Delhi Mahila Samman Yojana And sanjeevani yojana 2024 In Marathi : आजपासून महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेची नोंदणी सुरू

Delhi Mahila Samman Yojana And sanjeevani yojana 2024 In Marathi : प्रत्येक महिन्याला मिळणारे 2100 रुपये

Delhi Mahila Samman Yojana And sanjeevani yojana 2024 In Marathi : 23 डिसेंबर पासून महिला सन्मान योजना ची नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणीसाठी महिलांना लाईन मध्ये लागण्याची आवश्यकता नाही महिलांच्या घरोघर जाऊन ही नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यानंतर महिलांना एक कार्ड देण्यात येणार आहे

Delhi Mahila Samman Yojana And sanjeevani yojana दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामधील एक योजना म्हणजेच दिल्लीतील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 2100 रुपये जमा करण्याची आहे. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या योजनेच्या नोंदणी प्रक्रियेची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की, सोमवार 23 डिसेंबर पासून महिला सन्मान योजना ची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. रजिस्ट्रेशन साठी महिलांना लाईन लावण्याची आवश्यकता नाही. महिलांच्या घरोघर जाऊन नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना एक कार्ड देण्यात येईल.

कधी सुरू होणार संजीवनी योजनेची नोंदणी

sanjeevani yojana 2024

sanjeevani yojana दुसऱ्या योजनेची माहिती देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की आमच्या संजीवनी योजनेअंतर्गत 60 वर्षे वरील सर्व वृद्ध व्यक्तींना खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जाणार आहेत. या योजनेची ही नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच 23 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. संजीवनी योजने साठी वृद्धांना कुठल्याही लाईनमध्ये जाऊन उभा राहण्याची आवश्यकता नाही. तर आम आदमी पक्षाच्या टीमकडून घरोघर जाऊन ही नोंदणी करून घेतली जाणार आहे.

दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

नोंदणी करणार आणि कार्ड देणार

Mahila Samman Yojana And sanjeevani yojana

दिल्लीच्या आम आदमी पक्षाने Mahila Samman Yojana महिला सन्मान योजना आणि sanjeevani yojana संजीवनी योजना साठी नोंदणी आणि कार्ड देण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की नोंदणीसाठी लोकांनी आपले मतदान कार्ड तयार ठेवावे. महिला सन्मान योजना अंतर्गत 35 ते 40 लाख महिलांना याचा फायदा मिळणार आहे आणि संजीवनी योजनेअंतर्गत जवळपास 10 ते 15 लाख वृद्धांना या योजनेचा लाभ मिळेल.

Delhi Mahila Samman Yojana And sanjeevani yojana

दिल्लीमध्ये आज पासून सुरू होणार दोन योजनेची नोंदणी

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी रविवारी मोठी घोषणा केली आहे. आज सोमवार पासून दिल्लीमध्ये महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना साठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या दोन्ही योजनेचा लाखो नागरिकांना फायदा मिळेल.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, जवळपास 35 ते 40 लाख महिलांना सन्मान योजना चा लाभ मिळेल आणि जवळपास 10 ते 15 लाख वृद्धांना संजीवनी योजनेचा लाभ मिळणार आहे.

केजरीवाल यांच्याकडून उपराज्यपालांचे आभार

Mahila Samman Yojana And sanjeevani yojana

अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल यांचे आभार मानले आहेत. कारण त्यांनी आमच्या उनिवा दाखवल्या आम्ही त्या उनिवावर काम केले आहे आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या परिसरामध्ये त्यांनी खराब झालेला रस्ता दाखवला आम्ही तिथे नवीन रस्ते बनवत आहोत लवकरच मुख्यमंत्री अतिशी या रस्त्याचे उद्घाटन करतील. आज उपराज्यपाल यांनी जी जागा दाखवली आहे आम्ही तीही साफसफाई करणार आहोत. केजरीवाल म्हणाले की, उपराज्यपालांनी आमच्या उनिवा दाखवाव्या आणि आम्ही त्या दूर करत राहू याबद्दल त्यांचे आभार.

दिल्लीच्या लोकांएवढा तिरस्कार का?

Delhi Mahila Samman Yojana अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील लोकांचा एवढा तिरस्कार का यावर्षी पण रिपब्लिकन डे परेडमध्ये दिल्लीची झाकी नसणार आहे. दिल्लीच्या लोकांना 26 जानेवारी मध्ये सहभागी होण्यापासून का रोखले जात आहे? यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. निवडणुक काळात हे लोक दिवसभर केजरीवालला शिव्या देत असतात.