Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi : कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार योजना

Table of Contents

Bandhkam Kamgar Yojana Information In Marathi : बांधकाम कामगार योजना 2024 मराठी माहिती

Bandhkam Kamgar Yojana : देशाच्या विकासात बांधकाम कामगारांचे महत्त्व खूप मोठे आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार काम करतात. ऊन, वारा, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता त्यांचे काम निरंतर चालू असते. बांधकाम क्षेत्रातील कामगार कमी पगारात अधिक काम करतात, त्यामुळे त्यांना स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते.

काम करत असताना त्यांना विविध अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे औषध उपचारासाठी त्यांना खूप सार्‍या समस्यांचा सामना करावा लागतो. काम करत असताना कामगाराचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी जाण्याने कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने 1 मे 2011 रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली आहे.

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana या योजनेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. कामगाराचा व कामगार कुटुंबाचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास या योजनेचा मोठा लाभ होत आहे.

कामगारांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा सामाजिक आर्थिक विकास करणे, त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ठळक मुद्दे :

बांधकाम कामगार योजनेची थोडक्यात माहिती

Bandhkam Kamgar Yojana In Short

बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टे

Bandhkam Kamgar Yojana Purpose

बांधकाम कामगार योजनेची वैशिष्ट्ये

Bandhkam Kamgar Yojana Features

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

Bandhkam Kamgar Yojana Benefits

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी शुल्क

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी पात्रता निकष

Bandhkam Kamgar Yojana Eligibility

बांधकाम कामगार यादी

Bandhkam Kamgar List

बांधकाम कामगार योजनेच्या अटी व शर्ती

Bandhkam Kamgar Yojana Terms And Conditions

बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळणाऱ्या वस्तू

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गृहपयोगी वस्तू

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

सामाजिक सुरक्षा अंतर्गत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे विविध योजना योजनांचा समावेश होत होतो ते खालील प्रमाणे

शैक्षणिक योजना

याव्यतिरिक्त आर्थिक सहाय्यबांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठीची कागदपत्रे

Bandhkam Kamgar Yojana Documents

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया

Bandhkam Kamgar Yojana Apply

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची प्रक्रिया

Bandhkam Kamgar Yojana Online Apply

बांधकाम कामगार योजना अंतर्गत ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण प्रक्रिया

बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगार नोंदणी अद्यावत करण्याची प्रक्रिया

बांधकाम कामगार योजना अंतर्गत लॉगिन करण्याची प्रक्रिया

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत उपकर भरणा करण्याची प्रक्रिया

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

बांधकाम कामगार योजनेची थोडक्यात माहिती

Bandhkam Kamgar Yojana In Short

योजनेचे नावबांधकाम कामगार योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली1 मे 2011
विभागबांधकाम कामगार विभाग
उद्देशबांधकाम कामगारांचा सामाजिक, आर्थिक विकास करणे
लाभविविध लाभ
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील बांधकाम कामगार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट https://mahabocw.in
Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टे

Bandhkam Kamgar Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सोपी करून देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारापर्यंत पोहोचणे व त्यांच्याकडून सर्व प्रकारचे आवश्यक माहिती गोळा करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करणे.  
  • बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याच्या पद्धतीमध्ये सोपेपणा आणि पारदर्शक पणा आणणे.  
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांना देण्यात येणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे.  
  • बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे नोंदणी करण्यासाठी कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची प्रत्यक्ष नोंदणी करणे. त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक कामगारांना लाभ होईल.  
  • बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभांची माहिती संबंधित कामगारांना देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या कार्यक्षमतेत कुशलता आणणे हा उद्देश आहे.
  • राज्यातील प्रत्येक बांधकाम कामगाराला एक नोंदणी क्रमांक देणे, तसेच महाराष्ट्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी विश्लेषण करणे.

बांधकाम कामगार योजनेची वैशिष्ट्ये

Bandhkam Kamgar Yojana Features

  • Bandhkam Kamgar Yojanaबांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करण्यात येतो.
  • कामगारांना आर्थिक पाठबळ या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन कामगारांचा सामाजिक आर्थिक सुरक्षेचा विचार केला जातो.
  • Bandhkam Kamgar Yojanaयोजनेच्या माध्यमातून कामगारांचे उज्वल भविष्याला योग्य चालना देणे.
  • राज्यातील कामगारांसाठी कामाची चांगली स्थिती उपलब्ध करून देणे त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • बांधकाम कामगारांना धोकादायक ठिकाणी काम करू न देणे.
  • कौशल्य विकास यांच्या माध्यमातून रोजगार क्षमता व रोजगार संधी वाढविण्यासाठी कामगारांना मार्गदर्शन करणे.
  • कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायासाठी कामाची स्थिती व्यवसायिक आरोग्य कामगारांच्या सुरक्षेसाठी ची धोरणे, कार्यक्रम, योजना, प्रकल्प सुरू करून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य वैशिष्ट्य आहे.
  • धोकादायक व्यवसायापासून पाल श्रम काढून टाकने आणि प्रक्रिया श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे.
  • कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

Bandhkam Kamgar Yojana Benefits

  • महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांची संख्याची माहिती मिळवणे या माहितीच्या आधारावर कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करण्यास सरकारला मदत होईल लाभाचे वितरण करण्यासही मदत होणार आहे.
  • Bandhkam Kamgar Yojanaयोजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.  
  • बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्यास मदत होत आहे.
  • बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरत आहे.  
  • कामाचे ठिकाणी होणाऱ्या अपघातापासून बांधकाम कामगारांचे संरक्षण होईल.
  • Bandhkam Kamgar Yojanaयोजनेच्या माध्यमातून नोंदणी झालेल्या कामगारांना योग्य लाभ देण्यासाठी सरकारकडे त्यांचा डेटा असेल.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या हाताला काम देणे हा एक उद्देश आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी शुल्क

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नोंदणी फीस म्हणून 25 रुपये व वार्षिक वर्गणी 60 रुपये (5 वर्षांसाठी) आणि मासिक वर्गणी 1 रुपया आहे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी पात्रता निकष

Bandhkam Kamgar Yojana Eligibility

  • या योजनेच्या माध्यमातून 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात.
  • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असलेले कामगार या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास पात्र आहेत.

बांधकाम कामगार यादी

Bandhkam Kamgar List

  • इमारत बांधकाम कामगार
  • रस्ता दुरुस्ती कामगार
  • रस्ते बनवणारे कामगार
  • रेल्वे
  • ट्रामवेज
  • एअरफील्ड
  • सिंचन
  • ड्रेनेज
  • तटबंध आणि नेविगेशन वर्क
  • ड्रेनेज वर्कर्स
  • पारेषण आणि पावर वितरण
  • पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  • तेल आणि गॅसची स्थापना
  • इलेक्ट्रिकल लाईट्स
  • वायरलेस
  • रेडिओ
  • दूरदर्शन
  • दूरध्वनी
  • टेलिग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन
  • ड्रम
  • नद्या
  • रक्षक
  • पाणीपुरवठा
  • टनेल
  • पूल
  • पदवीधर
  • जलविद्युत
  • पाईपलाईन
  • टॉवर्स
  • कुलिंग टॉवर्स
  • ट्रान्स मीटर टावर आणि  इतर कार्य करणारे कामगार
  • दगड फोडणे, दगडाचा बारीक चुरा करणे
  • लादी किंवा टाइल्स कापणे व पॉलिश करणे
  • रंग वॉर्निश लावणे इत्यादी सह सुतार काम करणे
  • गटारसाप व नळ जोडणीची कामे करणे
  • वायरिंग वितरण सावधान बसवणे तसेच विद्युत कामे करणारे कामगार
  • अग्निशमन यंत्रणा बसवणे व तिची दुरुस्ती करणारे कामगार
  • वातानुकूलित यंत्रणा बसवणे व त्याची दुरुस्ती करणारे कामगार
  • लिफ्ट आणि स्वयंचलित जिने बसवणारे कामगार
  • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी काम करणारे कामगार
  • लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे
  • जलसंचयन बांधकाम करणे
  • सुतार काम करणे, आभासी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पॅरिस यासह अंतर्गत सजावटीचे काम
  • काच कापणे, त्यात लावणे
  • कारखाना अधिनियम 1948 खालील समावेश नसलेल्या विटा, छापरावरील कल इत्यादी तयार करणे
  • सौर तावदाने इत्यादी सारखी ऊर्जा क्षम उपकरणे बसवणे
  • स्वयंपाक खोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्युलर आधुनिक युनिट बसवणे
  • सिमेंट काँक्रेटच्या साचेबद्ध वस्तू तयार करणे व बसवणे
  • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादी सह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे
  • माहिती फलक रोड फर्निचर प्रवासी निवारे किंवा बस स्थानके सिग्नल यंत्रणा इत्यादींची कामे करणारे व दुरुस्ती करणारे
  • रोटरीजचे कामे करणे, कारंजे बसवणे
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय मैदान गार्डन इत्यादीचे बांधकाम

बांधकाम कामगार योजनेच्या अटी व शर्ती

Bandhkam Kamgar Yojana Terms And Conditions

  • बांधकाम कामगार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.  
  • महाराष्ट्र राज्य बाहेरील बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • केंद्र किंवा राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आल्या इतर योजनेचा लाभ घेणारा बांधकाम कामगार त्यासाठी पात्र नसेल.

बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळणाऱ्या वस्तू

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

सेफ्टी बूट

सोलर टॉर्च

सोलर चार्जर

बॅग

जॅकेट

पाण्याची बॉटल

मच्छरदाणी

हात मोजे

चटई

सेफ्टी हेल्मेट

जेवणाचा डब्बा

Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गृहपयोगी वस्तू

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

बांधकाम कामगार हे एकाच ठिकाणी राहत नाहीत त्यांचे नेहमी स्थलांतरण होत असते एका जागेवरचे बांधकाम झाले की ते दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथे राहतात त्यामुळे अशावेळी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो त्यामध्ये त्यांचे राहण्याची सोय मुलांचे शिक्षण आरोग्याच्या समस्या जेवणाची त्यामुळे जेवणाची ही त्यांची गैरसोय होते या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना गृह गृहपयोगी वस्तू मिळतात त्या खालील प्रमाणे.  

ताट4
वाट्या8
पाण्याचे ग्लास4
12 इंच झाकणासह पातेले1
13 इंच पातेले झाकणासह1
14 इंच झाकणासह पातेले1
पाण्याचा जग1
मसाला डब्बा1
मोठी पळी1
मोठा चमचा1
14 इंच झाकणाचा डब्बा1
16 इंच झाकणाचा डब्बा1
18 इंच झाकणाचा डब्बा1
परात1
5 लिटर चे प्रेशर कुकर1
कढई1
मोठी स्टीलची पाण्याची टाकी1
एकूण30

सामाजिक सुरक्षा अंतर्गत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे विविध योजना योजनांचा समावेश होत होतो ते खालील प्रमाणे

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
  • पहिल्या विवाहाच्या प्रतिकृतीसाठी 30,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य

शैक्षणिक योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. या योजनेमुळे कामगारांच्या पाल्यांसाठी त्यांच्या मुलांच्या इयत्ता 1 ली ते पदवी पर्यंतच्या शैक्षणिक खर्चात आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ हा कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना लागू होईल. शैक्षणिक योजनेअंतर्गत केले जाणारे आर्थिक सहाय्य खालील प्रमाणे

इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत प्रतिवर्ष 2500 रुपये

इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000 रुपये

11 वी 12 वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये

इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास 10,000 रुपये

पदवीसाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये (ही योजना कामगाराच्या पत्नीलाही लागू होते)

वैद्यकीय पदवीसाठी प्रतिवर्ष 1 लाख रुपये

अभियांत्रिकी पदवीसाठी प्रतिवर्ष 60 हजार रुपये

MS-CIT च्या शिक्षणासाठी संपूर्ण फीस

याव्यतिरिक्त आर्थिक सहाय्य

बांधकामाचे कामगार काम करत असताना मृत्यू झाला असेल तर त्याच्या कायदेशीर वारसदारास 5  लाख रुपये आर्थिक मदत मिळते

या योजनेअंतर्गत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर कायदेशीर वारसदारास 2 लाख रुपये आर्थिक मदत मिळते

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठीची कागदपत्रे

Bandhkam Kamgar Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशन कार्ड

दारिद्र रेषेखालील पिवळे रेशन कार्ड

अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड

अन्नपूर्णा शिधापत्रिका रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

ईमेल आयडी

मोबाईल नंबर

काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता

नोंदणी अर्ज

पासपोर्ट आकाराचे तीन फोटो

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

मतदान ओळखपत्र

बँक पासबुक

जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

नियुक्तीचे मागील वर्षभरातील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदारांनी दिलेला असावा

महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

स्वयंघोषणापत्र

Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया

Bandhkam Kamgar Yojana Apply

या योजनेची नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगार योजनेचे होम पेज उघडेल.

त्यावर असलेल्या बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमच्या शहराची निवड करा.

त्यानंतर तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर प्रोसेस फॉर्म बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज उघडेल.

त्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती जसे की वैयक्तिक माहिती, रहिवासी पत्ता, कायमचा पत्ता ,कौटुंबिक माहिती, बँकेची माहिती, कामगार असल्याची माहिती इत्यादि माहिती भरावी व संबंधित आवश्यक कागदपत्रे या वेबसाईटवर अपलोड करावीत.

सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून पाहावा सेव या पर्यायावर क्लिक करावे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे बांधकाम कामगार योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची प्रक्रिया

Bandhkam Kamgar Yojana Online Apply

अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज दिसेल त्यावर तुम्हाला दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला select Action मध्ये न्यू क्लेम किंवा अपडेट क्लेम हा पर्याय निवडायचा आहे. तसेच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व प्रोसेस फॉर्म पर्यावर क्लिक करा.  

आता तुमच्यासमोर या योजनेचा दावा अर्ज उघडेल.

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा माहिती भरून झाल्यानंतर एकदा तपासून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण प्रक्रिया

सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

त्यानंतर होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करा हा पर्याय निवडायचा आहे

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला select Action मध्ये न्यूक्लेम किंवा अपडेट क्लेम हा पर्याय निवडा

तसेच तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर टाका असे विचारले जाईल

त्यावर नंबर टाका process to form बटणावर क्लिक करा

आता तुमच्या समोर अर्ज उघडेल

त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे

अशा पद्धतीने तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करू शकता

बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगार नोंदणी अद्यावत करण्याची प्रक्रिया

आपली माहिती अद्यावत करण्यासाठी बांधकाम कामगाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत साईडला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्यावत करा हा पर्याय निवडावा लागेल

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, Acknowlegment नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म पर्यावर क्लिक करा

तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्याबद्दल तुम्हाला विचारतील सर्व माहिती भरायचे आहे

त्या नंतर अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही सेव बटनावर क्लिक करून या पूर्ण करू शकता

बांधकाम कामगार योजना अंतर्गत लॉगिन करण्याची प्रक्रिया

लॉगिन करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

सरकारच्या अधिकृत साइड उघडल्यानंतर तुम्हाला होम पेजवर बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल

त्यामध्ये तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म बटनवर क्लिक करा

अशा सोप्या पद्धतीने तुमची बांधकाम कामगार योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत उपकर भरणा करण्याची प्रक्रिया

अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत साईडला जावे लागेल

साइटवर गेल्यानंतर होम पेजवर उपकार भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन पर्यायावर क्लिक करा

त्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन बटनावर क्लिक करा

त्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा उपकार भरणा करावयाचा आहे

अशा प्रकारे तुमची बांधकाम कामगार योजनेअंतर्गत उपकार भरणा प्रक्रिया पूर्ण होईल

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न: बांधकाम कामगार योजना Bandhkam Kamgar Yojana कोणासाठी सुरू करण्यात आली आहे?

उत्तर: महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक बांधकाम कामगार लाभ घेऊ शकतो.

प्रश्न: बांधकाम कामगार योजनेचा Bandhkam Kamgar Yojana लाभ काय?

उत्तर: बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ दिले जातात.

प्रश्न: बांधकाम कामगार योजना कोणत्या राज्यातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे?

उत्तर: बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील बांधकाम कामगार घेऊ शकतात.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA