ऑफलाइन अर्ज PMMY apply offline

PM Mudra Loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला मुद्रा कर्ज घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी बँकेला भेट द्या. बँकेतून कर्जाचा अर्ज घ्या. तो काळजीपूर्वक वाचून भरा. आणि त्याला आवश्यक ते कागदपत्रे जोडून तो कर्जाचा अर्ज सबमिट करा. बँकेसोबत कर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

मुद्रा कर्ज योजनेचा व्याजदर

PM Mudra Loan Interest Rate

पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर 8.80% पासून सुरू होतो.

यूनियन बँक ऑफ इंडिया बँकेचा व्याजदर 10.30% पासून सुरू होतो.

सारस्वत बँकेचा व्याजदर 11.65% पासून सुरू होतो.

सिटी युनियन बँकेचा व्याजदर 12% ते 12.65%

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा व्याजदर 8.65% ते 16.95%

महत्वाचे : वर देण्यात आलेले बँकेचे व्याजदर हे बँक आणि आरबीआय (RBI) निश्चित करते त्यामुळे या व्याजदरांमध्ये कधीही बदल होऊ शकतो त्यासाठी तुम्ही त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा त्या बँकेत जाऊन तेथील व्याजदर बघू शकता.

FAQ’s या योजनेअंतर्गत विचारली जाणारी काही प्रश्न

  • मुद्रा लोन mudra loan चा व्याजदर किती आहे ?
    • या योजनेसाठी साडेसात टक्के पासून व्याजदर सुरू होतो परंतु प्रत्येक बँकेने आपापल्या बँकेच्या नियमानुसार ही व्याजदर ठेवलेले आहे.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत किती कर्जाचे प्रकार आहेत ?
    • या योजनेअंतर्गत तीन कर्जाचे प्रकार आहेत. शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज.  
  • या योजनेअंतर्गत किती दिवसात कर्ज मिळू शकते ?
    • सात ते दहा दिवसात तुम्हाला कर्ज मिळू शकते
  • या योजनेसाठी कोणत्या बँका समाविष्ट आहेत?
    • या योजनेसाठी सरकारी बँका समाविष्ट आहेत
  • या योजनेअंतर्गत कोणाला मिळू शकते कर्ज ?
    • देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेअंतर्गत कर्ज घेता येते. ज्या व्यक्तीला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय मोठा करायचा आहे त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो
  • किती रुपयापर्यंत मिळू शकते कर्ज ?
    • या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • मुद्रा कर्ज योजना कधी सुरू झाली.
    • 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा बँकेची सुरुवात झाली.