Balika Samridhi Yojana 2024 In Marathi : बालिका समृद्धी योनजनेमुळे मुलींचे भविष्य घडणार

Balika Samridhi Yojana 2024 Information In Marathi : बालिका समृद्धी योजना मराठी माहिती

Balika Samridhi Yojana In Marathi : महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत मुलींसाठी भरपूर योजना राबविल्या आहेत. लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक प्रकारच्या योजना सरकारने राबविल्या आहेत. त्यातच अजून एका योजनेची भर झालेली आहे. ती म्हणजे बालिका समृद्धी योजना. मुलींना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करता यावी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने बालिका समृद्धी योजना सुरू केली आहे. आपण पाहतो की, समाजामध्ये अजूनही मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव केला जातो. मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे उच्च शिक्षण घेऊ देत नाहीत. मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहू देत नाही. त्यांना सक्षम बनवून दिले जात नाही. मुलगी ही कुटुंबाला ओझं वाटते. समाजातील हा सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आणि प्रत्येकाला मुलगी म्हणजे माझा अभिमान आहे ही दाखवून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बालिका समृद्धी योजना Balika Samridhi Yojana ही भारत सरकार मार्फत ऑगस्ट 1997 मध्ये मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरू झालेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पैसे काढता येतात. मुलगी जन्मल्यानंतर 500 रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते. त्या मुलीचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले की तिला वार्षिक एक ठरलेली रक्कम मिळते. यामुळे मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. मुलीला तिच्या जन्मावर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकार मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावर 500 रुपयांची आर्थिक सहाय्य मिळते. देशातील मुलींविषयी सकारत्मकता जागरूक होण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते.

Balika Samridhi Yojana

आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण बालिका समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बालिका समृद्धी योजना म्हणजे काय?, बालिका समृद्धी योजनेचा कोणाला होतो लाभ?, बालिका समृद्धी योजनेचे काय आहेत फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता?, या योजनेसाठी कसा करावा अर्ज? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

बालिका समृद्धी योजना मराठी माहिती

Balika Samridhi Yojana In Marathi

Balika Samridhi Yojana In Marathi महाराष्ट्र सरकार हे विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी नवनवीन योजना राबवत आहे. आपल्या देशातील मुलींचे भविष्य उज्वल व्हावे त्यांना चांगले शिक्षण मिळावे त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविल्या गेलेल्या आहेत. बालिका समृद्धी योजनेची सुरुवात ऑगस्ट 1997 ला महिला व बाल विकास विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेली बचत ठेव योजना आहे. समाजातील मुलींविषयीचा गैरसमज दूर करणे, मुलगा – मुलगी असा भेदभाव न करणे, मुलींच्या शिक्षणासाठी व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबविली जाते. या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाते. समाजातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच स्त्रीभ्रूण हत्या व मुलींचा समाजात दुय्यम स्थान यामुळे अनेक महिला आजही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत, हे थांबवण्यासाठी तसेच मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, त्यांना त्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी, मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्यासाठी Balika Samridhi Yojana ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बालिका समृद्धी योजना ही महिला व बालविकास विभागाअंतर्गत ऑगस्ट 1947 मध्ये सुरू करण्यात आलेली एक बचत ठेव योजना आहे. या योजनेचा लाभ 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना मिळतो. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्ररेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या सर्व मुलींना घेता येतो. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या आईला 500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. त्यानंतर मुलगी 10 वी ला गेल्यानंतर तिला वार्षिक एक ठराविक रक्कम दिली जाते. त्यानंतर मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर बँकेतून ही जमा रक्कम काढू शकते. ऑगस्ट 1997 नंतर दारिद्ररेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या सर्व मुली बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ठळक मुद्दे :

बालिका समृद्धी योजना मराठी माहिती

Balika Samridhi Yojana In Marathi

बालिका समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती

Balika Samridhi Yojana In Short

बालिका समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

Balika Samridhi Yojana Maharashtra Features

बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्टे

Balika Samridhi Yojana Purpose

बालिका समृद्धी योजनेचे फायदे

Balika Samridhi Yojana Benefits

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत कशी मिळते शिष्यवृत्ती

Balika Samridhi Yojana Maharashtra 

बालिका समृद्धी योजनेच्या अटी

Balika Samridhi Yojana Maharashtra Conditions

बालिका समृद्धी योजनेची पात्रता

Balika Samridhi Yojana Eligibility

बालिका समृद्धी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Balika Samridhi Yojana Documents

बालिका समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया

Balika Samridhi Yojana Application Form

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बालिका समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती

Balika Samridhi Yojana In Short

योजनेचे नावबालिका समृद्धी योजना
कोणी सुरू केलीभारत सरकार
कधी सुरू केलीऑगस्ट 1997
लाभार्थीदेशातील मुली
लाभाची रक्कम300 रुपये ते 1000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://wcd.nic.in/
Balika Samridhi Yojana

