Dhoop Deep Jhala Ata Kapur Aarti In Marathi Lyrics : धूप दीप झाला आता
Dhoop Deep Jhala Ata Kapur Aarti In Marathi संपूर्ण आरत्या म्हणून झाल्यावर ही कापूर आरती म्हणावी यामुळे घरात शांतता निर्माण होते.
धुप दीप झाला आता कर्पुर आरती।
आता कर्पुर आरती।।
छत्र सिंहासनी बैसले जानकी पती।
जानकी पती , बसले आयोध्हा नृपति।
बसले आयोध्हा नृपति।
धुप दीप झाला आता कर्पुर आरती।।
कर्पुर वडी सम मानस माझे निर्मळ राहुदे, देवा निर्मळ राहुदे।
कर्पुर वडी सम भाव भक्तीचा सुगन्ध वाहू दे
कापुराची लावुनी ज्योति पहिन तव मूर्ती देवा, पहिन तव मूर्ती
धुप दीप झाला आता कर्पुर आरती।।
ध्यान कळेना ध्यान कळेना ना कळे काही मजला ना कळे काही
शब्दरुपी गुंफुनी माला वाहतो पायी
मुखी नाम नेत्री ध्यान हृदयी तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती
धुप दीप झाला आता कर्पुर आरती।।