Apang Pension Yojana 2024 Information In Marathi : अपंग पेन्शन योजना 2024 मराठी माहिती
Apang Pension Yojana 2024 अपंग पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारने दिव्यांग / अपंग लोकांसाठी सुरू केली आहे. राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने अपंग पेन्शन योजनेची सुरुवात केली.
Apang Pension Yojana 2024 या योजनेचा लाभ अपंग लोकांना त्यांच्या आर्थिक आणि मानसिक जीवनमान सुधारावे म्हणून होईल. अपंग लोकांना रोजगार प्राप्ती करणे सहजासहजी शक्य नसते, त्यामुळे अपंग व्यक्तींना इतरांवर जीवन अवलंबून राहावे लागते.
Apang Pension Yojana 2024 अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा अंतर्गत अपंग दिव्यांग पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीला महाराष्ट्र सरकारमार्फत 600 ते 1000 रुपये प्रति महा पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येईल.
Apang Pension Yojana 2024 In Marathi अपंग हे देखील समाजाचाच एक भाग आहेत त्यांनाही ताठ मानेने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. या भावनेतून महाराष्ट्र सरकारने अपंग दिव्यांग पेन्शन योजनेची सुरुवात केली. एखादा व्यक्ती जन्मताच अपंग असतो किंवा काही व्यक्तींना काही काळानंतर कोणत्याही अडचणीमुळे अपंगत्व येते परंतु हे काहीच त्याच्या हातात नसते अशा अपंग व्यक्तीचा समाजाचा घटक न समजणे हे योग्य नाही.
Apang Pension Yojana 2024 In Marathi अपंग व्यक्तींना त्यांचे जीवन सोप्या पद्धतीने जगता यावे, त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अपंग व्यक्ती स्वावलंबी बनतील.
Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आणि शारीरिक या दोन्ही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना अपंगत्वामुळे परावलंबी राहावे लागते. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपंग योजना 2024 Apang Pension Yojana 2024 या योजनेअंतर्गत आर्थिक मदत म्हणून मासिक पेन्शन सुरू केली आहे.
Apang Pension Yojana या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व अपंगांना घेता येईल. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना मिळणारे पेन्शनची रक्कम 600 ते 1000 रुपये दरमहा इतकी असेल.
Apang Pension Yojana अपंग पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक समाज प्रबोधन करणारी योजना आहे. समाजातील अपंग व्यक्तींना महाराष्ट्र सरकार मार्फत 600 ते 1000 रुपये दरमहा अशी अनुदान पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. यामुळे अपंग व्यक्ती स्वावलंबी बनतील ताठ मानेने त्यांचे जीवन जगू शकतील, त्यांच्या दैनंदिन जीवनाला आर्थिक हातभार लागेल.
ठळक मुद्दे
अपंग पेन्शन योजना 2024 मराठी माहिती
Apang Pension Yojana 2024 Information In Marathi
अपंग पेन्शन योजनेची थोडक्यात माहिती
Apang Pension Yojana In Short
अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट
Apang Pension Yojana Purpose
अपंग पेन्शन योजनेचे फायदे
Apang Pension Yojana Benefits
अपंग पेन्शन योजनेचे पात्रता
Apang Pension Yojana Eligibility
अपंग पेन्शन योजनेची कागदपत्रे
Apang Pension Yojana Documents
अपंग पेन्शन योजनेचे अर्ज प्रक्रिया
Apang Pension Yojana Apply
अपंग पेन्शन योजनेची थोडक्यात माहिती
Apang Pension Yojana In Short
योजनेचे नाव | अपंग पेन्शन योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अपंग व्यक्ती |
पेन्शन रक्कम | 600 ते 1000 रुपये |
उद्देश | अपंगांना आर्थिक मदत करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट
Apang Pension Yojana Purpose
- या योजने मुळे समाजातील अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल.
- अपंग योजनेअंतर्गत अपंग मुलांना मोफत शिक्षण देखील घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेऊन अपंग व्यक्ती ही वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करू शकतील.
अपंग पेन्शन योजनेचे फायदे
Apang Pension Yojana Benefits
- महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल व ते या प्रगतशील समाजाचा घटक बनतील.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांमुळे अपंग व्यक्तींना त्यांच्या मनातील न्यूनगंडाची भावना कमी होईल.
- या योजनेमुळे अपंग व्यक्तीला स्वयंरोजगार उपलब्ध होईल व ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनतील.
- या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीला 600 ते 1000 रुपये दरमहा पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत मिळणार आहे.
- या योजनेत अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही अर्जदार च्या बँक खात्यात जमा केली जाईल.
अपंग पेन्शन योजनेचे पात्रता
Apang Pension Yojana Eligibility
- अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र बाहेरील अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा अर्जदार हा कुठल्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
- अर्जदार व्यक्तीला अर्ज करताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जी व्यक्ती 80 टक्के पेक्षा जास्त अपंग आहे अशाच व्यक्तींना अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 35 हजार पेक्षा जास्त नसावे.
अपंग पेन्शन योजनेची कागदपत्रे
Apang Pension Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अपंग पेन्शन योजनेचे अर्ज प्रक्रिया
Apang Pension Yojana Apply
अपंग पेन्शन योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे जावे लागेल.
तिथून अपंग पेन्शन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
त्यानंतर सदर अर्ज हा कार्यालयात जमा करावा लागेल.
त्यानंतर तेथील अधिकारी अर्जाची पडताळणी करतील.
अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत मंजुरी करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल.
अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर अर्जदाराची पेन्शन सुरू होईल
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
प्रधानमंत्री किसान संपदा योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना