Diwali Lakshmi Puja 2024 In Marathi : लक्ष्मीपूजनची संपूर्ण माहिती व शुभमुहूर्त
Diwali Lakshmi Puja 2024 : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण आता नुकताच काही दिवसांवर आलेला आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अगदी अत्यंत उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा सण खरंतर पाच दिवसांचा असतो.
या पाच दिवसांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लागतात. आकाश कंदील लागतात. दारोदारी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, फुलांची आरास घरात केली जाते. दाराला तोरण बांधतात. प्रत्येकाच्या घरोघरी फराळ करण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना बोलावले जाते. कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि एकदम धुमधडाक्यात दिवाळी हा सण साजरी करतात.
Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे? पूजेचा शुभमुहूर्त काय आहे? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू…
lakshmi Pujan Muhurat दिवाळीच्या दिवसात घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. दारापुढे नक्षीदार सुंदर मोठमोठ्या रांगोळ्या पाहायला मिळतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी श्रीराम आयोध्यात परतले होते तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. समुद्रमंथनाच्या वेळी सागरातून देवी लक्ष्मी प्रगट झाली होती. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते.
कधी आहे लक्ष्मीपूजन?
Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat
lakshmi Pujan Muhurat लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यातील अमावस्या या तिथीला असते. यावर्षी लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला आहे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळातील तीन शुभ मुहूर्त मानला जातो. देवी लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळातच करावी.
लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त कोणता?
Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat
लाभ – सकाळी 8 ते सकाळी 9:30
अमृत- सकाळी 9:30 ते दुपारी 11
शुभ काल – दुपारी 12:30 ते दुपारी 2
चंचल-संध्याकाळी 5 ते 6:30
प्रदोष काल- संध्याकाळी 5:35 ते 8:11
वृषभ काल- संध्याकाळी 6:21 ते 8: 17
लक्ष्मीपूजन का करावे?
lakshmi Pujan Muhurat
lakshmi Pujan Date दिवाळीच्या सणांमध्ये लक्ष्मीपूजन असते. पण लक्ष्मीपूजन का करावे? हे आपण पाहू…
अश्विन वैद्य लक्ष्मी अमावस्येला लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण हे का केले जाते तर या दिवशी बलिच्या बंदी वासातून लक्ष्मीची सुटका झाली होती. याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, असे म्हणतात. लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात राहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोक या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. तसेच प्रत्येक घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते.
असे करा लक्ष्मीपूजन…
lakshmi Pujan Date गणपती- लक्ष्मीची मूर्ती चौरंगावर ठेवावी. बाजूला सुंदर रांगोळी काढावी. मूर्तीच्या बाजूला दिवा लावून प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी तांदूळ ठेवावे, त्यानंतर गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. या देवी लक्ष्मी आणि गणेशासोबत कुबेर- सरस्वती आणि कालीमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी लक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूंची ही पूजा करावी. लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठापना करावी. हळदी- कुंकू, अक्षदा- फुले अर्पण करून लाह्या आणि बत्तासे अर्पण करावे. या दिवशी केरसुणीची देखील पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणावा- गोड पदार्थ आणि घरातील फराळ ठेवावा. अनेकांच्या घरी या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो पुरणाच्या स्वयंपाकाचा देवीला नैवेद्य दाखवावा.