ATM New Update 2025 In Marathi : एटीएम मधून पैसे काढणे महागणार?

ATM New Update 2025 In Marathi : एटीएम मधून पैसे काढणे महागणार?

ATM New Update 2025 In Marathi : आज मोठ्या प्रमाणावर देशभरात डिजिटल व्यवहार केले जातात. मात्र तरीही अनेकांना रोख व्यवहार करण्यासाठी ATM मधून पैसे काढावे लागतात तर तुम्हीही एटीएम मधून पैसे काढत असाल तर लवकर तुमच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. कारण आरबीआय बँक ग्राहकांसाठी शुल्क आणि एटीएम इंटरचेंज मोफत पाच व्यवहार मर्यादेपेक्षा अधिक वाढवायचा तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क?

ATM मधून पाच व्यवहारानंतर रोख रक्कम काढल्यास कमाल शुल्क 21 रुपये वरून 22 रुपये करण्याची शिफारस नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली आहे. यावरोबरच एटीएम इंटरचेंज शुल्क वाढ करण्याची शिफारस एनपीसीआयने केली आहे. इंटरचेंज फीस 17 रुपये वरून 19 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर नॉन कॅश ट्रांजेक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे.

ATM इंटरचेंज फीस म्हणजे काय?

ATM इंटरचेंज चार्ज (फीस) म्हणजे एखादी बँक दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरण्यासाठी भरावी लागणारी रक्कम म्हणजेच एटीएम इंटरचेंज फीस होय. या शुल्काचा परिणाम ग्राहकावर होतो. कारण बँक रक्कम ग्राहकाकडून वसूल करते.

खर्च वाढणार?

ATM New Update 2025 एनपीसीआयच्या प्रस्तावाला बँक आणि व्हाईट लेबर एटीएम ऑपरेटर यांनी संमती दिली आहे. ही वाढ केवळ महानगरापूर्ती मर्यादित राहणार नसून देशभरातील लहान-मोठे गाव, शहरे यांनाही लागू होणार आहे. आरबीआय, इंडियन बँक असोसिएशनचे सीईओ, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी अधिकाऱ्यांची यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने बँकिंग क्षेत्राच्या खर्चाचे मूल्यमापन करून अशी शिफारस केली आहे.

खर्च वाढल्याने निर्णय

ATM New Update 2025 देशभरात एटीएम चालण्याचा खर्च वाढला आहे. वाढती महागाई, चढे व्याजदर, रोकड भरण्याचा वाढलेला खर्च आणि वाढता अनुपालन खर्च या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा बँकिंग तज्ञांचे म्हणणे आहे.

ATM New Update 2025 मात्र आरबीआय किंवा एनपीसीआयकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास एटीएम मधून पैसे काढणाऱ्याच्या खिशाला चाप बसणार आहे.

कॅश ट्रांजेक्शनसाठी एक्सचेंज फीस ₹17 वरून 19 रुपये करण्यास शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच नॉन कॅश ट्रांजेक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे.