ATM Cash Withdrawal Without ATM Card Marathi : ATM कार्ड सोबत नसतानाही काढा एटीएम मधून पैसे

ATM Cash Withdrawal Without ATM Card Marathi : आता यूपीआय द्वारे काढता येणार कॅश

ATM Cash Withdrawal Without ATM Card : आपण पाहतो प्रत्येकाजवळ ATM असते. प्रत्येक जण ATM वापरतोच. कधीही पैसे काढायचे काम पडले तर त्वरित जवळील ATM Card मध्ये एटीएम मशीन मधून पैसे काढतो. ATM card हे एक आता आवश्यक साधन बनले आहे.

पण आता एटीएम कार्ड नसतानाही तुम्ही एटीएम मधून पैसे काढून शकणार आहात. होय ! खरच बरोबर बोलत आहोत आम्ही. जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल आणि तुम्हाला रकमेची खूप गरज असेल तर ही सुविधा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे एटीएमची ही सुविधा. यासाठी तुम्हाला फक्त UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ची गरज आहे. देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना यूपीआय द्वारे एटीएम मधून पैसे काढण्याचे सुविधा देत आहेत. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

how to withdraw cash from atm without card आज आपण या लेखाच्या माध्यमातून ही सुविधा कशी आहे आणि तुम्ही एटीएम मधून बिना एटीएम कार्ड चे पैसे कसे काढू शकणार आहात याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

असे काढा एटीएम कार्ड शिवाय पैसे

ATM Cash Withdrawal

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळील एटीएम मशीन मध्ये जा.
  • त्यानंतर ATM स्क्रीनवर कार्ड विड्रॉल किंवा UPIbcash withdrawal हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर एटीएम स्क्रीनवर एक QR कोड किंवा एक कोड नंबर दिसेल.
  • तुमच्या स्मार्टफोन मधील गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा इतर कोणत्याही यूपीआय द्वारे हा QR कोड स्कॅन करा.
  • त्यानंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम आणि तुमचा PIN एन्टर करा.
  • त्यानंतर लगेच एटीएम मधून तुम्हाला हवी असली की रोख रक्कम बाहेर काढता येईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या फोनमध्ये UPI अँप असणे आवश्यक आहे.
ही सुविधा ज्या बँकेच्या एटीएम मध्ये उपलब्ध आहे त्याच एटीएम मध्ये तुम्हाला जावे लागेल सध्या तरी सर्वच बँकांनी अजूनही सुविधा सुरू केलेली नाही.
प्रत्येक बँकेसाठी यूपीआय द्वारे पैसे काढण्याचे मर्यादा वेगळे असू शकते साधारणपणे एका व्यवहारात 5000 ते 10000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येतात तर एका दिवसाची मर्यादा 20000 रुपयांपर्यंत असू शकते.
ही पद्धत अत्यंत सुरक्षित आहे. कारण यात तुमच्या कार्डचा कुठल्याही प्रकारे वापर होत नाही आणि पिन फक्त तुमच्या फोनवरच टाकला जातो.