बालिका समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

Balika Samridhi Yojana Maharashtra Features

  • Balika Samridhi Yojana बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलगी 10 वर्षे किंवा त्याहून कमी वयाची असल्यास तिच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते
  • या खात्यात कमीत कमी 1000 रुपये ठेवणे आवश्यक आहे या खात्यामध्ये एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम भरता येऊ शकते
  • बँकेत खाते उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जर तिचे लग्न ठरले असेल तर यापैकी जे आधी होईल ते त्यासाठी तुम्ही ठेवलेली रक्कम ही तुम्हाला व्याजासह परत मिळते
  • मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते आणि उर्वरित रक्कम ही तुम्हाला मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत केव्हाही काढता येते
  • बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मावर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारमार्फत आर्थिक सहाय्य केले जाते
  • Balika Samridhi Yojana या योजनेमुळे समाजात मुलींविषयीची जी नकारात्मकता आणि जे गैरसमज झालेले आहेत ते दूर होतील
  • लाभार्थी मुलीला तिच्या जन्मावर सरकारकडून 500 रुपये आर्थिक मदत केली दिली जाते जोपर्यंत मुलगी 10 वी शिक्षणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दरवर्षी मुलीला निश्चित रक्कम दिली जाते
  • Balika Samridhi Yojana या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते
  • मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिची सरकार मार्फत जमा झालेली आर्थिक मदत ती काढू शकते
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी ही लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल
  • Balika Samridhi Yojana योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही
  • जर मुलीचे 18 वर्षाच्या आत लग्न झाले तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • जर मुलीचे तिच्या वयाच्या अठरा वर्षांपूर्वी निधन झाले तर जमा रक्कम काढता येईल
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावी
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही मुलगी इयत्ता 1 ली ते 3 री शिक्षण घेत असल्यास तिला 300 रुपये, इयत्ता 4 थी साठी 500 रुपये, इयत्ता 5 वी साठी 600 रुपये, इयत्ता 6 वी आणि 7 वी साठी 700 रुपये, इयत्ता 8 वी साठी 800 रुपये, आणि इयत्ता 9 वी व 10 वी साठी 1000 रुपये अशी आर्थिक मदत सरकार मार्फत दिली जाते

बालिका समृद्धी योजनेची उद्दिष्टे

Balika Samridhi Yojana Purpose

  • Balika Samridhi Yojana In Marathi योजनेमुळे मुलींना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
  • दारिद्र रेषेखालील मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • समाजात झालेला मुलींबद्दलचा गैरसमज दूर करणे तसेच मुलगा मुलगी भेद भाव बंद करणे.
  • या योजनेमुळे मुलींना शिक्षण घेताना कुठल्याही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही.
  • Balika Samridhi Yojana In Marathi योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्वल होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

बालिका समृद्धी योजनेचे फायदे

Balika Samridhi Yojana Benefits

  • बालिका समृद्धी योजनेअंतर्गत Balika Samridhi Yojana In Marathi मुलीला तिच्या जन्मानंतर सरकार मार्फत 500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेचा लाभ हा फक्त 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येतो.
  • Balika Samridhi Yojana Maharashtra योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये पासून ते मुलगी दहावीला पोहोचेपर्यंत एक ठराविक रक्कम तिला दिली जाते.
  • बालिका समृद्धी योजनेचा लाभ हा दारिद्र्य रेषेखालील मुलींना घेता येतो.
  • मुलीचे 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर निधन झाले तर जमा रक्कम ही बालिका समृद्धी योजनेअंतर्गत इतर पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी अंमलबजावणी एजन्सी द्वारे काढली जाईल.
  • जर मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झाले असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ती फक्त 500 रुपयांच्या जन्मानंतर अनुदान रकमेसाठी ती पात्र असेल त्या मुलीला मिळणारी वार्षिक शिष्यवृत्ती आणि त्यावर जमा झालेले व्याज हे अंमलबजावणी करणारी एजन्सी व्याज काढून घेण्यास पात्र असेल ही रक्कम इतर पात्र मुलींना देण्यात येईल.

तुम्ही घेतलाय का योजनेचा लाभ

श्रावण बाळ योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

उच्च शिक्षणासाठी सरकार करणार 60 हजारांची मदत

शबरी घरकुल योजनेतून मिळवा हक्काचे घर

जलयुक्त शिवार योजनेद्वारे गावे होणार जलसमृद्ध

विद्यार्थ्यांना मिळणार दीड लाखाचे विमा संरक्षण

मागेल त्याला विहीर योजना ठरतीये वरदान

व्यवसायासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज

आता महिलांना करता येणार हाफ तिकिटावर प्रवास

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत कशी मिळते शिष्यवृत्ती

Balika Samridhi Yojana Maharashtra  

बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महिला व बालविकास मंत्रालयाच्या बालिका समृद्धी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या मुलींना देण्यात येते ती खालील प्रमाणे

इयत्तावार्षिक शिष्यवृत्ती  
वर्ग 1 ते वर्ग 3300 रुपये वार्षिक प्रत्येक वर्गासाठी  
वर्ग 4500 रुपये प्रति वर्ष
वर्ग 5600 रुपये प्रति वर्ष
वर्ग 6 आणि वर्ग 7700 रुपये वार्षिक प्रत्येक वर्गासाठी
वर्ग 8800 रुपये प्रति वर्ष
वर्ग 9 आणि वर्ग 101000 रुपये वार्षिक प्रत्येक वर्गासाठी
Balika Samridhi Yojana

बालिका समृद्धी योजनेच्या अटी

Balika Samridhi Yojana Maharashtra Conditions

  • बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही लाभार्थीच्या थेट बँक खात्यात डीबीटीच्या मार्फत जमा केली जाते. या बँकेद्वारे व्याज देखील मिळते.
  • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लाभार्थी मुलीला जास्तीत जास्त रक्कम परत मिळणे हे आहे.
  • Balika Samridhi Yojana In Marathi योजनेअंतर्गत मुलीला तिच्या नावाने भाग्यश्री बालिका कल्याण विमा योजनेअंतर्गत घेतलेला विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी या योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा काही रक्कम वापरली जाऊ शकते यासाठी विमा पॉलिसी ही लाभार्थी मुलीच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • मुलीला शिष्यवृत्तीची जी रक्कम मिळणार आहे ती मूलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजे तिला वह्या, पुस्तके, गणवेश खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
  • या योजनेचा लाभ हा अविवाहित मुलीलाच घेता येऊ शकतो.
  • ज्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आत लग्न झाले आहे त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होण्या पूर्वीच लग्न झालेले असेल त्या मुलीला तिचे शिष्यवृत्तीची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज हे गमवावे लागेल त्या मुलीला फक्त तिच्या जन्मानंतर ची लाभ रक्कम आणि त्यावरील व्याज मिळेल.
  • मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिच्या खात्यातील जमा झालेली रक्कम काढू शकते.
  • मुलीला तिच्या खात्यातील जमा रक्कम ही काढण्यासाठी तिचे शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • जर तिचे शिक्षण पूर्ण झालेले नसेल तर मुलीला तिच्या जन्माच्या वेळी मिळालेल्या मदतीत पहिल्या हप्त्यानंतरची आर्थिक मदतीची रक्कम ही मर्यादित असेल.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

मोफत पिठाच्या गिरणीतून महिला होतायेत आत्मनिर्भर

सौभाग्य योजनेद्वारे प्रत्यकाचे घर प्रकाशमय

शेतीचा विकास करण्यासाठी आधुनिकतेची जोड

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ठरतेय प्रभावी

मुलींसाठी सायकल योजना ठरत आहे प्रभावी

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार 20 लाखापर्यंतचे कर्ज

10 कोटीपेक्षा अधिक कुटुंबियांना मिळाला शौचालय योजनेचा लाभ

बालिका समृद्धी योजनेची पात्रता

Balika Samridhi Yojana Eligibility

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याची कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलीलाच घेता येईल.
  • या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच घेता येईल.
  • ज्या मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर झालेला आहे त्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

बालिका समृद्धी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Balika Samridhi Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

जन्म प्रमाणपत्र

पालकांचे ओळखपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न दाखला

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

Balika Samridhi Yojana

बालिका समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया

Balika Samridhi Yojana Application Form

बालिका समृद्धी योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जावे लागेल किंवा जर लाभार्थी मुलगी शहरी भागातील असेल तर आरोग्य केंद्रात जावे लागेल

तेथील कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला बालिका समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा या योजनेचा अर्ज https://wcd.nic.in/  या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने देखील डाउनलोड करता येईल

त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील

त्यानंतर अर्ज त्यासोबत जोडलेली कागदपत्रे ही तुम्हाला संबंधित कर्मचाऱ्यांकडे जमा करावे लागतील

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही बालिका समृद्धी योजनेचा अर्ज करू शकता

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: बालिका समृद्धी योजना कोणासाठी आहे?

उत्तर: बालिका समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.  

प्रश्न: बालिका समृद्धी योजनेअंतर्गत एका कुटुंबातील किती मुलींना लाभ मिळतो?

उत्तर: बालिका समृद्धी योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.

प्रश्न: बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना किती मिळते शिष्यवृत्ती?

उत्तर: बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना 300 ते 1000 रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती त्यांच्या इयत्तेनुसार दिली जाते.

प्रश्न: बालिका समृद्धी योजना कधी सुरू झाली?

उत्तर: बालिका समृद्धी योजना ही 1997 मध्ये सुरू करण्यात आली.

प्रश्न: बालिका समृद्धी योजनेचा काय आहे उद्देश?

उत्तर: या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीला तिच्या जन्माला आणि तिच्या शिक्षणाला पाठिंबा देणे हा आहे.

प्रश्न: बालिका समृद्धी योजनेचा कसा करावा अर्ज?

उत्तर: बालिका समृद्धी योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA