budget 2025 for women investment In Marathi :  बजेट 2025 करू शकते महिलांना खुश…

budget 2025 for women investment time in mahila samman saving certificate scheme :  महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवणूक करण्याची आली वेळ

budget 2025 for women investment time in mahila samman saving certificate scheme may increase : सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असते. या योजनांमध्येच महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख मार्च 2025 आहे. या बजेटमध्ये सरकार या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची तारीख वाढवू शकते. 

budget 2025 चे बजेट सादर होण्यासाठी आता नुकते काही दिवस बाकी राहिले आहेत. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 ला बजेट budget 2025 सादर करतील. आता आपल्याला हे पाहायचे आहे की, या बजेटमध्ये सरकार काही नवीन योजना घेऊन येईल का? महिलांना अशी अपेक्षा आहे की, या बजेटमध्ये सरकार महिलांसाठी नक्कीच काहीतरी नवीन योजना घेऊन येईल. budget 2025 for women investment

 महिला सन्मान योजनेत गुंतवणुकीची तारीख

 Mahila Samman Bachat Patra Yojana केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. यापैकीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. या योजनेची गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख मार्च 2025 आहे. या बजेटमध्ये सरकार या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची तारीख वाढवू शकते. यामुळे महिलांना भरपूर लाभ मिळेल.

महिला सन्मान बचत पत्र योजना Mahila Samman Bachat Patra Yojana ही देशातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1000 रुपयापासून गुंतवणूक करू शकतात. तर 2 लाख पर्यंत देखील या योजनेअंतर्गत गुंतवणूक केली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना 7.5% व्याजदर मिळते. 

महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Samman Bachat Patra Features

  • देशातील सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलींना 31 मार्च 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी 2 वर्षाच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल.
  • MSSC च्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज असेल जे तिमाही चक्रवाढ होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून किमान 1 हजार रुपये आणि 100 च्या पटीत कोणतीही रक्कम 2 लाखाच्या कमाल मर्यादेत जमा करता येते.
  • या योजनेच्या माध्यमातून खाते उघडल्यावर योजनेतील गुंतवणुकीची परिपक्वता ही खाते उघडल्यापासून च्या तारखेपासून 2 वर्षा ची आहे.
  • ही केवळ गुंतवणूकच नव्हे तर या योजनेच्या कालावधी दरम्यान अंशिक पैसे काढण्यासाठी देखील पर्याय दिला आहे. खातेदार व्यक्ती योजनेच्या खात्यातील पात्र शिल्लकीपैकी जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढू शकतो.

महिला बचत पत्र योजनेतून पैसे कसे काढावे

Mahila Samman Yojana

खातेदार मुलगी, महिला खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्ष झाल्यानंतर खात्यात पात्र शिल्लकीच्या जास्तीत जास्त 40% रक्कम काढू शकते.

Mahila Samman Yojana या योजनेच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांनी खाते उघडले असेल तर त्यांना खात्यातून पैसे काढण्यासाठी पालक लेखा कार्यालयाचे पत्र  सादर करून अल्पवयीन मुलीच्या खात्यातून अर्ज करून पैसे काढू शकतात.

Mahila Samman Yojana या खात्यातून पैसे काढण्याची गणना 1 रुपयाच्या अपूर्ण अंकातील रक्कम अपूर्णकांतील रक्कम जवळच्या रुपयांमध्ये पूर्ण केली जाईल आणि या उद्देशासाठी 50 पैसे किंवा त्याहून अधिक रक्कम 1 रुपया मानली जाईल 50 पैसे पेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

Mahila Samman Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

वयाचा पुरावा म्हणून जन्म पत्र  किंवा शाळेची टीसी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जमा रक्कम किंवा चेकसह पे इन स्लिप

महिलेची ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे वैध मानले जातील

पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन

मतदान ओळखपत्र

नरेगा द्वारे दिलेले जॉब कार्ड

राज्य सरकारच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी असलेले ही नाव आणि पत्त्याच्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी द्वारे जारी केलेले पत्र

महिला सन्मान बचत पत्र योजनेची अर्ज प्रक्रिया

Mahila Samman Saving Certificate Scheme Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला जवळच्या पोस्ट ऑफिस निवड झालेल्या बँकेला भेट द्यावी.

पोस्ट ऑफिस कार्यालयातून तुम्ही या योजनेचा अर्ज घेऊ शकता. तसेच ऑनलाइन पद्धतीने ही  अधिकृत वेबसाईटवरून या योजनेसाठीचा अर्ज डाऊनलोड करता येतो.

त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि त्यासोबत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.

त्यानंतर घोषणा आणि नामांकन तपशील अर्जावर भरा त्यानंतर तुम्ही गुंतवणूक/ ठेवीच्या सुरुवातीच्या रकमेसह अर्ज जमा करू शकता.

महिला सन्मान बचत पत्र  योजनेतील गुंतवणुकीचा पुरावा म्हणून तुम्हाला एक पत्र  देण्यात येईल.