One Nation One Ration Card Scheme 2024 In Marathi : एकाच कार्डावर घेता येणार देशात कुठेही रेशन

Table of Contents

One Nation One Ration Card Scheme 2024 Information In Marathi : वन नेशन वन रेशन कार्ड योजना मराठी माहिती

One Nation One Ration Card Scheme : नमस्कार वाचकहो, आजच्या लेखात आपण वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे.

आज आपण वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे काय?, वन नेशन वन रेशन कार्ड चे फायदे, लाभ, उद्दिष्टे, पात्रता, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

One Nation One Ration Card

वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे काय

What Is One Nation One Ration Card Yojana

वन नेशन वन नेशन कार्ड ही योजना One Nation One Ration Card Yojanaसंपूर्ण देशात लागू करण्यात आलेली एक केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड असणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत आपल्या संपूर्ण देशात दर महिन्याला सुमारे 125 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार होत आहे. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले 80 कोटी लाभार्थी वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेत आहेत. वन नेशन वन रेशन कार्डचा ONORC मुख्य उद्देश हा या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील पीडीएफ रेशन दुकानातून कोणत्याही ठिकाणाचा नागरिक त्याचे रेशन कार्ड वापरून रेशन घेऊ शकतील. ही योजना सुरू होण्यापूर्वी नागरिकाला रेशन घेण्यासाठी त्याच्याच भागात घ्यावे लागत होते. त्यामुळे जे नागरिक बाहेरगावी राहतात त्यांना हे रेशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. त्यांना दर महिन्याला त्यांच्या भागात जाऊन रेशन घेता येत नव्हते. या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली. त्यामुळे आता देशातील नागरिक हा कोणत्याही राज्याच्या पीडीएफ रेशन दुकानातून त्याचे रेशन घेऊ शकेल. या योजनेमुळे स्थलांतरित कामगार हे त्यांच्या कुटुंबीयांना देशातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळवून देतील. One Nation One Ration Card योजनेची सुरुवात सर्वप्रथम 2019 मध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने चार राज्यांमध्ये एक चाचणी उपक्रम म्हणून सुरू केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी नवीन 12 राज्यांना या योजनेत प्रवेश देण्यात आला.

ठळक मुद्दे :

वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे काय

What Is One Nation One Ration Card Yojana

वन नेशन वन रेशन कार्डची थोडक्यात माहिती

One Nation One Ration Card Scheme In Short

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे फायदे

One Nation One Ration Card Yojana Benefits

वन नेशन वन रेशन कार्ड ची वैशिष्ट्ये

One Nation One Ration Card Yojana Features

वन नेशन वन रेशन कार्ड ची उद्दिष्ट

One Nation One Ration Card Scheme Purpose

वन नेशन वन रेशन कार्ड चे स्वरूप

One Nation One Ration Card Scheme

वन नेशन वन रेशन कार्डसाठीची अर्ज प्रक्रिया

One Nation One Ration Card Scheme Apply

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत या राज्यांचा समावेश

One Nation One Ration Card Yojana

एक देश एक रेशन कार्ड साठी मोबाईल ॲप

One Nation One Ration Card

मोबाईल ॲपची वैशिष्ट्ये

One Nation One Ration Card

मेरा रेशन मोबाईल ॲप कसे डाऊनलोड करावे

One Nation One Ration Card Scheme

सध्याची स्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोन

One Nation One Ration Card

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्ने

वन नेशन वन रेशन कार्डची थोडक्यात माहिती

One Nation One Ration Card Scheme In Short

योजनेचे नाववन नेशन वन रेशन कार्ड
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केली1 जानेवारी 2020
लाभार्थीदेशातील नागरिक
उद्देशदेशातील कोणत्याही रेशन दुकानातून नागरिकांना रेशन घेता येणे
अर्ज प्रक्रियाअर्ज करण्याची आवश्यकता नाही
One Nation One Ration Card

वन नेशन वन रेशन कार्ड ची उद्दिष्ट

One Nation One Ration Card Scheme Purpose

  • देशात होणारा भ्रष्टाचार थांबवणे तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालणे हे वन नेशन वन रेशन कार्ड चे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या योजनेमुळे स्थलांतरित नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे या योजनेमुळे त्यांना अन्नसुरक्षा मिळेल.
  • या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना संपूर्ण राज्यामध्ये लवकरात लवकर सुरू केली आहे.
  • या योजनेमुळे स्थलांतरित झालेल्या व्यक्तीला त्याचे रेशन घेण्यासाठी कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे फायदे

One Nation One Ration Card Yojana Benefits

  • वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा One Nation One Ration Card लाभ हा देशातील प्रत्येक नागरिकाला जून 2020 पासून घेता येत आहे.
  • या योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा जे नागरिक परदेशात राहतात त्यांना होत आहे.
  • या योजनेमुळे प्रत्येक ग्राहक हा त्याचे रेशन कार्ड वापरून कोणत्याही रेशन दुकानातून अगदी सहजपणे रेशन उपलब्ध करू शकतो.

वन नेशन वन रेशन कार्ड ची वैशिष्ट्ये

One Nation One Ration Card Yojana Features

  • वन नेशन वन रेशन कार्ड योजना One Nation One Ration Card केंद्र सरकारने स्थलांतरित नागरिकांना रेशन मिळण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत तांदूळ आणि गहू यासारखे अन्नधान्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली जातात.
  • या योजनेमुळे देशातील कोणताही नागरिक कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळवू शकतो.
  • संपूर्ण देशभरात 5.25 लाख रेशन दुकान हे वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत समाविष्ट आहेत.
  • या योजनेअंतर्गत रेशन देण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा वापरली जाते.
  • जे नागरिक हे 65 वर्षांच्या वरील आहेत किंवा जे नागरिक अपंग आहेत त्यांना या योजनेअंतर्गत रेशनची घरपोच सेवा मिळते.
  • One Nation One Ration Card योजनेसाठी सरकारने एक ॲप सुरू केले आहे ते ॲप म्हणजे मेरा रेशन हे ॲप आहे हे ॲप वापरून तुम्हाला किती रेशन मिळेल हे या ॲपद्वारे तपासून शकता.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सुकन्या समृद्धी योजना 2024

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

वन नेशन वन नेशन कार्ड योजनेची निवड प्रक्रिया

One Nation One Ration Card Scheme

रेशन कार्ड चे दोन प्रकार आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एक म्हणजे APL रेशन कार्ड आणि दुसरे म्हणजे BPL रेशन कार्ड. हे रेशन कार्ड नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार दिली जातात. या वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत कशी निवड केली जाते हे आपण पाहू.

APL रेशन कार्ड : आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांना म्हणजेच ज्यांची फेडरल दारिद्र्य पातळीपेक्षा जास्त कमाई आहे अशा नागरिकांना APL रेशन कार्ड मिळते.

BPL रेशन कार्ड : दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच ज्यांचे उत्पन्न गरीब पातळीपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना BPL रेशन कार्ड मिळते.

One Nation One Ration Card

वन नेशन वन रेशन कार्ड चे स्वरूप

One Nation One Ration Card Scheme

वन नेशन वन रेशन कार्ड ONORC हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. तसेच मराठी भाषेत देखील रेशन कार्ड घेता येईल.

नवीन शिधापत्रिका ही आवश्यक असलेली माहिती प्रदान करेल.

वन नेशन वन रेशन कार्डच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये 10 अंकी रेशन कार्ड क्रमांक नोंदविला जाईल यापैकी पहिले 2 अंक म्हणजे राज्याचा कोड दिसतो आणि पुढील 2 अंकांमध्ये रेशन कार्डचा नंबर दिसतो.

या 4 अंकांव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबातील सदस्याला एक अद्वितीय ओळखपत्र देण्यासाठी यामध्ये आणखीन 2 अंक जोडले जातील.

वन नेशन वन रेशन कार्डसाठीची अर्ज प्रक्रिया

One Nation One Ration Card Scheme Apply

केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा ONORC देशातील शिधापत्रिका धारांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सर्व राज्य आणि केंद्र सरकार स्वतः  लाभार्थीच्या शिधापत्रिकाच्या आधार कार्ड फोनवर पडताळणी करतात आणि लिंक करून घेतात. त्यानंतर एकात्मिक व्यवस्थापन सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत डेटा उपलब्ध करून देईल, ज्याद्वारे सर्व पात्र नागरिकांना देशाच्या कुठल्याही भागात स्वतःच्या शिधापत्रिकेच्या आधारे रेशन दुकानातून रेशन घेता येईल.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

शबरी घरकुल योजनेतून मिळवा हक्काचे घर

जलयुक्त शिवार योजनेद्वारे गावे होणार जलसमृद्ध

विद्यार्थ्यांना मिळणार दीड लाखाचे विमा संरक्षण

मागेल त्याला विहीर योजना ठरतीये वरदान

व्यवसायासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज

आता महिलांना करता येणार हाफ तिकिटावर प्रवास

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत या राज्यांचा समावेश

One Nation One Ration Card Yojana

देशभरातील नागरिकांना देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असताना आपल्या शिधापत्रिकाच्या द्वारे कुठल्याही राज्यात रेशन खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारने वन रेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक ची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. आधार कार्डचा वापर करून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची पडताळणी केली जात आहे. कार्यक्रमाच्या सर्वसमावेशक तपशिलासाठी कोणीही आता एकात्मिक सार्वजनिक वितरण प्रणाली ऑनलाइन भेट देऊ शकतो आणि या सर्व राज्यांची यादी पाहू शकतो.

केंद्र सरकारच्या एक देश एक रेशन कार्ड योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यांची यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. तुम्हाला प्रथम एकात्मिक वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य पृष्ठ दिसेल या मुख्य पृष्ठवर या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व राज्यांची यादी तुम्हाला दिसेल.

एक देश एक शिधापत्रिका लागू करणाऱ्या राज्याची यादी खालील प्रमाणे

बिहार

चंदिगड

आंध्र प्रदेश

अरुणाचल प्रदेश

दमन अँड देउ

गोवा

गुजरात

हरियाणा

हिमाचल प्रदेश

जम्मू कश्मीर

झारखंड

कर्नाटका

केरळ

लक्षदीप

लेह

लडाख

मध्य प्रदेश

महाराष्ट्र

मणिपूर

मिझोराम

उत्तराखंड

उत्तर प्रदेश

त्रिपुरा

तेलंगणा

तामिळनाडू

सिक्कीम

राजस्थान

पंजाब

पुडुचेरी

एक देश एक रेशन कार्ड साठी मोबाईल ॲप

One Nation One Ration Card 

केंद्र सरकारने आता एक देश एक शिधापत्रिका योजनेच्या अंतर्गत एक मेरा रेशन मोबाईल ॲप सुरू केले आहे. याद्वारे इतर राज्यात नोकरी, रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांना ॲपचा वापर करून त्या राज्यात स्वतःच्या शिधापत्रिकाच्या आधारावर रेशन घेता येईल.

मोबाईल ॲपची वैशिष्ट्ये

One Nation One Ration Card 

या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागातील रेशन दुकान शोधू शकता.

याद्वारे लाभार्थ्याला त्याच्या अन्नधान्याच्या हक्काची माहिती मिळवता येते.

यापूर्वी तुम्ही खरेदी केलेल्या रेशनची माहिती ही मेरा रेशन मोबाईल ॲप द्वारे मिळवता येते.

तसेच आधार शेडिंगची संबंधित माहितीही यावर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त तुम्ही मेरा रेशन स्मार्टफोन ॲप वापरून शिफारशी आणि अभिप्राय देऊ शकता.

ह्या ॲप मध्ये अर्जदाराला हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये अर्ज करण्याची पर्याय उपलब्ध आहे

One Nation One Ration Card

मेरा रेशन मोबाईल ॲप कसे डाऊनलोड करावे

One Nation One Ration Card Scheme

तुम्हाला सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन मेरा रेशन मोबाईल ॲप असे सर्च करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर प्ले स्टोर वर अनेक अप्लिकेशन येतील पण पहिला एप्लीकेशन वर तुम्ही क्लिक करावे.

क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.

एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होईल.

तुमचे आधार कार्ड तुमच्या शिधापत्री केशी कसे लिंक करावे

यासाठी तुम्हाला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावि लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल तुम्हाला होम पेजवर स्टार्ट नाऊ पर्याय निवडणे आवश्यक आहे.

तुम्हाला पुढे तुमचा पत्ता लिहावा लागेल.

तुम्ही आता रेशन कार्ड बेनेफिट पर्याय निवडणे आवश्यक आहे.

त्यानंतर रेशन कार्ड बेनिफिट पर्याय निवडा.

त्यावर तुमचा ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर, रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर टाकावा.

तुम्ही नोंदणी केलेल्या फोन नंबर वर एक ओटीपी येईल हा ओटीपी बॉक्समध्ये टाकणे गरजेचे आहे.

त्यानंतर प्रक्रिया पूर्ण सूचना आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही रेशन कार्डशी आधार लिंक करू शकता.

सध्याची स्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोन

One Nation One Ration Card 

केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड ची अंमलबजावणी फेब्रुवारी 2024 पर्यंत 39 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली आहे. याद्वारे 80% पेक्षा जास्त लाभार्थीची संख्या आहे.

2024 चा शेवटपर्यंत देशभर ही योजना राबवण्याची सरकारचे उद्दिष्ट आहे. देशातील प्रत्येक शिधाधारक व्यक्तीला देशातील कुठल्याही कार्याकोपऱ्यात आपल्या नावाचे रेशन घेता येईल.

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्ने

प्रश्न: वन नेशन वन राशन कार्ड साठी कोण आहे पात्र?

उत्तर: देशातील प्रत्येक शिधाधारक हा या योजनेसाठी पात्र आहे.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत रेशन कसे मिळेल?

उत्तर: देशातील कुठल्याही दुकानात जाऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड दाखवून या योजनेअंतर्गत रेशन मिळू शकतात.

प्रश्न: दुसऱ्या राज्यात स्थलांतरित केल्यास लाभ मिळतो का?

उत्तर: या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक शिधापत्रिकाधारक व्यक्तीला देशातील कुठल्याही रेशन दुकानात जाऊन आपले रेशन खरेदी करता येईल.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड वापरण्यासाठी काही शुल्क आहे का?

उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाहीत ही योजना एकदम मोफत आहे.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड चा फायदा काय?

उत्तर: या योजनेचा फायदा म्हणजे कामानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अनेक लोक स्थलांतरित होत असतात, मात्र त्या राज्यात गेल्यानंतर त्यांना रेशनचा लाभ घेता येत नाही अशा लोकांना देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात नोकरी निमित्त राहण्यासाठी गेलेल्यांना तिथल्या संबंधित रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA